बांधकाम कामगार योजनेमधून मिळणार अनेक फायदे

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना

महाराष्ट्र राज्यात विविध श्रेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे स्वताच्या घरापासून दूर स्थलांतर होऊन काम करतात. ज्या ठिकाणी स्थलांतर होतात त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत . राहण्यासाठी सुविधा नसते ,पत्राच्या घरात किंवा नवीन बांधकामाच्या ठिकाणी राहून उन , वारा व पावसाची परवा न करता कामगार अतिशय कमी पगारात काम करत असतात. त्यांना त्यांच्या दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते . जर घरातील कर्त्या पुरुषाचा मूत्यू झाला किंवा त्याला कायमच अपंगत्व आले तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ येते ह्या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने 1 में 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली

महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी त्यांचे हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे कल्याण व्हावे या उद्देशाने २०११ रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.

बांधकाम कामगार
बांधकाम कामगार

बांधकाम कामगार यांची आकडेवारी

महाराष्ट्रामधील सर्व बांधकाम कामगारांचे नोदणी झाली नसल्यामुळे एकूण किती कामगार आहे हे नक्की सांगता येणार नाही पण अलीकडील काही आहवाल आणि अभ्यासानुसार महाराष्ट्रात सुमारे 70-80 लाख बांधकाम कामगार असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी प्रत्यक्ष 14-17 लाख कामगार हे बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आहेत. बाकी कामगाराचे अजून नोदणी बाकी आहेत.

बांधकाम कामगार नोदणी चे फायदे

  1. बांधकाम कामगार योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून एकूण कामगारांची संख्या माहिती केली जाईल त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनांची सुरवात करण्यास मदत होईल व लाभाचे वितरण करण्यास देखील सोपे जाईल.
  2. महाराष्ट्र  राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे  जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  3. एकाच योजनेमधून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्याविषयी अश्या अनेक योजनाचा लाभ दिल्या जाईल.
  4. ज्या बांधकाम कामगारानी नोंदणी केली आहे अश्या  कामगाराच्या  पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक मदत दिल्या जाईल.
  5. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे त्यांना थोडी मदत होईल.
  6. नोंदणीकृत धकाम कामगार यांना  विशेष योजनेअंतर्गत  दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते.
  7. नोंदणीकृत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ दिला जातो.
  8. नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ दिला जातो.
  9. नोंदणीकृत कामगारांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी पाळणाघर ची  सुविधा उपलब्ध करून  दिली जाते.
  10. नोंदणीकृत  बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेचा लाभ दिला जातो
  11. नोंदीत बांधकाम कामगारांकरिता राहण्यासाठी ट्रांझिट कॅम्प ची सुविधा दिली जाते. बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांसाठी Essential Kit चे वाटप केले जाते.
  12.  नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना  इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  13.  नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्ष 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  14.  नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगाराच्या मुलांना 10000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
  15. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
  16. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20 हजार  रुपयांचे आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
  17. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या  मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक मदत म्हणून पुरवल्या जाते.
  18. नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/– रुपये आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
  19. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/-आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
  20. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांना शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. 
  21. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन दाप्त्याना  MS-CIT शिक्षणाच्या शुल्क पुरवल्या जाते.
  22. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या IIT. ITI शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
  23. कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना इंग्रजी विषयात प्राविण्य मिळवण्यास मदत केल्या जाते.
  24. बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती अभ्यासक्रमानुसार  पुरवल्या जाते.
  25. नोंदणीकृत कामगाराच्या मुलांना  शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे अभ्यासक्रमानुसार वाटप केल्या जाते.
  26. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांना वर्गात 75 टक्के उपस्थिती असल्यास आर्थिक मदत दिल्या जाते.
  27. नोंदणीकृत कामगाराची पत्नी किंवा स्वतःला महिला सामान्य  प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक मदत म्हणून दिले जाते.
  28. नोंदणीकृत कामगाराची पत्नी किंवा स्वतःला महिला कामगार ला  शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपयांचे आर्थिक मदत म्हणून दिल्या जाते.
  29. नोंदणीकृत कामगारा  व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजार झाल्यास  उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  30. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद केले जातात.
  31. नोंदणीकृत कामगाराचा अपघात होऊन  75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
  32. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ  नोंदणीकृत कामगारांना दिला जातो.
  33. कामगार रुग्णालयात भरती झाल्यावर भरती काळापासून ते सुट्टी च्या दिवसापर्यंत  त्याच्या पत्नीस भरतीच्या एकूण दिवसाप्रमाणे आर्थिक मदत केल्या जाते.
  34. कामगारांना मोफत विमा योजनेचा लाभ मिळतो. विम्याचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आणि केद्र शासनाच्या योजनेसोबत जोडल्या जाते.
  35. नोंदणीकृत  बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून त्यांची तपासणी केली जाईल.
  36. कामगारांना व्यसनमुक्ती करीता निधी देऊन त्यांना व्यसणमुक्ती केंद्रातील उपचार आणि समुपदेशनाचा खर्च या योजनेमधून केल्या जातो.
  37. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर रित्या वारसदार आहेत त्यांना  2 लाखाचे आर्थिक मदत योजनेमार्फत दिल्या जाते.
  38.  बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 5 लाखाची आर्थिक मदत केल्या जाते.
  39. केद्र शासनाच्या  अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य म्हणून दिले जाईल .
  40. केद्र शासनाच्या  अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य म्हणून दिले जाईल .
  41. वय वर्ष 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य दिले जाते.
  42. जर काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक मदत दिल्या जाते.
  43. जर कामगाराने घर बांधण्यासाठी जर  6 लाखाचे कर्ज घेतले असल्यास त्याच्या  कर्जाच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाखाचे रक्कम आर्थिक मदत म्हणून दिल्या जाते.
  44. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वर्षांमधून एकदा  बोनस दिला जातो.
  45. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी केद्र  व राज्य शासनाच्या घरकुल योजनेसी जोडून प्रत्यक्ष घरकुल किंवा शहरी भागात घर घेत असाल तर 2.5 लाखाची आर्थिक मदत दिल्या जाते.
  46. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामावर ये जा करण्यासाठी सायकल ची वाटप केल्या जाते.
  47. घरातील आणि कामासाठी लागणारे महत्वाचे  साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत  पुरवल्या जाते.

अधिक माहिती साठी शासनाच्या website ला भेट द्या .

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून बांधकाम कामगार योजनेमधून मिळणार अनेक फायदेव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top