श्रम आणि रोजगार मंत्रालय जे भारत सरकारचे सर्वात जुन्या मंत्रालायापैकी एक आहे ,जे कामगाराचे हित सुरक्षेसाठी काम करते , विविध श्रम कायदे जे श्रमिकांच्या सेवा आणि रोजगार नियम आणि शर्ती चे नियमन करते , अधिनियम आणि कायदे द्वारा संघटीत आणि असंघटीत दोन्ही श्रेत्रात काम करणाऱ्या कामगाराचे कल्याणस बढावा देणे आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करून देशातील श्रम बल च्या जीवनात सन्मान आणि सुधार आणण्यासाठी लगातार कार्यशील आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालय, जे भारत सरकारच्या सर्वात जुन्या आणि सर्वात महत्वाचे मंत्रालयांपैकी एक आहे, देशाच्या कामगार दलाचे जीवन आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. कामगारांच्या हिताचे रक्षण आणि संरक्षण करणे, त्यांचे कल्याण करणे आणि संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. आज लेखातुन आपण इ श्रम कार्ड लाभ समजून घेणार आहोत .
ई श्रम कार्ड E-sharm card
हा उपक्रम भारतातील असंघटित कामगारांचा पहिला राष्ट्रीय डेटाबेस आहे आणि या कामगारांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डेटाबेस असंघटित क्षेत्राला सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ ओळखण्यात आणि त्यांचा विस्तार करण्यास मदत करेल. हे सुनिश्चित करेल की या कामगारांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणि विकासाला चालना मिळेल. एकूणच, भारतातील कामगार दलाचे जीवन सुधारण्यासाठी मंत्रालयाचे प्रयत्न प्रशंसनीय आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत.
ई श्रम कार्ड योजनेचे उद्देश
- सर्व असंघटीत श्रेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे , ज्या मध्ये या सर्वाना आधार ने जोडणे.
- या सर्व असंघटीत काम करणाऱ्या कामगारांना समाजिक सुरक्षाच्या सर्व योजना देणे.
असंघटीत श्रेत्रात काम करणारे म्हणजे कोणते कामगार ?
- स्थलांतरीत कामगार – (कामासाठी नेहमची एकदा ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात)
- फेरीवाले – (शहरी व ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे गाडे/गाडी घेऊन फिरत असतात आणि ते आपल्या मालाची / वस्तूची/ विक्री करण्यसाठी फिरत असतात असे कामगार)
- घर काम करणारे – (दुसऱ्याच्या घरी कोणत्याही प्रकारचे काम करणारे उदा. घर काम करणाऱ्या महिला, स्वयपाकी, माळी, साफ सफाई करणारे)
- शेतात काम करणारे कामगार – (दुसऱ्याच्या शेतीत रोजंदारीने ( देहाडी) जाणारे कामगार त्यामध्ये सर्व प्रकारचे काम आले)
- बिल्डिंग वर काम करणारे कामगार – (एखाद्या इमारतीवर रोजंदारीने सर्व प्रकारचे काम करणारे कामगार)
- ऊस तोड कामगार
- वीट भट्टीवर काम करणारे कामगार
- रोड वर काम करणारे कामगार
- पशुपालन करणारे
- ऑटोरिक्षा चालक
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे कामगार ई श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात.
E-sharm card साठी पात्रता
- कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे
- आयकर भरणारी तसेच EPFO, ESIC चे सदस्य असलेली व्यक्ती मात्र यासाठी अर्ज करू शकत नाही.
- जी व्यक्ती INCOME TAX भरत नाही.
- म्हणजे ज्यांचा पीएफ कपात होतो ते अर्ज नाही करू शकत.
E-sharm card साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
- बँक पासबुक एकदा का कामगाराने त्याचे कार्ड तयार करुन घेतले की
त्यावर मिळणारा 12 अंकी युनिक कोड मिळेल त्या अतिशय महत्वाचां असेल.
ई श्रम कार्डचे लाभ
- श्रम कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यात आले आहे या माध्यमातुन असंघटित श्रेत्रात काम करणाऱ्या कामगारा पर्यंत सर्व सामाजिक सुरक्षा योजना चां लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
- ई श्रम कार्ड धारक प्रधान मंत्री सुरक्षा वीमा योजने द्वारे विमा संरक्षण दिले जाईल ज्या मध्ये अपघाती मृतू पावलेल्या किवा कायमच अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला किंवा त्याच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये, काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयाचा लाभ दिला जाईल.
- भविष्यात सर्व योजनेचा लाभ याच ई श्रम कार्ड द्वारे दिला जाईल.
जर आपण आपले ई श्रम कार्ड अजून नाही बनवले तर आजच आपल्या जवळच्या CSC ( सेतू सुविधा केंद्रा) वर जाऊन काढू शकतो , किंवा खाली देलेल्या website च्या द्वारे आपण स्वतःहा आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतो.Register on e-shram ह्या बटनावर जाऊन रजिस्टर करू शकता ई-श्रम कार्ड बनवताना कोणतीही अडचण आल्यास तुम्ही खाली commet करू शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून ई क्षम कार्ड लाभ व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.