PMAY Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत आता प्रत्येकाच होईल स्वप्नातील, भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि लोकसंख्येच्या देशात, ‘घर’ ही संकल्पना निव्वळ आश्रयाच्या पलीकडे आहे. ते सुरक्षा, प्रतिष्ठा आणि आपलेपणाचे प्रतीक आहे. मात्र, लाखो भारतीयांचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न आर्थिक अडचणी आणि सामाजिक विषमतेमुळे आधुरेच राहिले आहे. ही महत्त्वाची गरज ओळखून, भारत सरकारने 25 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली, सन 2024 मध्ये या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात दोन कोटी घरे बांधण्याचे उदिष्ट आहे.”सर्वांसाठी घरे “ही या योजनेची संकल्पना आहे.
दृष्टी आणि उद्दिष्टे:
- PMAY चे एकाच लक्ष्य आहे की . प्रत्येक भारतीयाला त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता त्यांच्या डोक्यावर छप्पर असावे याची खात्री करणे. PMAY ची प्राथमिक उद्दिष्टे बहुआयामी आहेत:
- सर्वांसाठी घरे :- PMAY चे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करणे जे शहरी किंवा ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत, ज्यामुळे 2022 पर्यंत सर्व नागरिकांसाठी घरे मिळतील हे सुनिश्चित करणे.
- परवडणारी घरे: PMAY च्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे परवडणाऱ्या घरांच्या युनिट्सच्या विकासास प्रोत्साहन देणे. ज्यात अनुदान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
- झोपडपट्टी पुनर्विकास: PMAY झोपडपट्ट्या आणि अनौपचारिक वसाहतींच्या पुनर्विकासावर भर देते, त्यांच्या रहिवाशांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि अधिक सन्माननीय राहणीमान प्रदान करण्याच्या उद्देशाने. हे केवळ जीवनाचा दर्जा सुधारत नाही तर सामाजिक समावेशकता आणि शहरी नूतनीकरणाला चालना देते.
- क्रेडिट-लिंक सबसिडी: अनेक इच्छुक घरमालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी ओळखून, PMAY पात्र लाभार्थ्यांना क्रेडिट-लिंक सबसिडी देते, ज्यामुळे गृहकर्ज परतफेडीचा भार कमी होतो आणि घरे अधिक परवडणारी बनवतात.
- PMAY चे घटक:
- शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येच्या विविध घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी PMAY ची रचना दोन मुख्य घटकांमध्ये केली आहे:
प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U):
- PMAY-U शहरी गरिबांना EWS, LIG आणि MIG विभागांसह परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते.
- यामध्ये नवीन घरांचे बांधकाम, विद्यमान घरांची वाढ, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आणि लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणे किंवा वाढ करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
- पात्र लाभार्थ्यांना गृहकर्जावरील व्याज अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे घरमालकीची किंमत कमी होते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण :
- PMAY-G ग्रामीण लोकसंख्येला लक्ष्य करते आणि त्यांना परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवते.
- या घटकांतर्गत, पात्र लाभार्थींना त्यांच्या घरांच्या बांधकामासाठी किंवा वाढीसाठी, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
प्रधानमंत्री आवास योजने साथी कोण पात्र आसते
- 18 वर्षापेक्षा जास्त व 55 वर्ष वयाचा भारतीय नागरिक यामध्ये नोंदणी करू शकतात
- भारतात त्याचे कुठेही पक्के घर नसले पाहिजे
- घर घेण्यासाठी आधी कोणतीही सरकारी निधी घेतला नाही पाहिजे
- उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (EWS),निम्न उत्पन गट(LIG),व माध्यम उत्पन्न गट (MIG) या गटामद्धे यायला हवा.
- लाभार्थी मध्ये पती,पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश होतो
- PMAY चे लाभ काय आहेत ?
- गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाना पक्के घर
- PMAY अंतर्गत 2.5 लाख रुपयाची सबसिडी दिली जाते
- योजना मध्ये उत्पन्न नुसार लोन आणि त्यावर सबसिडी दिली जाते
PMAY योजना सबसिडी कॅल्कुलेटर :
- सबसिडी मोजण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल https://pmaymis.gov.in/ वर जावे लागेल
- होम पेज वर सबसिडी कॅल्कुलेटर या विकल्पावर क्लिक करावे लागेल
- तुमच्या समोर समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आर्थिक उतपन्न ,कर्जाची राशी व कर्जाची अवधि भरावी लागेल.
- ही माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर सबसिडी ची गणना येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ?
- प्रथम PMJAY च्या अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर जावे.
- त्यानंतर मुख्य पेजवर नागरिक आकलनाच्या पर्यायावर क्लिक करावे
- क्लिक केल्यानंतर ‘ऑनलाइन आवेदन ‘या पर्यायावर क्लिक करावे.
- ऑनलाइन आरज भरण्यासाठी ‘ईन टू स्लम रिडेवलोपमेन्ट’या पर्यायावर जा ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि नाव भरून त्याला verify करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर formate A येईल. ज्यामध्ये राज्य, जिल्हा,तालुका शहर गाव ,कुटुंब प्रमुखचे नाव ,लिंग,आयुष्मान ,संपर्क ,आणि स्थायी पत्ता याची माहिती भरावी. त्यानंतर आधार नंबर,आणि ओळखीचा पुरावा द्यावा
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर स्क्रीन वर दाखवलेला captcha भरून अर्जाला सबमीट कराव.
PMAY साठी ऑफलाइन अर्ज कसा करायचं ?
- तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँक किंवा CSCकेंद्रा जे की या योजनेसाठी काम पाहतात तेथे जावे लागेल.
- यासाठी तुम्हाला मात्र 25 रूपय शुल्क लागेल
- अर्जमाधील माहिती भरून तो अर्ज त्या केंद्रावर द्यावा
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जाची स्थिति कशी पाहायची ?
- तुमचं अर्ज स्वीकारला किंवा नाही हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता त्यासाठी तुम्हाला PMAY वर क्लिक करून वेबसाइट वर जाऊन तुमच्या नोंदणी केलेल्या नंबर व असेसमेंट आयडी भरून तुमच्या अर्जाची स्थिति समजू शकता.
- प्रधानमंत्री आवास योजना लिस्ट मध्ये आपले नाव कसे पहायचे ?
- प्रथम अधिकृत वेब साईट website वर जाऊन सिटिजन अससेसमेंट पर्याय निवडून Track your asesment status वर क्लिक करावे
- तेथे तुमचं रजिस्टर नंबर भरून दिलेली माहिती भरावी त्यानंतर क्लिक करून आपले नाव आहे का नाही पहावे
- PMAY टोल फ्री नंबर :
- जर तुम्हाला या योजनेसंबंधी काही प्रश्न आसतील किंवा काही तक्रार असेल तर तुम्ही खालील अधिकृत टोल फ्रीनंबर व ईमेल आयडी वर करू शकता
- टोल फ्री नंबर:011-23060484
- ईमेल आयडी :pmaymis-mhupa@gov.in.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून PMAY Pradhan Mantri Awas Yojana आता प्रत्येकाच होईल घर या योजने अंतर्गत मिळणार एवढी रक्कम..व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजना समाज कल्याण विभाग २०२३
- स्टैंड-अप इंडिया योजनेमधून घ्या 10 लाख ते 1 कोटी पर्यत कर्ज …
- NBMMP राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन योजनेंतर्गत मिळतंय 16000 रुपयाचे अनुदान आजच करा अर्ज
- उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई-श्रम कार्ड देऊन अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत . आजच जाणून घ्या ई-श्रम कार्ड चे फायदे
- श्रम योगी मानधन योजना (PM-SYM ) योजनेंतर्गत मिळणार 36000 पेंशन Sharm Yogi Maandhan Yojana