आपल्या देशात आणि राज्यात सामाजिक कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात . त्यापैकीच एक योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना होय या योजनेमधून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी जर शिक्षणासाठी घरापासून दूर राहत असेल आणि त्याला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात निवड नाही झाली तर अश्या विद्यार्थ्याना शिक्षणसाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मधून वार्षिक 51,000 हजार रुपरे आर्थिक सहाय्य पुरवले जाते आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ तर लेख पूर्ण वाचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजन हा एक सरकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांमध्ये, विशेषत: अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध (NB) समुदायांमधील उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणून ओळखली जाणारी, ही योजना शिक्षण शुल्क, बोर्डिंग, भोजन आणि इतर गरजा यासह शैक्षणिक खर्चासाठी ₹51,000 चे वार्षिक आर्थिक सहाय्य प्रदान करते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, जेवणासाठी आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.या लेखात आपण या योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती तपशीलवार जाणून घेणार आहोत. जसे महाराष्ट्र स्वाधार योजना इ. तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा लेख पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वीपणे अर्ज करू शकाल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना उद्देश
- या योजनेचा मुख्य उद्देश शाळा गळतीचे प्रमाण कमी करून आणि समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन SC आणि NB विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणास प्रोत्साहन देणे हा आहे
- शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे आणि गरिबीत राहणाऱ्या समुदायातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे
- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
- सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणे.
- विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रमुख लाभ
- आर्थिक मदत: विद्यार्थ्यांना दरवर्षी निश्चित रक्कम शासनाकडून दिली जाते.
- शैक्षणिक सुविधा: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाते.
- उच्च शिक्षणासाठी प्रवेश: या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध (NB) समुदायातील
- विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी अनेक फायदे देते:
- या योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी प्रति वर्ष ₹51,000.
- योजनेंतर्गत मिळालेल्या सहाय्याने, विद्यार्थी त्यांचे शिक्षण शुल्क, बोर्डिंग, भोजन आणि इतर शिक्षण संबंधित खर्च भागवू शकतात.
- योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीअंतर्गत वसतिगृहाची फी किंवा भाडे भरण्यासाठी मदत केली जाते.
- या योजनेत दिलेली रक्कम दैनंदिन अन्न खर्च देखील समाविष्ट करते.
- या योजनेत दिलेली रक्कम विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मदत करेल.
- ही योजना SC आणि NB विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळे कमी करून उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देईल.
- ही योजना सामाजिक समानतेला प्रोत्साहन देते, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवेश करणे सोपे होते.
- हे फायदे हे सुनिश्चित करतात की विद्यार्थी आर्थिक अडचणींची चिंता न करता त्यांचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना पात्रता
- विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातला असला पाहिजे.
- विद्यार्थीने दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेत निश्चित टक्केवारीने उत्तीर्ण झालेले असले पाहिजे.
- विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा कमी असले पाहिजे.
- विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत नसला पाहिजे.
स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्वाधार योजना कागदपत्रांची यादी सादर करावी लागेल:
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अंतिम पात्रता परीक्षेची गुणपत्रिका
- प्रवेश पुरावा (जसे की प्रवेशपत्र किंवा ओळखपत्र)
- विद्यालय / महाविद्यालकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
- बँक पासबुक प्रत किंवा बँक स्टेटमेंट
- निवास प्रमाणपत्र
- भाडे करार (लागू असल्यास)
- नवीनतम पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज कसा करावा.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाइन पोर्टलवर जाऊन पूर्ण करता येते. अर्ज करताना आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
अर्ज करण्याची ऑनलाइन पद्धत
- नवीन अर्ज भरावयाचा आसल्यास सर्वात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या पोर्टल वर जाऊन रजिस्टर करावे रजिस्टर केल्यावर नवीन नोंदणी आसा ऑप्शन दिसेल त्या वर क्लिक करून खाली दिलेल्या माहिती नुसार आर्ज भरावा
विद्यार्थीची प्राथमिक माहिती
१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे. , याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.
बँकेची माहिती
• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव , राष्ट्रीयकृत बँकेचे नाव , शाखा ,खातेक्रमांक , IFSC code ही सर्व माहिती अगदी अचूक भरावी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची सही
- जातीचा दाखला
- आधार कार्डाची प्रत
- बँकेत खाते असल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक
- महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा लोकेशन असलेला फोटो अपलोड करा
- महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
- बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा
- शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
- स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- मेस किंवा खानावळ यांची बिलाची पावती
- उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
- मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
- शपथपत्र / हमीपत्र
- भाडे करारनामा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज रिणीवल renewal कसा करावा.
- जर अर्ज चालू वर्षात रीनीवल करायचा असल्यास संबंधित पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन करून समोर असलेल्या रीनिवल या ऑप्शन वर क्लिक करून समोर आलेल्या पेज वर खाली दिलेली योग्य माहिती भरावी
- चालू वर्षाच्या बोनाफाईड जो तुम्हाला तुमच्या महाविद्यालायकडून मिळेल.
- मागील वर्षाचे गुणपत्रक
- जातीचा दाखला
- चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- भाडे करारनामा
- रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
- मेस / भोजनालय बिलाची पावती
- रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही
- ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स जोडून समाजकल्याण कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे
- अधिक माहितीसाठी:
- योजनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपण संबंधित जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा संबंधित शासकीय संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
- नोट: योजनेच्या अटी आणि शर्ती वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, या योजनेबाबतची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहा.
या लेखामधून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना काय आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे त्याच बरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रे आवश्यक आहे व अर्ज प्रक्रिया काय आहे याविषयी सविस्तर माहिती देलेली आहे . तुम्हाला माहिती कशी आम्हाला नक्की कळवा या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून सांगू शकता.
हे ही वाचा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२४! या योजनेचा लाभ कसा घ्या ?
- आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
- शेळीपालन शेड बांधकाम योजनेतून शेळीपालकांना मिळणार आता 25% ते 50% पर्यंत सबसिडी!
- शबरी आदिवासी घरकुल योजना:आता मिळणार सर्वाना आपल्या स्वप्नातील घर !
- काय आहे आषाढी वारी चा इतिहास आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक एवढी गर्दी का करतात