महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी राज्यामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प उभारले जात असतात. ह्यामध्ये प्रामुख्याने धरणाचा समावेश आहे एखाद्या ठिकाणी जेव्हा धरणाची उभारणी होते तेव्हा त्या धरणामुळे बाधित होणाऱ्या गावांना प्रकाळग्रस्त गावे असे म्हणतात. ह्या गावातील किंवा भागातील लोकांचे पुनर्वसन योग्य व दर्जेदार ह्यावे याकरिता शासनाने वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासन मार्फत धरणग्रस्त प्रमाणपत्र देऊन त्या बाधित लोकाना अनेक सोई-सुविधा पण उपलब्ध करू दिल्या आहेत जस की नवीन घर, शेतजमीन, शासकीय नोकरी/ किंवा शासकीय नोकरीमध्ये आरक्षण या सारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जर तुम्ही ही धरणग्रस्त असाल आणि तुम्ही धरणग्रस्त प्रमाणपत्र काढले नसेल तर हा लेख तुमच्या साठी आहे. धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी सखोल माहिती या लेखातून तुम्हाला मिळेल सोबत शासनाचा gr पण सोबत जोडलेला आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा,
धरणग्रस्त काय आहे ?
दिवसे दिवस लोकसंख्या वाढत आहे जसजसी लोकसंख्या वाढत आहेत त्याच प्रमाणे त्यांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत. पूर्वी आपल्या राज्यातील बहुतेक शेतजमीन पाण्याखाली नव्हती त्यामुळे शेती फक्त पावसाळ्या पूर्ती मर्यादित होती. त्यानंतर धरणाचा शोध लागला आणि शेतजमीन १ २ महिने करायची असेल पोटाची भूक भागवायची असेल तर एका ठिकाणी पाणी आडवणे गरजेचे होते म्हणून छोटी-मोठी धरणे बांधायला सुरुवात झाली . त्या धरणाचे बॅकवॉटर मुळे आजू – बाजूच्या गावानं दुसऱ्या ठिकाणी स्थलंतरीत करण्यात आले. मागील काही वर्षपासूनऔद्योगीकरण वाढले, वीजनिर्मिती करणं करणे गरजचे होते त्यासाठी धरणाची आवश्यकता भासू लागली मोठी धरणे बंधने चालू झाली त्यामुळे खूप गावे स्थलांतरित करावी लागली. अश्या गावांचे पुनर्वसन योग्य व्हावे यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत . विविध योजना राबवल्या आहेत. ज्याचे फक्त घर गेलं त्यांना घरे दिले. ज्याचे शेतजमीन गेली त्यांना शेतजमिनी दिल्या. पण बदलत्या काळानुसार तेवढी शेतजमिनी नाहीत म्हणून शासनाने काही योजनांमधून नोकरी सारख्या उपाययोजना चालू केल्या पण जर तुम्हाला ह्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्या कडे धरणग्रस्त प्रमाणपत्र असणे बंधनकारक केलं. तर या लेखातून धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे या विषयी माहिती दिली आहे.
धरणग्रस्त प्रमाणपत्र काय आहे शासन निर्णय
- महाराष्ट्र शासनामार्फतसर्वात पहिला GR १ ९ ६ ७ साली आला त्या GR सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे पुनर्वसन महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ठराव क्र. RPA/106/77785.R.I, दिनांक २९ मे १९६७ सिंचन आणि उर्जा प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना त्यांच्या जलद पुनर्वसनाच्या सुविधेसाठी सर्व प्रकल्पांसाठी एकक आधारावर अनुदान देण्याचा ठराव काही काळ सरकारच्या विचाराधीन होता, सरकार सर्वांच्या देखरेखीचे निर्देश कसे द्यायचे हे सरकारच्या विचाराधीन आहे. या मध्ये जारी करण्यात आलेले आदेश सरकारने उर्जा विभागामध्ये दिलेले आहेत खालील सवलती सर्व सिंचन आणि उर्जा प्रकल्प बाधित व्यक्तींना समान प्रमाणात देण्यात याव्यात. त्या नुसार धरणग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांचा कुटुंबातील एका सदस्यस शासकीय नोकरी मध्ये सामावून घेणार येणार आहे.
- मागील काही वर्षात अनेक बदल झाले आता जर तुम्ही धरणग्रस्त असाल तर तुम्हाला सरळ शासकीय नोकरी मिळत नाही तर शासकीय नोकरीसाठी आरक्षण देण्यात येते त्याच बरोबर इतर अनेक योजनेचा लाभ देणार येतो सोबत आर्थिक मोबदला सुद्धा मिळतो.
- शासन निर्णय 2010 नुसार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शासकीय/ निमशासकीय सेवेतील गट क व ड च्या सरल सेवेतील 5 टक्के जगावर भरतीत प्राधान्य देण्याची योजना आहे. ज्या धरणग्रस्त जमिनी अथवा घरे बाधित क्षेत्रात संपादित झाली आहेत . अश्या व्यक्तिना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ति न धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येते.
धरणग्रस्त व्यक्तीची किमान 20 आर जमीन संपादित झाली आहे आणि शासन निर्णय , महसूल व वन विभागाने 100 टक्के जमीन भूसंपादन झाल्यास व संपादित झाल्यानंतर सादर व्यक्तीस इतर जमीन नसेल तर असे प्रतिज्ञापत्र त्याने दिले तरच धरणग्रस्त कुटुंबातील एक व्यक्तीच्या नवे सामान्य प्रशासन विभाग नोकरीसाठी प्रमाणपत्र देईल. धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे
धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे
धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला ग्राम पंचायत पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यन्त जाऊन अर्ज प्रक्रिया करावी लागू शकते
- पायरी 1 – आपल्या तलाठी कार्यालयात जाऊन holding प्रमाणपत्र घ्यावे
- पायरी 2 – आपल्या तहसील कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज सादर करून सदरील तहसीलदार यांच्या कडून holding प्रमाणपत्र मिळवावे
- पायरी 3 – तहसील holding प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्जासह , खाली दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत स्टॅम्पपेपरवर शपथपत्र, संमतीपत्र व वंशावळ सादर करून अर्ज कार्यालयात जमा करावा.
- पायरी 4 – 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत प्रकरण निकाली लाऊन , अर्जाची तपसणी करून उपविभागीय किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी धरणग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतील
धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यास आवश्यक कागदपत्रे
वरील माहिती दिल्यानुसार अर्जासोबत तुम्हाला खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे
- जमिनीची 7/12 उतारा :- प्रभावित/जी जमीन धरणात गेली आहे त्या जमिनीची 7/12 उतारा प्रत आवश्यक आहे. (तुम्ही २ मिनिटं तुमच्या शेतीचा / जमिनीचा सातबारा काढू शकता)
- घराचा नकाशा : प्रभावित/ धरणात गेलेल्या घराचा नकाशा आणि पूर्ण पत्ता
- स्थानिक पत्त्याचा पुरावा : स्थानिक पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र.
- प्रभावित क्षेत्राचे प्रमाणपत्र: सरकारी अधिकारी किंवा संस्थेचे प्रमाणपत्र ज्यामध्ये प्रभावित क्षेत्राचा उल्लेख आहे.
- पुनर्वसन प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) : तलाठी यांच्याकडून पुनर्वसनासाठी दिलेले प्रमाणपत्र.
- कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज . कमीत कमी १ ० ० रुपयाचा स्टॅम्प
- ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा किंवा उतारा ८ अ
- रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह सोबत प्रकल्पग्रस्त असल्याचे त्याचे शपथपत्र.
- संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला संबंधित तपशील कार्यालयातून तहसीलदारामार्फत दिलेले यांचे होल्डिंगचे प्रमाणपत्र.
- मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
- मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीचीमूळप्रती.* इ – स्टेटमेंटची प्रत.
- मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र
- घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
- प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
- प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
- मतदार यादीची नक्कल प्रत
- तलाठ्यांचे जमीन संपादन झाल्याचे प्रमाणपत्र.
- शिधापत्रिकेची / रेशनकार्ड ची प्रत
- ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र
- पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.
धरणग्रस्त प्रमाणपत्राच्या अटी व शर्ती
- शासनाच्या धरणग्रस्त योजने अंतर्गत सदर धरणग्रस्त व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबातील किंवा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या एकाच व्यक्तीला नोकरी मिळण्यासाठी सदर प्रमाणपत्र उपयोगात येईल. दुसऱ्या व्यक्तीला धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळणार नाही
- ज्या धरणग्रस्त भूसंपादनाची कार्यवाही दिनांक १ जून १९६५ नंतर सुरु करण्यात आलेली असल्यास ज्या व्यक्ती धरणग्रस्त झाल्या आहेत. अश्या प्रत्येक धरणग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील जास्तीत जास्त एकाच व्यक्तीला शासकीय कार्यालयात नियमानुसार नोकरी मिळेपर्यत सदरचा दाखला उपयोगात येईल. एकदा का त्या व्यक्तीला नोकरी मिळाली कि त्या धरणग्रस्त प्रमाणपत्रावर पुन्हा लाभ घेता येणार नाही. तुम्हे धरणग्रस्त प्रमाणपत्र बरखास्त/रद्द करण्यात येईल.
- धरणग्रस्त प्रमाणपत्र अर्जदार यांनी सादर केलेल्या संचिकेतील अभिलेखानुसार निर्गमित करण्यात येत असून, अर्जदार यांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदर धरणग्रस्त प्रमाणपत्र रद्द करून त्यावर दिशाभूल केल्या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल.
या धरणग्रस्त प्रमाणपत्र चा वापर करून तुम्ही एकदा शासकीय नोकरी मिळवली कि संबंधित तपशील मा. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी कळवणे आवश्यक राहील. - शासनाचे वेळोवेळी बादलानुसार gr प्रकाशित केले आहेत त्यातील एक महत्वाचा gr तुम्ही धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे पाहू शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातूनफॅटी धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे वाचा पूर्ण माहिती सोबत शासनाचा GR व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- ८अ उतारा ऑनलाईन डाउनलोड कसा करावा! ८अ उतारा download online!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल वाचा नेमके कोणते बदल झालेलं व सोबत शसनाचा GR
- clove for teeth दातांसाठी लवंगचे फायदे : बहुगुणी वनस्पती
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज २०२४ आणि नोंदणी प्रक्रिया
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम अंतर्गत तुमच्या गावात कोणती कामे झालेत पहा 1 मिनिटात
Pingback: घरगुती व्यवसाय यादी ज्या मधून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. - Earning Method