असहकार चळवळ mpsc च्या दुर्ष्टीकोनातून असहकार चळवळ ची नोटस


असहकार चळवळ mpsc : mpsc चा अभ्यास करताना भारत स्वतंत्र संग्राम चा चांगला अभ्यास असणे अत्यंत गरजेच आहे कारण group b आणि group c च्या परीक्षा मधील प्रिलिमिनरी परीक्षा मध्ये सामान्य पात्रता चाचणी मध्ये भारत आणि महाराष्ट्र इतिहासावर अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यामधील विविध चळवळी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यापैकी एक असहकार चळवळ आपण ला लेखातून पाहू.

असहकार चळवळ mpsc
असहकार चळवळ mpsc

महात्मा गांधी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकार चळवळ १९२० ते १९२२ या काळात सुरु केलेली एक अहिंसक चळवळ होती. या चळवळीचा प्रमुख उद्देश भारत देशाला ब्रिटीश सत्तेपासून स्वतंत्र मिळून देणे हा होता त्यासाठी ब्रिटीश वस्तू व संस्थावर बहिष्कार टाकणे , अहिंसक आंदोलने अश्या अनेक उपक्रम राबवण्यात आले. ज्या मुले स्वतंत्र लढ्यास एका नव्या पर्वास सुरुवात झाली होती.

तर हि असहकार चळवळ चालू कशी झाली, नेमक्या कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे महात्मा गांधी यांनी हि चळवळ चालू करण्याचा निर्णय घेतना , चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट्ये काय होते, चळवळीतील महत्वाच्या घटना , स्वातंत्र्य लढ्यात चळवळीचे काय महत्व काय आहे , याविषयी असहकार चळवळ mpsc माहिती देणारा हा लेख.

जाणून घ्या संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

असहकार चळवळी मधील महत्वाच्या घटना 

  • १ ऑगस्ट १९२० रोजी असहकाराच्या देशव्यापी आंदोलनास भारतभर सुरुवात झाली होती. 
  • २ सप्टेंबर १९२० : लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली कोलकत्ता येथे कॉग्रेसचे विशेष अधिवेशन पार पडले 
  • २६ डिसेंबर १९२० च्या नागपूर अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावास राष्टसभेने मान्यता देण्यात आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चक्रवर्ती विजय राघवाचार्य 
  • आंदोलनांची सर्व प्रामुख्य सूत्रे महात्मा गांधी यांच्या कडे सोपवण्यात आली. 
  • असहकार  चळवळीस खऱ्या अर्थाने सुरुवात १ ऑगस्ट १९२० रोजी सुरुवात झाली.

आंदोलनाचे स्वरूप कसे व कुठे ?

  • शाळा , कॉलेज , विधिमंडळे ,न्यायालये , कचेऱ्या , परदेशी माल विशेष म्हणजे ब्रिटिश यांच्या मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी माल आणि इतर सर्व गोष्टीचा पुरकार करणे 
  • परदेशी मालाची होळी करण्यात आली. 
  • याच काळात देशभर राष्ट्रीय शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या. 
  • महात्मा गांधी यांनी केसर-इ-हिंद पदवीचा , रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ICS या पदवीचा त्याग केला. 
  • या चळवळी मध्ये महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने  भाग घेतला. 
  • अनेक वकिलांनी त्याच्या वकिली व्यवसायाचा त्याग केला. 
  •  १७ नोव्हेंबर १९२९ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीसाठी आले होते त्या दिवशी निषेध दिन पाळण्यात आला. सर्वात महत्वाचे म्हणजे १९२१ या एकाच वर्षात संपूर्ण देशात ३९३ संप यशस्वी पणे पार पडले. 
  • अश्या प्रकारे सम्पूर्ण देशभर असहकार चळवळ पसरली आणि उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. 
  • १९२१ साली विजयवाडा येथील विशेष  अधिवेशनात गांधीजीने टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली या अधिवेशनाचे अध्यक्ष होते शौकत अली. 
  • या फडांचा मुख्य उद्देश हा चळवळीस फंडाची उभारणी करणे आणि चळवळ चालवताना आर्थिक  पाठिंबा उपलब्ध करून देणे. या फंडास सम्पूर्ण भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला ६ महिन्यात एक कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा झाली

असहकार चळवलीचा शेवट कसा झाला. 

  • उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हातील चौरीचोरा येथे ५ फेब्रुवारी १९२२ रोजी अतिशय शांततापूर्ण आंदोलन आणि निर्देशन चालू असताना ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या जनतेने पोलिसांवर दगडफेक केली आणि काही ठिकाणी आग लागली , या आगीत २१ कॉन्स्टेबल व १ सबकॉन्स्टेबल असे २२ पोलीस अधिकारी मरण पावले. 
  • चळवळ अहिंसक असावी हे तत्व मानणाऱ्या महात्मा गांधी साठी हि घटना नाराज करणारी होती , पुढील काळात या चळवळ अधीक हिंसक होईल याचा विचार करून महात्मा गांधी यांनी १२ फेब्रुवारी १९२२ रोजी असहकार चळवळ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. 
  • १० मार्च १९२२ रोजी महात्मा गांधी यांनी यंग इंडिया मध्ये राष्ट्रदोही लेख लिहिण्याचा आरोप ठेऊन अलाहाबाद न्यायालयाने IPC कलम १२AA नुसार गांधीजींना राजद्रोहाचा आरोप लावून ६ वर्षाची  शिक्षा ठोठावली . त्यानंतर फेब्रुवारी १९२४ मध्ये तबियत ठीक नसल्याने त्यांना ची शिक्षा माफ करून त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. 

Shivaji Maharaj History शिवाजी महाराज इतिहास

 लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “नअसहकार चळवळ mpsc च्या दुर्ष्टीकोनातून असहकार चळवळ ची नोटस व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

दादासाहेब फाळके पुरस्कार इतिहास व यादी ,Dadasaheb Phalke Award History and List of honour

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top