महाराष्ट्र राज्यात असेच इतरही राज्यात ग्रामपातळीवर काम करण्यासाठी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पदे भरले जातात प्रामुख्याने त्यामध्ये तलाठी, कोतवाल,शिक्षण आणि ग्रामसेवकाचा सहभाग असतो या सर्वाची निवड प्रक्रिया आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत आज आपण या लेखातून ग्रामसेवकाची कामे काय? त्याची निवड कसी केल्या जाते व ग्रामसेवक पदाविषयी सविस्तर माहिती एकाच लेखातून खास तुमच्या साठी त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, 1958 नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे काम पाहतात. सदर पदावर कार्यरत असताना त्यांनी कारावच्या कामांची सुधारित कर्तव्यसूची सोबत जोडली आहे. सदर कर्तव्यसूची सर्व संबधितांच्या निदर्शनास आणून त्यानुसार कार्यपालन करण्यास सूचित करण्यात यावे.
ग्रामसेवकाची कामे काय?
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, 1958 नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे काम पाहतात. सदर पदावर कार्यरत असताना त्यांनी कारावच्या कामांची सुधारित कर्तव्यसूची सोबत जोडली आहे. सदर कर्तव्यसूची सर्व संबधितांच्या निदर्शनास आणून त्यानुसार कार्यपालन करण्यास सूचित करण्यात यावे.
- प्रशासन
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 व त्याखालील शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या नियमानुसार व आदेशानुसार ग्रामपंचयातीचा सचिव त्या नात्याने कार्य करणे.
- ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे.
- नरेगा योजनेंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेख वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवणे.
- पंचायतीने ठरवून दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 नुसार ग्रामपंचायत ग्रामसभा मासिक सभा बोलविणे त्याची नोटीस काढून संबंधितांना देणे सभेच्या कार्य वृत्तांत लिहिणे व सभेमध्ये असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पूर्तता करणे हे काम पंचायतीच्या कार्य सहकार्याने करावे वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील.
- शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध कर वसूल करण्याचे आदेश सचिवाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कर व फियाची वसुली करणे प्रत्येकी चार वर्षांनी कराची आकारणी करून 25% वाढ सुचविणे
- ग्रामपंचायत इकडील लेखा परीक्षणात केलेल्या अपेक्षांची पूर्तता करणे व लेखापरीक्षण कानी दर्शविलेल्या अनियमित्येचे व अपेक्षाची पुनवृत्ती न होण्याबाबत दक्षता देणे.
- ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी रस्ते इमारती पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे सनदी अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्राम दर्शन नकाशा ग्रामपंचायत मध्ये ठेवणे.
- जन्म मृत्यू उपजत मृत्यू विवाह नोंदणी इत्यादी बाबत रजिस्ट्रेशन नुसार निबंधक म्हणून कार्य पार पाडणे.
- ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सदस्य सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेले सहकारी सोसायट्या दूध डेरी नागरी पंचायत संस्था स्थानिक महिला मंडळी तरुण मंडळी बालवाडी अंगणवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळा स्वयंसेवी संस्था यांच्याशी समावेश साधून या सर्व संस्था लोकपयोगी कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
- ग्रामपंचायतच्या पातळीवर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायत मध्ये एकत्र आणून ग्रामपंचायतच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे.
- सरपंच उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यक असल्यास आपली मते नोंदविणे.
- ग्रामपंचायत काही नियमाची व कायद्याची बुलंदन करणारी कृती करत असेल किंवा तसे करण्याचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी यांना विहित मुदतीत सादर करणे.
- ग्रामपंचायतीने वार्षिक प्रशासन अहवाल सादर करून पंचायत समितीत विहित मुरली सादर करणे
- निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेशा यांचे काटेकोरपणे पालन करणे.
- ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्याकडून वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे त्यांची आस्थापनाविषयक बाबी उदाहरणार्थ सेवा पुस्तके वैयक्तिक नसत्या परिपूर्ण ठेवणे गरजेचे हिशोब ठेवणे भविष्य निर्वाह निधी बोनस इत्यादी शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार घेणे , सेवा हमी कायद्यानुसार दाखले विहित मुदतीमध्ये देणे
- नियोजन
- ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाच्या पंचवार्षिक आराखडा तयार करणे पंचवार्षिक नियोजन करणे रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योगधंद्यात वाढ करणे , पडीत जमिनी लागवडी योग्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, रस्ते दुरुस्ती डांबरीकरण, सांडपाण्यासाठी गटारे ,परिसर स्वच्छता, पशुविकास ,वैरण विकास, बालकल्याण योजना , साक्षरता मोहीम याबाबतीतील शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे. नरेगा व वित्त आयोग यांच्या अंतर्गत योजना अंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हा परिषदा कडून उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान याचा विचार करून ग्रामपंचायतचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.
- पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायती मार्फत राबवल्या जाणाऱ्या विकास योजनेवर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल मे मध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे.
- विकास कामाची वर्गवार एकत्रित माहिती घेऊन योजना वार नोंदी वेगवेगळ्या ठेवून ग्रामपंचायत पातळीवर योजनाची अंमलबजावणी सुरळीतपणे होत असल्याबाबत लक्ष ठेवणे.
- शेती विषयक
- शासनाकडून तसेच जिल्हा परिषद कडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा मासिक सभा व इतर सार्वजनिक सभामार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे. सदर योजनेच्या ग्रामस्थांना लाभ होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पंचायत समिती पातळीवर तांत्रिक अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेऊन सदर योजना राबवणे.
- दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.
- पात्र लोकांच्या मागणीनुसार नियमानुसार प्रकरणे तयार करणे त्यांना मंजुरी देणे व त्यानुसार खरेदी करून देणे.
- नरेगा व वित्त आयोग इत्यादी योजनेची शासनाने विविध निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार हत्ती घालावयाच्या कामाचे स्वरूप व पंचायत समितीचे सहाय्याने नियोजन करणे.
- ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे.
- प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाद्य प्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवणे बांधकामावर देखरेख ठेवणे कामाची पाहणी करून मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक अधिकाऱ्या यांच्याकडे पाठवणे नरेगा योजना अंतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेची नोंदणी ही नोंदवहीवर करून घेणे व त्यावर देखरेख करणे सदर योजनेअंतर्गत जमाखर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीने ग्रामसभेपुढे ठेवणे.
- कुटुंब कल्याण कार्यक्रम
- कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार आरोग्य खाते व पंचायत समित्यांच्या सरपंच व सभासद यांच्या सहकार्याने करणे
- कुटुंब कार्यक्रमांतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे व त्यांची अंमलबजावणी करून घेणे
- कल्याणकारी योजना
- महिला बालकल्याण समज कल्याण साक्षरता प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी कामे स्थानिक संस्था यांच्या सहकार्य घेऊन या योजनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून आणणे
- मोफत कायदेविषयक सल्ला देणे या योजनेची माहिती जिल्हा व तालुकास्तरावरील वरून घेऊन ती पंचायत व स्थानिक संस्थाद्वारे पंचायतीमध्ये ठेवणे व ती ग्रामस्थांना करून देणे तसेच या योजनाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करून घेणे.
- गाव माहिती केंद्र
- ग्रामपंचायत क्षेत्रात माहिती केंद्राची स्थापना करून दूरदर्शन संच रेडिओ व सार्वजनिक वाचनालय यांच्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन जनजागृती करणे.
- पशु संसाधनाबाबत विविध योजना
- राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजनांसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावरांच्या वाढीस उत्तेजन देणे
- इतर काही महत्त्वाची कामे
- गावामध्ये शुद्ध पाणीपुरवठा करून अशा योजना सुनिश्चित ठेवणे त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे शुद्धीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे पाणी वाटपाचे नियोजन देखभाल व दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्च पाणीपट्टी लोकांकडून वसूल करून घेणे. त्याबाबत अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्यावर पंचायतीने केलेल्या कार्यवाहीनुसार ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 229 नुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे व गाव पातळीवर ती त्याची वसुली करणे
- पूर दुष्काळ भूकंप टंचाई सातरू इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर त्याबाबत त्वरित संबंधित खात्याला कळविणे ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहा यांनी प्राथमिक उपयोजना करून घेणे
- याशिवाय जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांनी वरील कार्यवाही सूची मधील व त्या व्यतिरिक्त वेळोवेळी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे व संबंधित रिपोर्ट दाखल करणे.
सारांश मध्ये ग्रामसेवकाची कामे काय?
- कर वसुली करणे.
- वसुलीतून गावविकासाची कामे आराखडा तयार करून कामे करणे.
- पाणीपुरवठा व्यवस्थापन पाहणे, त्यासाठी आराखडा तयार करून व्यवस्थापन करणे.
- साफ सफाई आराखडा आणि व्यवस्थापन
- शिक्षण व आरोग्य आराखडा आणि व्यवस्थापन
- दिवाबत्ती, इत्यादी कामे आराखडा आणि
- जन्म-मृत्यू नोंदणी करणे व सदरील प्रमाणपत्र देणे.
- विवाह नोंदणी करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र बहाल करणे. ( विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते व विवाह नोंदणी प्रमाणपत्र pdf)
- ग्राम सभा बोलवणे.
- ग्रामपंचायत व ग्रामसभेत सचिवांची भुमिका बजावतात. त्याच बरोबर ग्रामसभेची कार्यवाही लिहून ठेवणे.
- लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणे आणि समस्या निवारण साठी शासनास सहकार्य करणे.
- ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडणे व त्याच्या लेखाजोखा ठेवणे.
- ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब सांभाळणे अशी जवळपास 29 खात्यांची कामे करावे लागतात व तसेच विविध योजना राबविणे. उदा.
- 1. महानरेगा 2. स्वच्छ भारत मिशन 3. 14 वा वित्त आयोग. 4. प्रधान मंञी आवास योजना 5. स्मार्ट गाव 6. ग्राम सभा सचिव ORDP. DWSY. IAY.RAY.PSGSY.SGGSA.SSA.YGPA.MGTG.KKY.माहिती करिता मु.गा.अ.१९५८
- अधिक माहिती साठी तुम्ही विकिपीडिया वेबसाइट ला भेट देऊ शकता. वाचा ग्रामसेवकाची कामे काय?
- अधिक माहिती साठी ग्रामसेवक यांचे विशेष पुस्तक वाचू शकता . ग्रामसेवक तांत्रिक डायरी
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून ग्रामसेवकाची कामे काय? व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- दादासाहेब फाळके पुरस्कार इतिहास व यादी ,Dadasaheb Phalke Award History and List of honour
- पंतप्रधान पदाची निवड कशी केल्या जाते आणि भारताचे सर्व पंतप्रधानाची यादी कालखंडानुसार
- नागरिकत्व, आयु आणि डोमासाईल प्रमाणपत्र : 2024 मध्ये अर्ज कसा करावा ?
- जाणून घ्या का केली ७३ वी घटनादुरुस्ती आणि पंचायत राज व्यवस्थे बद्दल संपूर्ण माहिती
- पासपोर्ट काढायचा आहे?तर असा करा घरबसल्या अर्ज !