MPSC Civil Services Bharti 2025 : राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी , एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस भारती 2025 ची जाहिरात प्रकाशित झाली असून राज्यात mpsc मार्फत एकूण 385 विविध पदाची भरती करण्यात येणार असून राजपत्रित नागरी सेवा सामान्य प्राथमिक परीक्षा 2025 प्रीमियम परीक्षेची जाहिरात आहे. खाली पदानुसार किती जागा , पात्रता , अर्ज करण्याची शेवटची तारीख , परीक्षेचे वेळापत्रक आणि अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात दिलेली आहे त्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा.

MPSC Civil Services Bharti 2025
Great news for candidates preparing for competitive exams in Maharashtra! The Maharashtra Public Service Commission (MPSC) has officially released the advertisement for the Civil Services Recruitment 2025. A total of 385 vacancies will be filled across various posts through this recruitment drive. This announcement pertains to the Gazetted Civil Services Common Preliminary Examination 2025. Below, you will find details about the number of vacancies per post, eligibility criteria, the last date to apply, the examination schedule, and the application link. Make sure to read the complete article to get all the essential information.
पदाचे नाव & तपशील:
MPSC Civil Services Bharti 2025 या जाहिरातीमधून भरल्या जाणाऱ्या पदाचा तपशील
पद क्र | विभाग | संवर्ग | पद संख्या |
---|---|---|---|
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 127 |
2 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | 144 |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 114 |
Total | 385 |
MPSC Civil Services Bharti 2025 या जाहिरातीमधून भरल्या जाणाऱ्या पदाचा नुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.
अ.क्र. | विभाग | संवर्ग | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता | अतिरिक्त प्राधान्य |
---|---|---|---|---|---|
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा | 127 | कोणत्याही शाखेतील पदवी | कायदा, वाणिज्य किंवा अर्थशास्त्र विषयातील पदवीस प्राधान्य |
2 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा | 144 | विज्ञान, वनीकरण, कृषी किंवा पर्यावरणशास्त्र पदवी | वन्यजीव संरक्षण किंवा वनस्पतीशास्त्र (Botany) पदवीस प्राधान्य |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा | 114 | सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी | बांधकाम, प्रकल्प व्यवस्थापन किंवा सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प अनुभवास प्राधान्य |
अधिकृत जाहिरात व सूचना वाचून संपूर्ण तपशील जाणून घ्यावेत.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद सेवा व संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित/अतिरिक्त अथवा नवीन सेवा व संवर्गाच्या मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या सेवा व संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील व संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
- पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त सेवा व संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे
अ.क्र. | तपशील | विहित कालावधी |
---|---|---|
१ | अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक २८ मार्च, २०२५ रोजी १४.०० ते |
२ | ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक १७ एप्रिल, २०२५ रोजी २३:५९ |
३ | भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक १९ एप्रिल, २०२५ रोजी २३:५९ |
४ | चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक २१ एप्रिल, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025|MPSC Civil Services Bharti 2025 व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
सर्वाधिक वाचलेले
- ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?
- ग्रामीण डाक सेवक सैलरी चार्ट GDS (ग्रामीण डाक सेवक) पगार 2025 मध्ये, मूळ वेतन आणि मासिक वेतन तपासा
- Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी , MPSC book list in Marathi 2025
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम मराठीमधून PDF 2025
- पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी mpsc psi syllabus in marathi