State bank of Maharashtra selection process : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक उमेदवार विविध पदासाठी अर्ज करत आहेत. अनेक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र याची निवड प्रकिया कशी होते हे माहिती नाही तर या लेखात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. खाली अर्ज करण्याची लिंक आणि pdf जाहिरात सुद्धा दिली आहे.

निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीवर प्रामुख्याने आधारित असेल आणि उमेदवारांनी सत्यापनासाठी मुलाखतीस उपस्थित राहताना मुलाखत कॉल लेटरचे/मेल द्वारे मुलाखतीसाठी बोलवल असल्यास प्रिंटआउट, जन्म तारखेचा पुरावा जसे की जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे प्रमाणपत्र, दहावी नंतरची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, नोकरीचा अनुभव असल्यास संबधित दर्शवणारी प्रमाणपत्रे ( अनुभव प्रमाणपत्र,पगार पावती , फॉर्म नो 16 ) , उमेदवार आरक्षित प्रवर्गातील असल्यास संबंधित जातीचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असल्यास संबधित उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच उमेदवार माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र किंवा अपंग असल्याचे प्रमापत्र अशी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे स्वतःसोबत ठेवावीत व मुलाखतीदरम्यान तपासणीस सादर करावीत.
State bank of Maharashtra selection process
- प्राथमिक शॉर्टलिस्टिंग
- उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि योग्यतेच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यामुळे अर्ज करताना आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावेत.
- पात्रता निकष पूर्ण करणे हे निवडीसाठी हमी नाही. कुणाची दिवड करायची याची पूर्ण अधिकार बँक ऑफ महाराष्ट्र याच्या कडे राखून ठेवण्यात आले आहेत याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- अतिरिक्त पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- मुलाखत आणि परीक्षा (आवश्यक असल्यास)
- निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल/SMS द्वारे मुलाखतीची तारीख, वेळ आणि स्थळ कळवले जाईल. व्यक्तिगत मुलाखत (100 गुणांची) घेतली जाईल. किमान पात्रतेसाठी गुण:
- 50 गुण (सामान्य/OBC)
- 45 गुण (SC/ST/PwBD)
- अर्जांची संख्या जास्त असल्यास, लेखी परीक्षा देखील होऊ शकते.
- परीक्षा घ्यायची की नाही हे किती उमेदवार शॉर्टलिस्टिं होतात यावर अवलंबून आहे.
अंतिम निवड आणि नियुक्ती
पद श्रेणी (Scale) | चाचणी कालावधी (Probation Period) | बॉंड रक्कम (₹) | किमान सेवा कालावधी |
स्केल VII | 6 महिने | 2.00 लाख | 2 वर्षे |
स्केल VI | 6 महिने | 2.00 लाख | 2 वर्षे |
स्केल V | 6 महिने | 2.00 लाख | 2 वर्षे |
स्केल IV | 6 महिने | 2.00 लाख | 2 वर्षे |
स्केल III | 6 महिने | 2.00 लाख | 2 वर्षे |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया कशी करावी 2025 | येथे क्लिक करा |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “बँक ऑफ महाराष्ट्र भरती निवड प्रकिया! नियुक्ती ! State bank of maharashtra selection process” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे ही वाचा
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलिकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत मिळणार ४ एक्कर शेती , वाचा पूर्ण माहिती
- 2005 पूर्वी नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू होणार
- UGC नेट परीक्षा 2025 , तारखा जाहीर जानेवारी महिन्यात होणार परीक्षा, ऑनलाइन अर्ज ह्या तारखेपासून सुरू, अधिकृत सूचना, अर्ज करण्यासाठी थेट लिंक आणि बरेच काही
- कोचीन शिपयार्ड भर्ती 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 224 जागांसाठी भरती
- पोस्ट मास्टर भरती 2025 ,एकूण पदे 21,413।जाहिरात । ऑनलाइन अर्ज करा post master bharti 2025