रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे आणि अर्ज करा अगदी सोप्या पद्धतीने

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड नाव वाढवणे किंवा आपल्या जुन्या रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांची नोंदणी कशी करता येईल या विषयी माहिती जाऊन घेणार आहोत. जेव्हा तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येतो तो लग्न करून तुमची घरची सून असू शकते किंवा तुम्हला झालेले मूल , बाळ असू शकते त्यांचे नाव तुमच्या जुन्या राशन कार्ड मध्ये जोडणे हे अतिशय महत्वाच काम आहे कारण जर त्या व्यक्तीचे नाव तुमच्या रेशन कार्ड वर नसेल तर त्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबाचा सदस्य समजले जात नाही सोबत त्यांना घरकुल, व इतर महत्वाच्या योजनेचा लाख घेता येत नाही म्हणून वेळीच तुम्ही रेशन कार्ड मध्ये त्यांचं नाव नोंदवणं गरजेचं आहे म्हणून आज च्या लेखात आपण नाव जोडण्यासाठी लागणारे कोणकोणते महत्वाचे कागदपत्र आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने नोंदणी कशी करू शकतो याविषयी माहिती पाहणार आहोत

रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे
रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे

रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे

रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे कोणकोणते अतिशय महत्वाचे आहेत हे समजून घेताना या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कि तुम्ही कुणाचे नाव जोडण्याचा विचार करत आहेत जर लग्न होऊन सून आली असेल आणि त्यांचे नाव तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मध्ये जोडण्याचा विचार करत असाल तर ओळखपत्र , रहिवाशी पुरावा , लग्न झाल्याचा पुरावा देणे गरजेचं आहे सोबत जर तुम्ही तुमच्याच कुटुंबातील लहान मुलाचे म्हणजे तुमच्या आपत्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा जन्माचा पुरावा व इतर कागदपत्रे जोडणे गरजेचे आहेत. खाली सर्व कागदपत्रे सविस्तर दिले आहेत.
ओळखपत्र : ज्या वरील नाव जोडण्यासाठी इच्छुक व्यक्तीची ओळख पटेल

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • जन्म प्रमाणपत्र
    ( यापैकी कोणतेही दोन ओळख तर देणे गरजेचे आहे.)

पत्ता पुरावा : ह्या कागद्पत्रामुळे नाव जोडण्यासाठी इच्छुक व्यक्ती त्याच पत्त्यावर राहत असल्याची ओळख पटेल

  • विद्युत बिल/ लाइटबिल
  • पाणी बिल
  • टेलिफोन बिल
  • मालमत्ता कर रसीद
  • आधार कार्डमधील पत्ता

इतर महत्वाचे पुरावे 

  • लग्नाचे प्रमाणपत्र (जर तुम्ही पत्नी/पतीचे नाव वाढवत असाल तर)
  • जन्म प्रमाणपत्र (जर तुम्ही मुलाचे नाव वाढवत असाल तर)
    इतर कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र

रेशन कार्ड नाव वाढवणे साठी तुम्ही अर्ज कसा करू शकता.

रेशन कार्ड नाव वाढवणे साठी दोन अतिशय सोप्या पद्धती आहेत जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याचा अनुभव असेल तर तुम्ही स्वतःला आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्या रेशन दुकान चालक व्यक्तीना भेटून तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता आज आपण दोन्ही पद्धतीचे कसा अर्ज करता येईल आणि कोणत्या नंबर चा फॉर्म भरून द्यावा लागतो तो समजून घेणार आहोत.

रेशन कार्ड नाव वाढवणे तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता.

  • वर दिलेले सर्व कागदपत्रे आपल्या कडे आहेत याची खात्री झाल्यानंतर
  • आपल्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन.
  • वेबसाइट वरील फॉर्म क्रमांक 3 डाऊनलोड करा.
  • फॉर्म-3 मध्ये रेशन कार्ड संदर्भातील सर्व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा, सोबत ज्या व्यक्तीचे नाव नव्याने जोडायचे आहे, त्याची माहिती भरा.
  • भरलेल्या अर्जावर आपली सही किंवा अंगठ्याचा ठसा करा.
  • अर्ज भरल्यानंतर तो CSC केंद्र किंवा महाराष्ट्र अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करा.
  • CSC केंद्र किंवा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य या वेबसाइट कडून एक पावती मिळेल ती जपून ठेवावी.
  • काही दिवसात तुमच्या रेशन कार्ड नाव वाढवणे हि प्रकीर्या पूर्ण झाली असेल आणि संबंधित नवीन नावाची नोंद झाल्याचे तुम्हाला लावण्यात येईल तुम्ही ती पावती घेऊन तुमच्या रेशन दुकानदाराकडून नवीन व्यक्तीचे नाव रेशन कार्डाच्या मागच्या बाजूला नोंदवू शकता.

रेशन कार्ड नाव वाढवणे आता तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. ते कसा करायचा वाचा खालील लेख

  • जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास इच्छुक नसाल तर आपल्या कुटुंबात नवीन आलेल्या सदस्याचे नाव रेशन कार्ड नाव वाढवणे साठी ऑनलाइन तुम्ही ऑफलाइनही अर्ज करुु शकता.
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शहरातील पालिका किंवा MCD कार्यालय किंवा जर तुम्ही गावात राहत असाल तर तुमच्या ग्राम पंचायत कार्यालयात संपर्क साधायचा आहे आणि रेशन कार्ड फॉर्म क्रमांक-3 मिळेल.
  • आता फॉर्म काळजीपूर्वक भरा. आणि सोबत सर्व मागितलेली कागदपत्रे जोडावीत. आणि संबधित व्यक्तीने सही किंवा अंगठा देऊन अर्ज पूर्ण करायचा आहे.
  • अर्ज सोबत काही पावती शुल्क असल्यास ते भरावे आणि अर्ज कार्यालयात जमा करावा.
  • पुढील 15 दिवसात तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्ड वर रेशन दुकानदारा कडून जोडण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग  website ला भेट द्या.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे आणि अर्ज करा अगदी सोप्या पद्धतीनेव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top