एसटी महामंडळाची माहिती आणि 36 आकर्षक योजना ज्यामधून तुम्ही अगदी मोफत करू शकता प्रवास.

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) च्या नोकरी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय उपयुक्त माहिती एसटी महामंडळाची माहिती आणि योजना मधून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चा इतिहास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ही महाराष्ट्रातील जनतेसाठी रस्ते वाहतूक सुविधा पुरवणारी एक प्रमुख संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी एक व्यापक वाहतूक सेवा आहे. ही संस्था महामंडळ असून याला निमशासकीय संस्था म्हणून ओळखले जाते. या लेखातून एसटी महामंडळाची माहिती आणि योजना विषयी सविस्तर माहिती देऊ.

जेव्हा तत्कालीन मुंबई राज्य सरकारने स्वर्गीय मोरारजी देसाई गृहमंत्री असताना, राज्य परिवहन बॉम्बे नावाची स्वतःची राज्य रस्ते वाहतूक सेवा सुरू केली. आणि यासह, पहिली निळ्या आणि चांदीच्या रंगाची बस पुण्याहून अहमदनगरला निघाली.

एसटी महामंडळाची माहिती आणि योजना
एसटी महामंडळाची माहिती आणि योजना

स्थापना आणि विकास

  • १९२०: पहिल्या महायुद्धानंतर भारतात शिल्लक सैन्य वाहनांच्या विक्रीमुळे मोटारींद्वारे व्यापारी वाहतुकीला चालना मिळाली.
  • १९६०: महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर १ जुलै १९६१ रोजी रस्ता वाहतूक निगम कायदा, १९५० च्या अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली.
  • १९७४: राज्य शासनाने रस्ते प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण केले आणि एसटीला हा अधिकार दिला. यामुळे राज्यातील सर्व रस्ते मार्गावर एसटीच्या बसांची सेवा उपलब्ध झाली.

एसटी महामंडळाची माहिती आणि विस्तार

रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेवून,राष्ट्राचा /नागरिकांचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा १९५० पारीत करुन,रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरीता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे़. त्यास अंनुसरुन राज्यातील नागरिकांकरीता सूसुत्र,किफायतशीर,गतीमान व कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरीता महाराष्ट्र शासनाने ,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे़. राज्याच्या आर्थिक सामाजिक विकासाकरीता प्रवाशी वाहतूकीचे महत्व विचारात घेवून राज्य शासनाने राज्यातील रस्ते प्रवाशी वाहतुकीबाबत पुरोगामी / विकसनशील धोरणात्मक निर्णय घेवून सन १९७४ मध्ये राज्यातील रस्ते प्रवाशी वाहतुकीची राष्ट्रीयकरणाची योजना पूर्ण करुन राज्यातील रस्ते टप्पा प्रवासी वाहतुकीचे एकाधिकार एसटी महामंडळास प्रदान केलेले आहेत़. परिणामी, महामंडळाकडून प्रवाशांकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी सुविधा व सेवा यांची माहिती जनतेस मिळावी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे,तरी महामंडळांच्या कार्याबाबतची माहिती जनतेस मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

एसटी महामंडळाची माहिती समजून घेताना एसटी महामंडळ ने प्रकाशित केलेली नागरिकांची सनद समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिक कार्यक्षम,गतीमान,ग्राहकाभिमुख व पारदर्शक होण्यास मदत होईल़ कार्यक्षम वाहतुक सुविधा निर्माण व्हावी याकरिता मध्यवर्ती कार्यालय,३१विभागीय कार्यालये, ३ मध्यवर्ती कार्यशाळा ,२५० आगारे,३ प्राशिक्षण केंद्र, ९ टायर पुनःस्तरीकरण केंद्र,५६८ बसस्थानके,३६३९ प्रवाशी निवारे व सुमारे १०४००० कर्मचारीवर्ग अशी अवाढव्य यंत्रणा निर्माण केलेली आहे़ महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना कार्यक्षम दळण-वळण सुविधा निर्माण व्हावी याकरिता,”गांव तेथे रस्ता”,हे धोरण अंगिकारलेले आहे़ या धोरणास पूरक ”रस्ते तेथे एस़ टी़ ” अंसे धोरण महामंडळाने अंगिकारलेले आहे़. त्याचप्रमाणे महामंडळाने ”बहुजन हिताय व बहुजन सुखाय” व प्रवाशांच्या सेवेसाठी यास अनुसरुन रस्ते प्रवासी वाहतुक सुविधा नागरिकांसाठी पुरविलेली आहे़. महाराष्ट्र शासनाचे प्रवाशी वाहतुक विषयक धोरण व त्यास अंनुसरुन महामंडळाने निर्माण केलेले प्रवासी वाहतुकीचे जाळे यांचा हातभार राज्याच्या सर्वांगीण विकासावर झालेला असून,राज्याच्या विकासात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा मौलिक वाटा असल्याचे दिसून येते.

संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त ११०० रु. मध्ये : एसटी ची आकर्षक योजना!

एसटी संचालक मंडळाची संरचना

महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम १९५२ कलम क्र. 3 मधील तरतूदिप्रमाणे म.रा.मा.प. महामंडळाच्या संचालक मंडळाचे गठन करण्यात येते. या संचालक मंडळावर कमाल १७ संचालकांची नियुक्ती करण्याची तरतूद असून सदर नियुक्ती खालीलप्रमाणे करण्यात येते.

  • १ अध्यक्ष आणि १७ नियुक्त संचालक असणे आवश्यक आहे.
  • केंद्र शासनामार्फत ३ संचालकांची व राज्यशासनामार्फत १४ संचालकांची नियुक्ती करावी लागते.
  • राज्य शासनाकडून नियुक्त करावयाच्या १४ संचालकांचा तपशिल पुढीलप्रमाणे
    • उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.
    • राज्य शासनाच्या अधिकारी वर्गातून २ शासकीय संचालक.
    • वाहतूक व्यवस्थापन/अभियांत्रिकी/अर्थशास्त्र या क्षेत्रातील १ तज्ञ् व्यक्ती, ज्याची नियुक्ती राज्यशासनामार्फत केली जाते.
    • रा.प.महामंडळ श्रमिक संघटनाच्या प्रतिनिधीमधून २ संचालक ज्यांची नियुक्ती राज्यशासनामार्फत केली जाते.
    • ८ अशासकीय संचालक ज्यांना उद्योग व वित्त क्षेत्रातील चांगला अनुभव व पुरेसे ज्ञान असलेल्या व्यक्तींना नियुक्त राज्यशासनामार्फत केले जाते .

एसटी ची सद्य स्थिति

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने अलीकडच्या काही महिन्यांत लक्षणीय आर्थिक कामगिरी दाखवली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात, MSRTC ने ₹ 941 कोटी नोंदवून, वर्षातील सर्वोच्च मासिक महसूल गाठला. या कालावधीत, महामंडळाने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक केली, ज्यामुळे 31.36 कोटी रुपयांचे दैनिक उत्पन्न झाले.
  • यापूर्वी, ऑगस्ट 2024 मध्ये, MSRTC ने ₹16.86 कोटीचा नफा नोंदवला होता, जो नऊ वर्षांतील पहिला लाभदायक महिना होता. या उलाढालीचे श्रेय धोरणात्मक मार्ग ऑप्टिमायझेशन, सुधारित डिझेल कार्यक्षमता आणि रायडरशिप वाढवणाऱ्या सरकारी योजनांना देण्यात आले.
    • या सकारात्मक मासिक आकडेवारी असूनही, एमएसआरटीसी आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, ज्यात वाढता परिचालन खर्च आणि ₹11,000 कोटींची एकत्रित तूट यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत, संपूर्ण आर्थिक वर्षातील महामंडळाच्या वार्षिक उलाढालीची सर्वंकष आकडेवारी सार्वजनिकरित्या उघड केलेली नाही.

एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या सवलत योजना

एसटी महामंडळाची माहिती आणि योजना मध्ये एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या एकूण 36 योजणाची माहिती खालील तक्ता मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे

अ. क्र.सवलतींचा तपशीलबससेवा प्रकारप्रवास भाडयातील सवलत टक्केवारी
1स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम१००%
2डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम१००%
3अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठीसाधी१००%
4शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस ८००० कि.मी.पर्यंतसाधी, निमआराम,
शिवशाही ( आसनी) शिवशाही (शयनयान)
१००%
5राज्यातील ६५ वर्षावरील ते ७५ वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिकसर्व प्रकारच्या बसेस५०%
6राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकसर्व प्रकारच्या बसेस१००%
7विद्यार्थी मासिक पास सवलत –
शैक्षणिक / तांत्रिक
साधी६६.६७%
8विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलतसाधी५०%
9विद्यार्थ्यांना मोठया सुटृीत मुळ गावी येणे जाणे, परिक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या/येण्या साठीची सवलतसाधी५०%
10४० % अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अंपग व्यक्तीसाधी, निमआराम, शिवशाही आसनी७५%
७०%
11६५ % अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या अंध व अंपग व्यक्ती यांचे मदतनीससाधी, निमआराम शिवशाही आसनी५०%
४५%
12क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी७५%
13कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी७५%
14कुष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठीसाधी७५%
15राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठीसाधी३३.३३%
16विद्यार्थी जेवणाचे डबेसाधी१००%
17अर्जुन, द्रोणाचार्य, पुरस्कार प्राप्त खेळाडूसाधी, निमआराम, आराम,वातानुकुलित१००%
18दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त खेळाडू
साधी, निमआराम,
आराम
१००%
19आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम१००%
20लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम, आराम१००%
21पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचे मान मिळांलेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलतसाधी, निमआराम१००%
22विद्यमान विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलतसर्व प्रकारच्या बसेस१००%
23माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलतसर्व प्रकारच्या बसेस१००%
24रेसक्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरितासाधी६६.६७%
25मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्टया अपंग विद्दयार्थ्यांच्या सहलीसाठीसाधी६६.६७%
26अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति व त्यांचे एक साथीदारसाधी, निमआराम१००%
27सिकलसेल रुग्णसाधी१००%
28दुर्घर आजार (HIV)रुग्णसाधी१००%
29डायलेसिस रुग्णसाधी१००%
30हिमोफेलिया रुग्णसाधी१००%
31राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाधी, निमआराम,आराम१००%
32कौशल्य सेतू अभियान योजने अंतर्गत लाभार्थी ६ महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमा करितासाधी६६.६७%
33शैक्षणिक खेळसाधी५०%
34शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनासर्व प्रकारच्या बसेस१००%
35महिला सन्मान योजनासर्व प्रकारच्या बसेस५० %
36पोलीस/ जेल मोटर वॉरंटसाधी , निमआराम१००%
संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त ११०० रु. मध्ये : एसटी ची आकर्षक योजना!

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “एसटी महामंडळाची माहिती आणि 36 आकर्षक योजना ज्यामधून तुम्ही अगदी मोफत करू शकता प्रवास.” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top