ग्रामपंचायत किती योजना आहेत ? बापरे इतक्या योजना ग्राम पंचायत मार्फत चालतात !!

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक योजना पंचवार्षिक योजनेमधून विविध योजना  राबवल्या जातात या योजना राबवण्यामागचा मूळ उद्देश हा देशाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे सोप्या भाषेत सामाजिक कल्याण, आर्थिक विकास, दारिद्र्य निर्मूलन , राष्ट्रीय सुरक्षा ,पर्यावरण संरक्षण , सामाजिक न्याय , राजकीय लाभ या मुख्य कारणांसाठी विविध योजना राबवल्या जातात एकंदरीत, भारत सरकार देश आणि त्याच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गरजा आणि आव्हाने निराकरण करण्यासाठी योजनांना अंमलबजावणी करते. प्रत्येक योजनेचे विशिष्ट उद्दिष्ट्य आणि लक्ष्य प्रेक्षक त्याच्या उद्देश आणि हेतूनुसार बदलतात. शासन योजना राबवत असताना विविध स्थरावर योजना राबवत असत जस कि केंद्र स्थर , राज्य स्थर आणि ग्रामपातळीवर ग्रामपंचायत स्थर आज आपण या लेखातून ग्रामपंचायत स्थरावर कोणत्या आणि ग्रामपंचायत किती योजना आहेत याची माहिती घेणार आहोत.

काय आहे ग्राम पंचायत

पी.व्ही.नरसिंहराव यांनी १९९१ रोजी पंचायतराज चे विधेय लोकसभेत मांडले त्याला लोकसभेने २२ डिसेंबर १९९२ रोजीं मंजुरी दिली आणि दुसर्या दिवशी राज्यसभेने ते मंजूर केले.राष्ट्रपतीने २० एप्रिल १९९३ ला ७३ व्या घटना दुरुस्र्तीला मान्यता दिली आणि या घटनेची भारतात अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून झाली .

ग्रामपंचायत किती योजना आहेत
ग्रामपंचायत किती योजना आहेत

ग्राम पंचायत हि प्राथमिक स्तरावरील व्यवस्था असून ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या पंचायत सदस्य म्हणून  निवडून आलेल्या प्रतिनिधींनी बनलेल्या असतात, ज्यात सरपंच (गावप्रमुख), पंचायत सचिव आणि गावातील विविध भौगोलिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे प्रभाग सदस्य असतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यांद्वारे निवडलेला सरपंच हा दैनंदिन प्रशासन आणि पंचायतीने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो.त्याच्या मदतीला उपसरपंच व सभासद असतात तसेच यान मदतीसाठी जिल्हा परिशद कडून ग्राम सेवक नेमला जातो. ग्राम पंचायत चे मुख्य काम हे गावाचा सर्वांगीण विकास करणे हा असतो , गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत विविध योजना राबवल्या जातात पुढील लेखात आपण ग्रामपंचायत किती योजना आहेत. याविषयी माहिती घेणार आहोत.

ग्रामपंचायत किती योजना आहेत.

ग्रामीण भागातील बहुतेक लोकांना शासनाच्या काही  निवडक योजना माहिती आहेत जस जी घरकुल योजना , पेन्शन योजना ,  रेशन कार्ड वर मिळणारे धान्य योजना आणि शेती संदर्भातील काही योजना पण तुम्हाला माहिती आहेत का कि ग्रामपंचायत किती योजना आहेत ते. आज २ ० २ ४  मध्ये ग्रामपंचायत मार्फत १ ० ०  च्या वर शासकीय योजनेचा ची अमलबजावणी केली जाते त्या सर्व योजना तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्ही त्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. चला तर मग ग्रामपंचायत किती योजना आहेत ते पाहू .

ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना ची यादी

ग्रामपंचायत किती योजना आहेत त्याची यादी पुढील प्रमाणे

  1. मा. लोक्रपतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे
    • महाराष्ट राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सन 2008-09 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या निकष व कार्यपध्दती संदर्भात वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. शासन निर्णय क्र.विकास-२०१५/प्र.क्र.५२/यो-६, दि.27.03.2015 अन्वये खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे सदर योजना जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणेमार्फत राबविण्यात येते.
  2. ग्राम सडक योजना
    • राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त लोकसंख्या (आदिवासी क्षेत्रातील 250 पेक्षा जास्त) लोकसंख्या असलेल्या गाव व पक्या रस्त्याने न जोडलेल्या उर्वरित वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अंतर्भुत न झालेल्या अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती  करणे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते दर्जोन्नतीचे 30,000 कि.मी. व नवीन जोडणीचे 730 कि.मी. चे उद्दीष्ट ठरविण्यात आलेले होते.
  3. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम
    • कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे या करीता ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटनाचा विकास होणा-या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे या उद्देश्याने राज्य शासनाने “कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम” ही योजना सन 2013-14 पासून सुरु केलेली आहे.
      कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखडा तयार करणे व आराखड्यातील कामांना मंजूरी देण्याकरीता कोकणातील 5 जिल्ह्यांकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी समिती व मा.राज्यमंत्री, ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती दिनांक 23.11.2015 च्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आलेली आहे.
  4. आर.आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना
    • राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन आदर्श गांव असा नाव लौकिक मिळविणे
  5. मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
    • ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत बांधण्यासाठी या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो.
  6. राष्ट्रीय रुरबन अभियान
    • राष्ट्रीय रूरबन मिशन (National Rurban Mission-NRuM) अंतर्गत ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे अपेक्षित आहे.या अभियानाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
      – ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
      – ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करतांना, गरीबी व बेरोजगारी कमी करणे.
      – अभियानांतर्गत निवडलेल्या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणे.
      – ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे.
  7. महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विभाग / जिल्हास्तरीय प्रदर्शने
    • महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या बचत गटांनी /वैयक्तिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी स्वरोजगारी लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतुने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरावर मुंबई येथे सन 2003 पासून सरस प्रदर्शनआयोजित करण्यात येते.
      • महालक्ष्मी सरस प्रदर्शना करीता रू. 40 लक्ष इतकी केंद्र शासनाकडून व रू. 50.00 लक्ष इतकी राज्य शासनाकडून तरतूद दर वर्षी करण्यात येते.
      • राज्य स्तरावरील महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ सहजपणे शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतात.
  8. अस्मिता योजना
  9. श्रीमती सुमतीबई सुकळीकर उदोगिनी महिला सक्षमिकरण योजना
  10. मा. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
  11. रस्ते, पूल दुरुस्तीकरण योजना
  12. स्टर्ट-अप उडदोजाकता कार्यक्रम- महाराष्ट्र
  13. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांसाठी सहायक अनुदान
  14. यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार
  15. प्रशिक्षण योजना
  16. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार योजना
  17. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
  18. राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती तसेच अन्य प्रसिध्द मान्यवर व्यक्ती यांची स्मारके उभारण्याबाबत
  19. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांसाठी सहायक अनुदान
  20. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारतींच्या देखभाल दुरूस्तीबाबत.
  21. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी सहायक अनुदान
  22. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन योजना
  23. माहिती तंत्रज्ञान कक्ष योजना
  24. आपले सरकार सेवा कक्ष योजना
  25. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
  26. उमेद योजना महिला सक्षमीकरण
  27. राष्ट्रीय रुरबन अभियान
  28. जिल्हा व तालुकास्तरीय कायमस्वरूपी तालुका विक्री केंद्रे बाधणे
  29. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- प्रशासन
  30. पेसा कक्ष
  31. गावठाण जमबंदी प्रकल्प
नेमक्या ग्रामपंचायत किती योजना आहेत ?

एका गावाकरता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन , राज्य शासन  आणि इतर  अश्या सर्व मिळून अशा जवळपास 1140 योजना असतात. त्या योजना  प्रत्यक्ष लाभाच्या  व अप्रत्यक्ष लाभाच्या अस्या दोन्ही प्रकारच्या योजनेचा यामध्ये समावेश आहे .  ग्रामपंचायत किती योजना आहेत ही समजल असेल 

संदर्भ :-

वरील माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग या शासकीय वेबसाईट चा आधार घेण्यात आला आहे त्यामुळे हि माहिती योग्य आहे. वरील योजना विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही त्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातूनफॅटी ग्रामपंचायत किती योजना आहेत ? बापरे इतक्या योजना ग्राम पंचायत मार्फत चालतात   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top