pm internship scheme :- पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही भारत सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक उल्लेखनीय योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील तरुणांना मौल्यवान इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. कौशल्य विकास आणि रोजगाराच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग असलेली ही योजना, देशातील पहिल्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप संधी देऊन, शैक्षणिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करते. पीएम इंटर्नशिप योजना 2025 या योजनेबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ज्या मध्ये योजनेचा उद्देश , हेतु , विद्यार्थ्याना नेमका काय फायदा होणार आहे आणि लाभ कसा घ्यावा याविषयी माहिती दिलेली आहे.

pm internship scheme
भारताचे पंतप्रभान नरेंद्र मोदी यांनी पीएम इंटर्नशिप योजना ची सुरुवात केली या योजनेच्या मागच्या मुख्य उद्देश हा देशातील कौशल्यपूर्ण तरुणांचे प्रमाणे वाढावे आणि त्याचा हाताला रोजगार मिळवा. भारतातील प्रसिद्ध कंपनी मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते त्याच बरोबर अनेक इतरही लाभ बेरोजगार तरुणाना मिळणार आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
पीएम इंटर्नशिप योजना 2025
देश | भारत |
योजना | पीएम इंटर्नशिप योजना 2024 |
संघटना | कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | शीर्ष कंपन्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना वास्तविक जीवनातील कामाचा अनुभव देण्यासाठी |
पदांची संख्या | 500 शीर्ष कंपन्यांमध्ये 1,25,000 जागा |
पात्रता निकष | ITI: संबंधित व्यापारात मॅट्रिक + ITI |
डिप्लोमा: इंटरमीडिएट + AICTE-मान्यताप्राप्त डिप्लोमा | |
पदवी: UGC/AICTE-मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी | |
वय: १८ ते २४ वर्षे (OBC/SC/ST साठी सूट) | |
फायदे | ₹5,000 मासिक स्टायपेंड |
₹6,000 चे एक-वेळ पेमेंट | |
वास्तविक जीवनातील कामाचा अनुभव मिळवा | |
अर्ज फी | सर्व उमेदवार: ०/-(केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.) |
भागीदार कंपन्या | भारतातील प्रसिद्ध 549 कंपन्यामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी |
अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय आणि शासनाने त्यांना किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे
pm internship scheme पात्रता
अर्ज करण्यासाठी, पुढील पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
✔️अर्जदार उमेदवाराचे वय २१ ते २४ वर्षे दरम्यान असावे.
✔️ अर्जदार उमेदवार कोणत्याही पूर्णवेळ शैक्षणिक कार्यक्रमात/ अभ्यासक्रमात नोंदणी केलेली नाही.
✔️ अर्जदार उमेदवार पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
✔️ अर्जदार उमेदवार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न (स्वतःचे/पती/पत्नी/पालकांचे) वार्षिक ₹८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
✔️ कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी मध्ये असू नये.
PM Internship Registration 2025 | Link Here |
PM Internship Login | Link Here |
PM Internship Portal | Link Here |
Mahitia1.in | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
pm internship scheme कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र यासारखे सरकारने मार्फत जारी केलेली कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे – तुमची शैक्षणिक पात्रता पडताळण्यासाठी अलीकडील गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्रे.
- अलीकडील छायाचित्र – आवश्यक फॉरमॅटमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो.
- रिज्युम/सीव्ही – तुमचे कौशल्य, शिक्षण आणि मागील इंटर्नशिप/कामाचा अनुभव (जर असेल तर) अधोरेखित करणारा एक सुव्यवस्थित रिज्युम.
- वयाचा पुरावा – वय पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने ” pm internship scheme पीएम इंटर्नशिप योजना 2025 मधून तरुणांना नेमका काय लाभ मिळणार” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
सर्वाधिक वाचलेले
- क्रीडा क्षेत्रात करिअर कसे करावे? Career in the Sports!
- गाढवीच्या दुधाचे काय फायदे आहेत? की ज्यामुळे दुधाचा भाव 7 हजारपेक्षा जास्त आहे
- मशरूम शेती अनुदान मुळे शेतकऱ्याचा चांगला फायदा, A-Z माहिती
- रिअल इस्टेट गुंतवणूक म्हणजे एक दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग!
- २०२५ मध्ये करिअरसाठी सर्वोत्तम फ्रीलान्सिंग स्किल्स!