मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवक आणि युवती साठी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू असून या विशेष योजनेची घोषणा 17 जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र सरकारने तरुणांना कौशल्य विकास करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेमधील युवक आणि युवतींना दर महिना १० हजार एवढे मानधन मिळणार आहे जर तुम्हाला हि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लाडका भाऊ योजना कागदपत्रे कोण-कोणती लागतात हे समजून घेणे गरजेचे आहे खास हीच माहिती घेऊन येणार हा लेख त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
लाडका भाऊ योजना कागदपत्रे
नव्याने सुरु झालेल्या मुखमंत्री माझा लाडका भाऊ योजनांमधून लाभ घेण्यासाठी तुम्हाला निवडक कागदपत्रे आवश्यक आहेत , जर हे लाडका भाऊ योजना कागदपत्रे तुमच्या कडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्यामुळे लेख पूर्ण वाचा
मुख्यमंत्री मा. शिंदे साहेब यांची अत्यंत महत्वाकांक्षी योजनेपैकी एक महत्वाची योजना म्हणजे लाडका भाऊ योजना हि आहे या योजनेमधून पात्र युवक आणि युवती ना जीवनावश्यक कौशल्य प्रशिक्षण मिळेल, सोबत प्रति महिना आकर्षक मानधन सुद्धा मिलेल , ह्या मानधनाचा उपयोग भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी करता येईल असा विश्वास मुखमंत्री शिंदे यांनी आपल्या अनेक भाषेत बोलून दाखवला आहे .
योजनेचे नाव | लाडका भाऊ योजना | |
योजना कुणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य सरकार | |
योजनेचे लाभार्थी कोण | राज्यातील बेरोजगार तरुण तरुणी व विद्यार्थी | |
लाभ | नोकरी आवश्यक प्रशिक्षण | |
अर्ज | ऑनलाइन अर्ज करावा | |
आर्थिक लाभ | 10 हजार रुपये महिना | |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कार्यालय | |
अश्याच माहितीसाठी आमचा whats App ग्रुप | Click Here |
लाडका भाऊ योजना
महाराष्ट्र राज्यातील तरुण युवक व युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, अनेक व्यवसायिक कौशल्य विकसित व्हावेत या उद्देशाने मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देणारी व रोजगार उपलब्ध करून देणारी लाडका भाऊ योजना सुरू केली. याशिवाय, तरुण युवक व युवतींना विद्यार्थ्यंना अतिरिक्त शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचा उपयोग नोकरी शोधण्यात मदत होईल आणि त्यांना स्वतःसाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. परिणामी लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान सुधारेल. राज्याच्या बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. हा कार्यक्रम राज्यातील तरुण युवक व युवतींना वाढीची रोजदार वाढीस हमी देईल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल जेणेकरून ते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी तरुण युवक व युवतीं असतील आणि त्यांना हि या योजनेचा लाभ घायचा असेल तर लाडका भाऊ योजना कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि नेमकी काय पात्रता आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोण आहे पात्र ?
लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत पात्रात यादी दिलेली आहे जर एखांदी व्यक्ती खालील अटी व शर्ती पूर्ण करत असेल तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल
- अर्जदार मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्रात रहिवासी असणारे तरुण युवक व युवतींना पात्र असतील , जर अर्जदार बाहेर राज्यातून महाराष्ट्र आला असेल पण त्याने त्याचे पूर्ण शिक्षण महाराष्ट्र राज्यात पूर्ण केले असेल आणि सध्या तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असेल तर असा अर्जदार अर्ज करू शकतो.
- पात्र उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे यादरम्यान असावे.
- या योजेनला पात्र असण्यासाठी डिप्लोमा, पदवी किंवा किमान 12 वी पास शिक्षण असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार,विद्यार्थी पात्र असतील.
- पात्र उमेदवाराचे आधार कार्ड आणि अर्जदाराचे बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवाराचे आधार कार्ड अद्यावत update केलेले असावे
- अर्जदार उमेदवाराचे आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी सीडींग / Seeding केलेले असावे . ( आपले आधार कार्ड seeding आहे कि नाही तपासा )
- सर्वात महत्वाची अट म्हणजे अर्जदारानी स्वतःचे महा संयम वर स्वतःला रजिस्टर केलेले असावे
लाडका भाऊ योजनेचे लाभ
- महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण युवक व युवतींना आणि विद्यार्थ्यांना लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत कामगारांसाठी तयार होण्यासाठी त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
- या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेण्यासोबतच, बेरोजगार मुलांना योजनदूत या पदावर नियुक्ती करून त्यांना 10,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल.
- राज्य सरकार 12 वी उत्तीर्ण युवक, आयटीआय उत्तीर्ण युवक आणि पदवीधरांना अनुक्रमे रु. 6,000, रु. 8,000, आणि रु. प्रशिक्षणादरम्यान दरमहा 10,000 रु. दिले जातील.
- तुम्ही महाराष्ट्राच्या लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज केल्यास तुम्हाला सरकारकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल. आणि ह्या प्रशिक्षणादरम्यात मासिक वेतन सुद्धा मिळेल.
लाडका भाऊ योजना कागदपत्रे
लाडका भाऊ योजना कागदपत्रे नेमके कोणते लागतात हे समजून घेणे अत्यंत गरजचे आहे जर तुम्हाला नेमके कोणते कागदपत्रे लागतात हे माहिती नसेल तर आणि तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज बाद सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्व वाचा
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना ( अत्यावश्यक नाहीये )
- शैक्षणिक पात्रता दाखले ( अजर्दार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे )
- मोबाईल नंबर जो आधार कार्ड शी जोडलेला आहे
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र / पासवर्ड फोटो
- बँक खाते पासबुक ( हे बँक खाते आधार सीडींग / seeding असणे आवश्यक आहे ) जर हे बँक खाते सीडींग नसेल तर भविष्यात अडचण येईल .
लाडका भाऊ योजना कागदपत्रे आणि इतर महत्वाच्या बाबी
- 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील
- वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठे प्रकल्प,उद्योग/स्प्स्टार्टअप, वेगवेगळ्या आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील.
- सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील
- सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनमर्फत विद्यावेतन देण्यात येईल
- सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
- अधिक माहिती साठी तुम्ही – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता .
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून लाडका भाऊ योजना काय आहे आणि लाडका भाऊ योजना कागदपत्रे व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.