बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf :- बांधकाम कामगार योजना आज राज्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी योगदान ठरत आहे या या योजनेमार्फत फक्त कामगारांनाच लाभ मिळत नसून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा लाभ मिळत आहे. विवाहासाठी 30 हजारची मदत , शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, प्रधानमंत्री क्षम योगी मानधन योजनेचा लाभ , दवाखान्यात मोफत विलाज , होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध योजना यासारख्या अनेक योजनेचा लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. तर या लेखातून बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कशा भरावा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फ़त बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात ज्या मधून लाभार्थी यांना प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये लाभ मिळतो तर काही योजना मधून अप्रत्यक्ष लाभ मिळतो, याच योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातील कामगार असल्याची नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. सोबत नोंदणी अद्यावत करणे गरजेचे आहे. खाली बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf मध्ये उपलब्ध करून दिले आहे. माहिती पूर्ण वाचा.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वात तुम्हाला तुमची कामगार असल्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे जर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हला कोणत्याही योजनेचा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे बांधकाम कामगार योजना अंतर्गत येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अगोदर स्वतःची कामगार असल्याची नोंदणी करून करून घ्या. बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf चा ऑनलाइन कसा फॉर्म भरावा.
मशरूम शेती अनुदान मुळे शेतकऱ्याचा चांगला फायदा, A-Z माहिती
बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करावी
बांधकाम कामगार असल्याची नोंदणी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा करू शकता खाली ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

बांधकाम कामगार असल्याची नोंदणी करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा .
- सर्वात अगोदर पुढे दिलेल्या दिलेल्या लिंक वर क्लिक नोंदणी करण्याच्या वेबसाइट जा. बांधकाम कामगार नोंदणी
- आधार कार्ड नंबर आणि आधार शी जोडलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला नोंदणी करता येणार नाही.
- आधार कार्ड नंबर आणि आधार शी जोडलेला मोबाइल नऊ नंबर भरा
- otp भरा. फॉर्म मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये आहे. अर्ज करताना पुढील माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही अगदी सहज अर्ज करू शकता.
- नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा – जस की जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा जस की रेशन कार्ड , लाइट बिल
- ओळखपत्र पुरावा . जस की आधार कार्ड पॅनकार्ड
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/- भरावी लागेल
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे व त्याचे वय १८ ते ६० वर्षे वयोगटातील असावे
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कशा भरावा
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी एकदा का तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण केली की तुम्ही बांधकाम कामगार अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाचा फॉर्म भरू शकता त्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा.
- सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक,आरोग्य विषयीक योजना, आर्थिक विषयक योजना कोणत्या प्रकारच्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्याची निवड करावी
- त्या योजनेचा फॉर्म डाउनलोड करून त्यामध्ये कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ती माहिती समजून घ्यावे. त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करावी.
- फॉर्म भरताना आधार क्रमांक आणि आधार शी जोडलेले मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे त्याशिवाय खाते उघडणार नाही.
- त्यानंतर आपल्याला नेमका कोणत्या योजनेचा फॉर्म भरयचा आहे त्यावर क्लिक करून अर्ज प्रकिया पूर्ण करावी. खाली बांधकाम कामगार योजना फॉर्म pdf मध्ये उपलब्ध आहेत.
घरगुती व्यवसाय यादी ज्या मधून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता.
बांधकाम कामगार योजना फायदे
- शैक्षणिक सहाय्य : कामगारांच्या मुलांना क्रीडा शिष्यवृत्ती, टॅबलेट-लॅपटॉप वाटप , आणि शैक्षणिक पुस्तके भेट म्हणून दिली जातात, ज्यामुळे शिक्षणाला चालना मिळते. अतिशय गरीब कुटुंबातील मुले सुद्धा चांगले शिक्षण घेऊ शकतात .
- आरोग्य सुविधा : गंभीर आजारासाठी 1 लाखांचे आर्थिक सहाय्य, अपघातात 2 लाखांची मदत, मोफत आरोग्य तपासणी, आणि दवाखान्यात भरती असताना पत्नीस आर्थिक सहाय्य यासारख्या योजना उपलब्ध आहेत. सोबत आयुष्यमान भारत योजनेमधून 5 लाखाचा विलाज मोफत मिळतो
- सामाजिक सुरक्षा : पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये, मध्यान्ह भोजन योजना, जीवनज्योती व सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, आणि लांब पल्ल्याच्या सहली यामुळे कामगारांचे जीवन सुलभ होते.
- आर्थिक मदत : घरातील व कामासाठी आवश्यक असलेले औजारे खरेदीकरिता 5,000 रुपये, कामावर मृत्यूस 5 लाख, गृहपयोगी वस्तूंचे वाटप, आणि उत्कृष्ट कामासाठी बोनस यासारखे लाभ दिले जातात.
- घर बांधणी सहाय्य : अटल बांधकाम कामगार आवास योजनेत (शहरी/ग्रामीण) ग्रामीण भागासाठी 1.25 लाख आणि शहरी भागासाठी 2.5 लाख रुपये आणि घर खरेदी/बांधणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
- मातृत्व व शैक्षणिक शिष्यवृत्ती : नैसर्गिक प्रसूतीस 15,000 रुपये, शस्त्रक्रिया प्रसूतीस 20,000 रुपये, आणि पाल्यांना प्राथमिक ते वैद्यकीय शिक्षणासाठी 2,500 ते 1 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म कशा भरावा बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
सर्वाधिक वाचलेले
- नमो शेतकरी योजना लिस्ट कशी चेक करावी shetkari sanman yojana beneficiary list
- सोलर पॅनलसाठी सरकारी अनुदान आहे का??
- बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार २५०० ते ६०००० रु स्कॉलरशिप mahabocw scholarship