कर्करोग ही जगभरातील चिंतेची बाब आहे कारण दिवसे दिवस कॅन्सर चे प्रमाण वाढत चाललेले आहे . कारण WHO च्या आकडेवारी नुसार जगभरात वार्षित 76 लाख महिला फक्त ब्रेस्ट कॅन्सर (स्थानाचा कर्करोग ) मुळे मरण पावतात. आणि इतर कॅन्सर मुळे मृत्यू पावण्याचे प्रमाणही मोठे आहे. पण आज आपण प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या मध्ये काय असतो ब्रेस्ट कॅन्सर breast cancer, कसा होतो, कुणाला होऊ शकतो, लक्षणे ,कसा ओलखवा आणि सर्वात महत्वच म्हणजे आपण ह्या कॅन्सर पासून
स्वतःला कसे वाचवू शकतो. कारण ब्रेस्ट कॅन्सर breast cancer वर वेळीच लक्ष दिले तर तुम्हाला कधीही हा आजार होणार नाही आणि जर झालाच तर वेळीच उपचार घेतला तर पूर्णतः बारा होणार आजार आहे. चला तर मग जाणून जाणून घेऊ ब्रेस्ट कॅन्सर बद्दल….
भारतामध्ये काय आहे स्थिति
भारतातील स्त्रियामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चलेले आहे. 2018 च्या एका अभ्यास अहवालानुसार स्तनच्या कॅन्सर चे प्रमाण 14 टक्के असून दर चार मिनिटांनी एक भारतीय महिलेला स्तनच्या कॅन्सर चे निदान होत असल्याची नोंद होत आहे. भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे.शहरातील प्रत्येकी 20 बायकांमध्ये एका महिलेला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एका महिलेला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असू शकते , त्यापैकी ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ वय असलेल्या महिलेस होत असल्याचे आढळून आले आहे .2018 च्या अहवालानुसार सरासरी 1 लाख 63 नवीन रुग्णाची नोंद करण्यात आली आहे आणि 87 हजार मृत्यू ची नोंद झाली आहे. विचार केला असता हा आकडा खूप मोठा असून दिवसदिवस प्रमाण वाढत चाललेले आहे.
ब्रेस्ट कॅन्सर सुरुवातीचे लक्षणे breast cancer
- बहुतेक महिलाना सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत म्हणून लवकर ओळखणे थोडे अवघड आहे परंतु पुढील काही लक्षणे आहेत जे बहुतेक रुग्णामध्ये दिसून आले आहेत
- स्तनात गाठ तयार होते आणि स्पर्श केल्यास वेदना जाणवत नाहीत
- स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडतात
- स्तनाच्या त्वचेवर रंग व पोत बदलतो / आकार बदलतो
- स्तनच्या समोरील बोडशीला मध्ये बदल झाल्यासारखा दिसतो
- बोंडशीतून रक्त अथवा रंगहीन स्राव येतो. ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे
ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) होण्याची कारणे breast cancer
महिलामधील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे नेमके व अचूक कारण अजून कुणालाही माहिती नाही, परंतु असे काही अनेक घटक आहेत जे रोग विकसित होण्यासाठी मदत करतात. ही घटक पुढील प्रमाणे
- वय
- वय यामधील अतिशय महत्वाचा आणि सहाय्य करणारा घटक मानल्या जातो वयवर्ष 35 ते 45 वयोगटातील महिलामध्ये यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे अश्या वेळी या वयोगतील महिलाना जास्त लक्ष्य देणे गरजेचे आहे कारण वयानुसार स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
- कौटुंबिक इतिहास
- आई, बहीण किंवा मुलीला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले असल्यास, विशेषत: लहान वयात, धोका वाढतो. तथापि, स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या बहुतेक महिलांना ज्ञात कौटुंबिक इतिहास नसतो.
- जीवनशैली
- यामध्ये ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे , ज्या महिला मद्यपान आणि तंबाखूचे सेवन करतात, कामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे ज्यांच्या शरीराची हालचाली खूप कमी कमी आहे अश्या महिलाना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
- हार्मोन्स
- नैसर्गिकरित्या किंवा हार्मोन थेरपीद्वारे, महिला संप्रेरकांच्या संपर्कात आल्याने धोका वाढू शकतो.
- इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन – हे स्त्री लैंगिक संप्रेरक मुख्य हार्मोन्स आहेत. ते स्तनाच्या ऊतींच्या वाढीस प्रोत्साहन देतात जे सामान्य आहे. तथापि, दीर्घकाळापर्यंत ह्याचे प्रमाण वाढत गेल्यास स्तन कर्करोगाचा धोका वाढवू शकते
- लाइफटाइम एक्सपोजर मॅटर – एस्ट्रोजेनच्या संपर्कात स्त्रीला (तिच्या मासिक पाळीच्या संपूर्ण वर्षात) जितका जास्त काळ असतो, तितका संभाव्य धोका जास्त असतो. हे स्पष्ट करते की मासिक पाळी लवकर सुरू होणे किंवा रजोनिवृत्ती उशिरा जाणे यासारख्या घटकांचा संबंध वाढलेल्या जोखमीशी का असू शकतो.
- गर्भधारणा आणि स्तनपान :- याउलट, गर्भधारणा आणि स्तनपान हे संरक्षणात्मक घटक मानले जातात. ते इस्ट्रोजेन चे संपूर्ण आयुष्यभर एक्सपोजर कमी करतात.
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) – रजोनिवृत्तीच्या लक्षणांसाठी वापरली जाणारी एकत्रित HRT (इस्ट्रोजेन प्लस प्रोजेस्टिन) स्तनाच्या कर्करोगाचा धोका किंचित वाढवू शकते, विशेषत: खूप दिवस वापराने. म्हणूनच एचआरटी पर्यायांवर चर्चा करताना डॉक्टर जोखीम आणि फायद्यांचे काळजीपूर्वक समजून सांगतात. एकंदरीत शरीरातील पेशींची जेव्हा अनिर्बंध वाढ होऊ लागते तेव्हा कॅन्सर ची लागण व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे जेव्हा स्तनातीलपेशींची अनिर्बंध वाढ होते तेव्हा स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे दिसू लागतात. स्तनाच्या पेशीत होणाऱ्या बदलांचा संबंध स्त्री हार्मोन्स इस्ट्रोजेन ह्याच्याशी संबंध असल्याचे काही संशोधनामधून समोर आले आहे.महिलांमध्ये वयोगट 35 ते 45 जास्त धोकाच्या वयोगट सोबत 45 वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या कुटुंबात कॅन्सर चा इतिहास आहे अशा महिलाना स्तनाच्या कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. ज्या महिलांची मासिक पाळी लवकर वयाच्या अगोदर सुरू झाली आहे, किंवा ज्या महिला गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित हार्मोन्स च्या गोळ्या खातात, अशांमध्ये महिलाना स्तनाच्या कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असू शकते.
ब्रेस्ट कॅन्सर कशा ओलखवा.
महिलामधील स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी दोन मुख्य
पध्दतींचा समावेश होतो :- स्व-जागरूकता आणि वैद्यकीय तपासणी.
आत्म-जागरूकता
- ब्रेस्ट सेल्फ-परीक्षा (BSE) :- नियमितपणे BSE केल्याने तुम्हाला तुमच्या स्तनांची ओळख करून घेता येते आणि
कोणतेही बदल लक्षात येतात. नॅशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन कडून येथे एक मार्गदर्शक
आहे.पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती मिळेल.लिंक - बदलांबद्दल जागरूक रहा :- ढेकूळ,गाठ , स्तनाच्या आकारात होणार कोणताही बद्दळ , स्तनाग्र मधून स्त्राव येणे किंवा उलटे
होणे किंवा त्वचा मंद होणे आणि स्पर्श केल्यास
तो स्पर्शच्या न जाणवणे याकडे लक्ष द्या.
वैद्यकीय तपासणी :-
- मॅमोग्राम :- हे कमी डोसचे एक्स-रे हे स्तनाच्या कर्करोगासाठी प्राथमिक तपासणीचे साधन आहे . तुमचे वय आणि जोखीम घटकांवर आधारित
डॉक्टर नियमित मॅमोग्रामची शिफारस करतात. - इतर इमेजिंग चाचण्या :- तुमच्या परिस्थितीनुसार, तुमचे डॉक्टर स्पष्ट चित्रासाठी अल्ट्रासाऊंड किंवा MRI सारख्या अतिरिक्त
चाचण्यांची शिफारस करू शकतात.
बायोप्सी
- जर मॅमोग्राम किंवा इतर चाचणी चिंता वाढवते, तर कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती किंवा
अनुपस्थितीची पुष्टी करण्यासाठी बायोप्सी (ऊतींचे नमुना काढणे) आवश्यक आहे.
लक्षात ठेवण्यासाठी येथे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत:
- ढेकूळ म्हणजे नेहमी कर्करोग असा होत नाही, परंतु कोणतेही बदल तुमच्या डॉक्टरांना
कळवले पाहिजेत. - लवकर तपासणीमुळे उपचारांच्या यशाच्या दरात लक्षणीय सुधारणा
होते. - नियमित तपासणीची शिफारस केली जाते, परंतु तुमचे वय, कौटुंबिक इतिहास आणि जोखीम घटकांवर आधारित
तुमच्या डॉक्टरांशी वैयक्तिकृत योजनेची चर्चा करा.
सारांश
एकांतरीत ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण दिवसेदिवस वाढत चलेले आहे त्यामागील कारणे वर नमूद केल्या प्रमाणे आहेत. वेळीच खबरदारी घेतल्यास कॅन्सर पासून बचाव सुद्धा होऊ शकतो आणि जर सुरुवातीलाच लक्षात आले तर उपचार नंतर 100 % बरा होणार आजार आहे.