Maharashtra Karj Mafi 2026: ₹36,585 कोटी कर्जमाफी योजना – पात्रता, लाभार्थी आणि अर्ज प्रक्रिया

माहिती आवडल्यास शेअर करा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली Karj Mafi ची बातमी अखेर समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी Karj Mafi च्या घोषणेवर अखेर शिक्कामोर्तब केले आहे. या योजनेअंतर्गत तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची Karj Mafi करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी अर्ज माफी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.

Karj Mafi
Karj Mafi

योजनेचे नाव आणि पार्श्वभूमी

या Karj Mafi योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे नाव देण्यात आले असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत बाकी असलेले २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून पाहिला जात आहे, आणि तो २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून प्रत्यक्षात उतरवण्यात आला.

Ajit Pawar vs Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आणि ‘फाईटबॅक’चा रंजक इतिहास

कोणाला किती लाभ मिळणार?

या Karj Mafi योजनेत दोन प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी, आणि दुसरे म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यामागचा उद्देश असा की, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अर्ज माफी चा फायदा मिळावा आणि नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन मिळावे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत एक महत्त्वाचे विधान केले होते – ज्या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे, त्याने वरचे ५० हजार रुपये स्वतः भरल्यास उर्वरित २ लाख रुपयांचे कर्ज Karj Mafi अंतर्गत माफ होईल, असे त्यांनी सांगितले होते.

अंमलबजावणीतील अडथळे आणि स्पष्टीकरण

ही Karj Mafi जाहीर करण्यास सरकारला काही काळ विलंब झाला, कारण त्यावेळी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. मात्र निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सूट दिल्यानंतर सरकारने अधिकृत घोषणेचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, विरोधकांकडून योजनेतील अटींवरून सातत्याने टीका होत होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Karj Mafi योजनेत कोणत्याही कठोर अटी लादण्यात आलेल्या नाहीत, तर जिल्हा सहकारी बँका आणि ग्रामीण बँकिंग व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना विषयी सविस्तर माहिती pm aawas yojana

फडणवीसांची भूमिका आणि ऐतिहासिक संदर्भ

विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ राबवण्यात आली होती. त्यामुळे Karj Mafi च्या बाबतीत फडणवीस यांचा हा दुसरा मोठा निर्णय ठरतो. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, आणि त्यासोबतच शेतीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावरही सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष

एकूणच, फडणवीस सरकारच्या या अर्ज माफी निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी, पात्रता निकष आणि GR (शासन निर्णय) याबाबतची पूर्ण स्पष्टता येणे अद्याप बाकी आहे. विरोधी पक्षांकडून या अर्ज माफी योजनेवर सुरू असलेली टीका पाहता, तिच्या यशस्वी अंमलबजावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे


माहिती आवडल्यास शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top