मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन मुलीचे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया (lek ladki yojana form pdf ) आता अधिक सुलभ करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.

नवीन प्रक्रियेनुसार लाभार्थी मुलींचे पालक आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी केली जाणार असून, आधार क्रमांकाच्या आधारे संबंधित आवश्यक माहिती ऑटो-फेच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना वारंवार विविध कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. lek ladki yojana form योजनेचा फॉर्म ची लिंक खाली दिली आहे.
पालकांची ई-केवायसी होणार का ?
- KYC मोठा बदल झाल्यामुळे आता नवीन नियमाप्रमाणे लाभार्थी मुलगी व तिचे आई ,वडील यांची आधार e-kyc करायची आहे, आधार oTP मार्फत ही e-kyc अतिशय जलद गतीने होते.
- एकदा का अर्ज केला की पुढील टप्याच्या लभा साथी लाभार्थी यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
बँक खात्याची स्वतंत्र माहिती देण्याची गरज नाही
- लेक लाडकी योजनेतील आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केला जाणार आहे. त्यामुळे अर्जाच्या वेळी बँक खात्याची स्वतंत्र माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या बँक मध्ये aadhar seeding आहे त्याच बँक खात्यामध्ये लाभाचे पैसे जमा होतील.
- याशिवाय, अर्ज करताना अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही. या सर्व बाबींमुळे पालकांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी होणार आहे.
जुन्या पात्र लाभार्थ्यांना एक संधी
Maharashtra Karj Mafi 2026: ₹36,585 कोटी कर्जमाफी योजना – पात्रता, लाभार्थी आणि अर्ज प्रक्रिया
- 1 एप्रिल 2023 पासून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे यापूर्वी पात्र असूनही काही कारणास्तव अर्ज करता न आलेल्या मुलींच्या पालकांना मोठी संधी मिळणार आहे.
- योजनेची सुधारित प्रक्रिया लागू करताना यापूर्वी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महत्त्वाची मुदत देण्यात आली आहे.
- मात्र, 15 ऑगस्ट 2027 नंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
लेक लाडकी योजनेत किती लाभ मिळणार ?
लेक लाडकी योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना एकूण ₹1,01,000 इतका आर्थिक लाभ टप्प्याटप्प्याने दिला जातो.
लाभाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे:
- मुलीच्या जन्मानंतर – ₹5,000
- इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर – ₹6,000
- इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यानंतर – ₹7,000
- इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर – ₹8,000
- मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर – ₹75,000
अशा प्रकारे विविध टप्प्यांमध्ये मिळून मुलीला एकूण ₹1,01,000 आर्थिक मदत मिळते.
योजनेसाठी कोण पात्र?
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रक्रिया सुलभ झाल्याने लाभार्थ्यांना मोठा फायदा
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करणे, आधारच्या माध्यमातून माहिती ऑटो-फेच करणे, ई-केवायसीची सुविधा, DBTद्वारे थेट आर्थिक लाभ आणि पुढील टप्प्यांसाठी पुन्हा अर्ज न करण्याची व्यवस्था यामुळे पालकांचा वेळ आणि कागदपत्रांची धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे.
- या सुलभीकरणामुळे अर्ज प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होऊन राज्यातील अधिकाधिक पात्र मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
लेक लाडकी योजना अर्ज नमुना | Lek Ladki Yojana Form PDF
लेक लाडकी योजनेसाठी अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील अधिकृत शासन निर्णय डाउनलोड करा
स्रोत: विविध शासकीय वेबसाइट
आवश्यक लिंक – lek ladki yojana form PDF
लेखन : सुनील घोडके
Last Updated: 13 September 2026

