आज भारतामध्ये आरोग्य संदर्भात अनेक योजना चालवल्या जातात ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अतिशय महत्वाच्या आणि सर्व सामान्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. 2012 साली जेव्हा या योजनेची सुरुवात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील काही निवडक जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आली तेव्हा या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजना असे होते त्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले. 2013 नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली. योजनेच्या सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येत होता पण वेळेनुसार या योजनेचा विस्तार करण्यात आला आणि आता इतर लाभार्थी गटाला सुद्धा या योजनेमद्धे समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या लेखामधून आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी प्रक्रिया समजून घेणूयात जेणेकरून योजनाचा लाभ घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी करणे
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा म्हणजे त्या योजनेची संपूर्ण प्रकिया समजून घेणे आले. नेमका त्या योजनेमधून काय लाभ मिळतो हे समजून घेणे आले सोबत त्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, लाभाचे स्वरूप काय आहे , योजनेचा लाभ घेणीसाठी अटी आणि शर्ती काय आहेत , कागदपत्र कोण-कोणते लागतात. आवश्यक कागदपत्र उपलब्ध आहेत की नाही आणि जर काही कागदपत्र उपलब्ध नसतील तर टे कसे आणि कुढून काढायचे ही संपूर्ण प्रकिया समजून घेणे अतिशय महत्वाची आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी करताना आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही हे समजून घेणे गरजेच आहे. सोबत नाव नोंदणी करताना आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे पुढील लेख अतिशय काळजीपरूक वाचा.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता.
लाभार्थी पात्रता समजून घेताना त्याचे 3 गटामध्ये मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे आणि त्याच वर्गीकरणानुसार लाभार्थी ची ओळख पटवण्याचे सुद्धा 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पुढील तक्ता मध्ये माहिती सविस्तर नमूद केली आहे.
गट | लाभार्थी पात्रता वर्णन |
गट A | पिवळे रेशन कार्ड , अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड (AAY), अन्नपूर्णा रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड (वार्षिक उत्पन्न ₹ 1,00,000 पर्यंत) वरील सर्व रेशन कार्ड धारक कुटुंबांना नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी देण्यात आले असे सर्व लाभार्थी पात्र आहेत. |
गट B | महाराष्ट्रातील 14 शेतीकरी जे दुष्काळ मुळे आणि इतर कारणामुळे त्यांची शेतीव्यवसाय अडचणीत असलेल्या जिल्ह्यांतील पांढरे रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबे (औरंगाबाद, ( छत्रपती संभाजी नगर ) जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद (धारशिव ) अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा). या जिल्ह्यातील लाभार्थी पात्र आहेत. |
गट C | शासकीय अनाथाश्रम आणि शासकीय शालेलील मुले,मुली , शासकीय महिला आश्रमातील महिला कैदी आणि वृद्धाश्रमातील 65 वर्षा पेक्षा जास्त असलेले नागरिक. DGIPR ने मंजूरी दीलेले पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे थेट नोंदणीकृत असलेले कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. |
गट D | महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त झालेला महाराष्ट्र/भारताबाहेरील रुग्ण |
गट E | महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील ६५ गावांतील खाली नमूद केलेली शिधापत्रिकाधारक कुटुंबे अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड प्राधान्य गट रेशन कार्ड अन्नपूर्णा योजना रेशन कार्ड |
लाभार्थी ओळख आणि आवश्यक कागदपत्र
- लाभार्थीच्या आधार कार्ड किंवा आधार नोंदणी पावती असेल तरी चालेल. आधार कार्डचा एक ओळख दस्तऐवज धरला मानला जाईल जर आधार कार्ड नसेल तर इतर एक फोटो असेलेले प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र मानले जाईल.
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- कोणतेही वाहन चालक असल्याचा परवाना
- विद्यार्थ्यांसाठी शाळा/कॉलेज ओळखपत्र
- पासपोर्ट
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
- RGJAY/MJPJAY चे हेल्थ कार्ड
- अपंगत्व प्रमाणपत्र
- फोटो असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड
- सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
- सागरी मत्स्यपालन ओळखपत्र (कृषी मंत्रालय / मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र सरकार द्वारे जारी केलेले).
- महाराष्ट्र सरकार/भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो असलेला ओळखपत्र
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी करताना हे समजून घेण गरजेच आहे की या योजनेचा ऑनईलाईन अर्ज करता येत नाही जेव्हा तुम्ही उपचारासाठी दवाखान्यात जाता तेव्हाच तुम्हाला या योजेनेची अर्ज प्रकिया करावी लागते. वरील पात्रता वाचल्या नंतर हे लक्षात येईल की कोण पात्र आहे आणि कोण पात्र नाही एकदा का हे लक्षात आले की पुढील प्रक्रिया समजून घ्यायला सोप जाईल.
- महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष रुग्णालयास भेट द्यावी लागेल या योजनेनंतर्गत जे रुग्णालय जोडल्या गेलेले आहे अश्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कोपरा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी उपचारासाठी आलेल्या रुग्णाची नाव नोंदणी करण्यासाठी आरोग्य मित्र नावाच्या पदाची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली आहे. सदरील व्यक्ति तुम्हाला संपूर्ण प्रकिया पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
- तुम्ही वास्तयास असलेल्या शहरातील,किंवा जवळलच्या शहरातील योजनेसोबत जोडलेल्या दवाखान्याची यादी पाहण्यासाठी यादी लिंक मध्ये दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंगीकृत हॉस्पिटल ची यादी .
- आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन आरोग्य मित्रास भेटावे आणि त्यांनी देलेला अर्ज पूर्ण भरून घ्यावा. हे लक्षात घ्या की तुम्ही उपचार घेऊन सुट्टी नंतरही 10 दिवस मध्ये तुम्ही पुनः पाठ पुरावा साठी हॉस्पिटल मध्ये आल्यास त्याचा ही खर्च या योजनेतर्गत मिळतो.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी आहे अतिशय सोपी व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.