आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे, हेल्थकेअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी या योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये आरोग्य आणि निरोगीकरण केंद्र व राष्ट्रीय आरोग्य जन आरोग्य योजना या दोन प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी प्रत्येकी पाच ५ लाख रुपये त्यांना त्यांच्या उपचारासाठी आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते.
आयुष्मान भारत योजना इतिहास
राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या योजनेचे मुख्य उद्देश भारतातील सर्व लोकांना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेच्या अंतर्गत विविध योजनांची समावेश केला गेला आहे जसे की राष्ट्रीय आरोग्य विमा योजना, ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना, केंद्र सरकारची आरोग्य योजना, कर्मचारी राज्य विमा योजना इत्यादीं.
या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारची आरोग्य योजना १९५४ मध्ये सुरू केली गेली होती. या योजनेचे मुख्य उद्देश केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना व्यापक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करणे होते. ह्या योजनेची सुरुवात भुवनेश्वर, भोपाळ, चंदीगड आणि बंगलोरसारख्या शहरांमध्ये कार्यवित करण्यात आली होती आज संपूर्ण भारतभर लावू करण्यात आली आहे. दवाखाना ही योजनेचा कणा आहे.
कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ ?
PMJAY (आयुष्मान भारत योजना )प्रामुख्याने दारिदय रेषेखालील , गरीब , वंचित ग्रामीण कुटुंबे आणि 2011 च्या सामाजिक आर्थिक जात जनगणना नुसार ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी असून राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत (RSBY) सक्रिय कुटुंबे आणि शहरी व्यावसायिक कामगारांच्या कुटुंबांकडे लाख केंद्रित करते. 10 कोटींहून अधिक कुटुंबे PMJAY अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. पुढे आपण पाहुयात कि कोणकोणत्या आजारावर या योजने अंतर्गत उपचार पुरवल्या जातो.
आयुष्मान भारत योजना सुविधा
- वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्लामसलत
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी
- औषध आणि वैद्यकीय उपभोग्य वस्त
- गहन काळजी सेवा ( ICU सारख्या सेवा )
- निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
- वैद्यकीय रोपण सेवा (आवश्यक असेल तेथे)
- निवास लाभ -रुग्ण व त्याचा एक नातेवाईक
- अन्न सेवा -रुग्ण व त्याचा एक नातेवाईक
- रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलो-अप काळजी
आयुष्मान भारत योजना आवश्यक कागदपत्रे
- आयुष्मान भारत योजना लाभ घेण्यासाठी आपणाला आपण पात्र आहोत कि नाही हे तपासून स्वतःची नोंदणी करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण नोंदणी नंतर मिळणाऱ्या कार्ड च्या आधारे आपण भारतातील कोणत्याही जिल्हा आणि योजने अंतर्गत अंगीकृत केलेल्या दवाखान्यात ५ लाखांपर्यत मोफत इलाज करू शकतो.
- आयुष्मान भारत योजने सोबत जर या योजनेचा फायदा घेतला तर तुम्हाला तब्बल 7.5 लाखाचा मोफत विलाज मिळेल.
- ओळखीचा पुरावा आणि वयाचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- संपर्क तपशील जसे की फोन नंबर, पत्ता, ईमेल आयडी इ.
- तुमच्या कुटुंबाची सद्यस्थिती सांगणारे दस्तऐवज
- राशन कार्ड
आयुष्मान भारत योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेमध्ये नोंदणीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी. जेणेकरून योजनेचा लाभ मिळताना कोणताही अडचण येणार नाही.
- सर्वप्रथम प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) वर जा आणि तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांची छायाप्रत सबमिट करा.
- यानंतर, आपले सरकार सेवा केंद्र (CSC)चा एजंट सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योजनेअंतर्गत नोंदणीची खात्री करेल आणि तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करेल.
- यानंतर, १५ ते २० दिवसांनंतर, csc आपले सरकार सेवा केंद्रकडून तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड दिले जाईल.त्यावेळी तुमची नोंदणी यशस्वी झालेली असेल. आणि तुम्ही या योजनेच्या अंतर्गत आता लाभ घेण्यास पात्र असाल.
आयुष्मान भारत योजना ग्रामीण भागातील लाभार्थी
- कच्च्या भिंती असेलल्या व फक्त एक खोली कुटुंबे
- 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही अशी कुटुंबे H
- 16 ते 59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेली महिला प्रमुख कुटुंबे
- सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नाही.
- SC/ST कुटुंबे.
- भूमिहीन (ज्याना शेती नाही असे शेतकरी) कुटुंबे त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग मजुरीमधून /शारीरिक कष्टाच्या कामातून मिळवतात.
- निवारा नसलेली कुटुंबे.
- निराधार/ भिकेवर जगणारे
- सफाई कामगार कुटुंबे
- बंधपत्रीत मजुरांची कायदेशीर सुटका झालेले मजूर
आयुष्मान भारत योजना शहरी भागातील लाभार्थी
- रंग पिकर
- भिकारी
- घरकामगार
- रस्त्यावर काम करणारा,मोची,फेरीवाला,इतर सेवा प्रदाता
- बांधकाम कामगार, प्लंबर , मजूर , पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक,कुली आणि दुसरा हेड-लोड कामगार
- सफाई कामगार , स्वच्छता कर्मचारी,माळी
- घर-निराधार कामगार, कारागीर, हस्तकला कामगार, टेलर शिंपी
- वाहतूक कर्मचारी, चालक, कंडक्टर, ड्रायव्हर आणि कंडक्टर, कार्ट पुलर, रिक्षाचालक
- दुकानातील कामगार, सहाय्यक, छोट्या आस्थापनातील शिपाई, मदतनीस, वितरण सहाय्यक,परिचर,वेटर
- इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक,असेंबलर, दुरुस्ती कामगार
आयुष्मान भारत योजना आजार यादी
आयुष्मान भारत योजना मधून विलाज होणाऱ्या आजारांची यादी खाली दिलेली आहे त्यामध्ये आजारचे प्रमुख प्रकार आहेत त्या नुसार किती प्रकारचे आजारवर विलाज केल्या जातील त्याची माहिती दिलेली आहे.
अनु.क्र | Specialty | एकूण आजारावरील उपचार |
---|---|---|
1 | Burns Managemnt जाळीत विभाग | 12 |
2 | Cardiology हृदयरोग | 39 |
3 | Cardio-theoracic & Vascular surgery हृदय रोग -थोरॅसिक आणि रक्तवहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया | 92 |
4 | Emergency room Package आपत्कालीन कक्ष पॅकेजेस (काळजीसाठी १२ तासांपेक्षा कमी मुक्काम आवश्यक आहे) | 4 |
5 | General Medicine सामान्य औषध | 72 |
6 | General Surgery सामान्य शस्त्रक्रिया | 253 |
7 | Interventional Neuroradiology इंटरव्हेंशनल न्यूरोरॅडियोलॉजी मेंदूसंबंधित | 15 |
8 | Medical Oncology वैद्यकीय ऑन्कोलॉजी | 52 |
9 | Mental Disorders Packages मानसिक विकार पॅकेजेस | 17 |
10 | Neo-natal care Packages नव-प्रसव काळजी पॅकेजेस | 10 |
11 | Neurosurgery न्यूरोसर्जरी मेंदूचे ऑपरेशन | 83 |
12 | Obstetrics &Gynaecology प्रसूती आणि स्त्रीरोग | 79 |
13 | Ophthalmology नेत्ररोग | 42 |
14 | Oral and Maxillofacial Surgery तोंड आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया | 9 |
15 | Orthopaedics ऑर्थोपेडिक्स ,हाडासंदर्भात | 101 |
16 | Otorhinolaryngology , ओटोरहिनोलरींगोलॉजी | 94 |
17 | Paediatric Medical management , बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन | 102 |
18 | Paediatric surgery,बालरोग शस्त्रक्रिया | 34 |
19 | Plastic & Reconstructive Surgery, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया | 9 |
20 | Polytrauma, पॉलीट्रॉमा | 12 |
21 | Radiation Oncology, रेडिएशन ऑन्कोलॉजी | 14 |
22 | Surgical Oncology , सर्जिकल ऑन्कोलॉजी | 48 |
23 | Urology मूत्रविज्ञान | 161 |
24 | Paediatric Cancer, बालरोग कर्करोग | 38 |
25 | Unspecified Surgical Package,अनिर्दिष्ट सर्जिकल पॅकेज | 1 |
या लेखामधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून Ayushman bharat yojna आयुष्मान भारत योजनेमधून मिळवा ५ लाखाचा मोफत विलाज ,कस कळेल कि आपलं नाव यादीत आहे कि नाही व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम अंतर्गत तुमच्या गावात कोणती कामे झालेत पहा 1 मिनिटात
- आभा कार्ड ऑनलाइन नोंदणी/ रजिस्ट्रेशन कसे करावे. या कार्डचे अनेक फायदे आहेत
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल वाचा नेमके कोणते बदल झालेलं व सोबत शसनाचा GR
- प्रधानमंत्री बालिका अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यावा!