IAS full form in marathi लेखामधून फक्त IAS फुल फोर्म ची माहिती तर आहेस सोबत IAS या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही शासकीय नोकरीची/ स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्या साठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे लेख पूर्ण वाचा व तुमच्या काही प्रतिक्रया असतील तर नक्की द्या.
IAS ही भारत सरकारच्या अखिल भारतीय सेवांची प्रशासकीय शाखा असून IPS, IRS आणि IAS तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक IAS आहे. या तीन सेवांचे अधिकारी भारत सरकार तसेच राज्यांतील ठिकाणी सेवा देतात. IAS अधिकारी विविध सरकारी आस्थापनांमध्ये देखील तैनात केले जातात जसे की घटनात्मक संस्था, कर्मचारी आणि लाइन एजन्सी, सहायक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, नियामक संस्था, वैधानिक संस्था आणि स्वायत्त संस्था अश्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या आणि संवेदशील पदावर या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
IAS full form in Marathi
IAS फुल फॉर्म इंग्रजी मध्ये indian administrative serviec आणि IAS full form in marathi मराठी मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा असा होतो. आयएएस ची पद जितके प्रतिष्ठेचे आहे तितकेच ते मिळवण्यासाठी IAS फुल फॉर्म इंग्रजी मध्ये परिश्रमाचे आहे त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनीतीची गरज आहे त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनीतीची गरज असते . खुप अवघड आहे याचा अर्थ असा नाही कि ते साध्य करणे शक्य नाही आपल्या राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी हि परीक्षा पास करून IAS अधिकारी बनले आहेत. काही उदाहरण द्यायचे झाले तर
- सुजाता सौनिक : सध्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव झालेल्या पहिल्या महिला. त्यांनी UPSC परीक्षा IAS मधून उत्तीर्ण केली
- अन्सार शेख: भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी, ज्याने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
- संजय एल. यादव : मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी.
- वैभव वागमारे :- पंढरपूचे वागमारे साराने २०१७ साली UPSC परीक्षा IAS मधून उत्तीर्ण करून अमरावती मध्ये प्रोजेक्ट ऑफिसर या पदावर पदभार सांभाळला.
नागरी सेवांमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे, 415 अधिकृत IAS पदे आणि 338 अधिकारी कार्यरत आहेत.
IAS अधिकारी हि सेवा भारतातील IPS, IFS अश्या इतर सेवांपैकी उच्च आणि प्रतिष्ठेची सेवा समजली जाते. त्यामागे कारण सुद्धा आहे कारण IAS अधिकारी नियुक्त सहायक सचिव ,उपविभागीय दंडाधिकारी, उपसचिव अतिरिक्त , जिल्हा दंडाधिकारी, उपसचिव जिल्हा दंडाधिकारी , संचालक/ विशेष सचिव या सारख्या अतिशय महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर त्यांना नियुक्त केले जाते. असे नाहीये कि IRS आणि IPS अधिकारी यांची नियुक्त महत्वाच्या पदावर होत नाही या दोन्ही सेवांमध्ये सुद्धा खूप महत्वाची आणि संवेदनशील पदावर नियुक्ती होते. परंतु IAS अधिकारी सुरुवातीपासून जास्त अधिकार दिल्या गेले आहेत, धोरण तयार करणे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करणे ,कायदा व सुव्यवस्था राखणे,सार्वजनिक प्रशासन आणि शासन, सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणे, सामाजिक आर्थिक वाढीसाठी योगदान,सरकारी धोरणे मजबूत करणे, शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे यासारखे अनेक महत्वाचे कामे या अधिकाऱ्यांना करावे लागत , आणि ब्रिटिश काळापासून या पदाला जास्त महत्व दिल्या जाते ते दोन महत्वाचे कारण आहे ज्यामुळे आजही IAS अधिकाऱ्यास जास्त प्रतिष्ठेचे समजल्या जाते पण अलीकडील काळात IRS पास होऊन मिळणाऱ्या पदाला जास्त पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
UPSC (IAS) परीक्षा पात्रता
- अर्जदार उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचं आहे.
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले आहेत किंवा निकालाच्या प्रतीक्षेत आहे ते उमेदवार देखील पात्र आहेत.
- UPSC च्या परीक्षेला बसण्यासाठी किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे, तसेच IAS परीक्षेसाठी कमाल वयोमार्याद ही १ ऑगस्ट २०२१ ला निघालेल्या परिपत्राकानुसार पुढील प्रमाणे असेल.
- सामान्य प्रवर्गातील अर्जदार उमेदवार साठी वयोमर्यादा हि 32 वर्षे आहे.
- इतर मागासवर्गीय OBC साठी वयोमर्यादा 35 वर्षे.
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) साठी उच्च वयोमर्यादा 37 वर्षे.
तुम्ही UPSC ची परीक्षा किती वेळा देऊ शकता ?
आज च्या लेखातून IAS full form in marathi समजून घेताना आपल्याला हे हि माहिती पाहिजे कि ias पद किती महत्वाचे आहे आणि जर तुम्ही upsc हि तयारी करू इच्छित असाल तर तुम्ही किती वेळा हि परीक्षा देऊ शकता.
- सामान्य श्रेणी: 32 वर्षे वयापर्यंत 6 प्रयत्न.
- इतर मागासवर्गीय ( OBC ) उमेदवार वयाच्या 35 वर्षापर्यंत 9 प्रयत्न.
- अनुसूचित जाती/जमाती SC/ST उमेदवार: 37 वर्षे वयापर्यंत अमर्यादित प्रयत्न.
- अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD): 42 वर्षे वयापर्यंत 9 प्रयत्न.
- EWS श्रेणी: 32 वर्षे वयापर्यंत 6 प्रयत्न
सारांश
दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (upsc) मार्फत IAS, IPS आणि IRS ची जाहिरात काढल्या जाते. UPSC मधून 2 परीक्षा आणि एक मुलाखत या अवघड प्रक्रिया मधून एक व्यक्तीची निवड होती 2.५ वर्षाच्या अथक प्रशिक्षणानंतर एक अधिकारी तयार होतो. खरच सलाम आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना ज्यांनी महाराष्ट्राचे नाव UPSC मध्ये कोरले आहे . आज आपण या लेखामधून IAS full form in marathi मधून जाणून घेतला सोबतच IAS पदाविषयी इतर महत्वाची माहिती सविस्तर जाणून घेतली. या व्यतिरिक्त अजून काही संबधित माहिती आपल्याला हवी असल्यास तुम्ही आपला comment मधे विचारू शकता सोबत हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याची प्रतिक्रिया सुद्धा comment मध्ये कळवा.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून IAS full form in marathi आय.ए.एस ला मराठीतून काय म्हणतात.व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.