Nabard bharti 2025 नाबार्ड मध्ये नोकरीची संधी manager पदाच्या जागांची भरती

Spread the love

Nabard bharti 2025 : राष्ट्रीय ग्रामीण व शेती विकास बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती मधून मॅनेजर पदांच्या विविध जागा भरण्यात येणार आहे, मध्ये ग्रेड ‘अ’ मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी 91 रिक्त जागांसाठी 2025-26 साली भरती जाहिरात करण्यात आली आहे. ग्रामीण विकास बँकिंग सेवा (RDBS), कायदेशीर सेवा, व प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा या विभागांमध्ये पदे भरली जातील. अर्ज ऑनलाईन नाबार्ड च्या संकेतस्थळावर 08 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान करता येतील.

NABARD ही सरकारी संस्था असून ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या भरतीत सहभागी होऊन उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या आणि Nabard मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हि सुवर्ण संधी आहे. PDF जाहिरात वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करा.

Nabard bharti 2025
Nabard bharti 2025

Nabard bharti 2025

  1. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी पदवी अनिवार्य असून, प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या शाखांतील शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. सामान्य विभागासाठी कोणत्याही विषयात किमान 60% गुणांसह पदवी, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 55% गुणांची पात्रता आहे. कायद्याच्या विभागासाठी LLB किंवा LLM पदवी आवश्यक आहे. संगणक, कृषी अभियांत्रण, फायनान्स, फिशरीजसारख्या तांत्रिक व विशेष शाखांसाठी संबंधित पदवी अथवा प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  2. वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे असून, SC/ST/OBC/PwBD वर्गांसाठी केंद्र सरकारच्या नियमांनुसार सवलत दिली जाते. प्रोटोकॉल व सुरक्षा विभागासाठी वयोमर्यादेच्या नियम वेगळे आहेत आणि त्यात सवलत नाही.
  3. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल: प्रारंभिक परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains), आणि मानसिक चाचणी व मुलाखत. पूर्वपरीक्षेत तर्कशक्ती, इंग्रजी, संगणकज्ञान, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, निर्णयक्षमता, सामान्य जागरूकता, ग्रामीण विषय यांचा समावेश असेल. मुख्य परीक्षेत वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ परीक्षा असून विषयानुसार प्रश्न विचारले जातील. अंतिम म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखत होईल.
  4. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज देताना फोटो, सही, कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्क सामान्य वर्गासाठी 850 रुपये तर राखीव वर्गांसाठी 150 रुपये आहे.
  5. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला रु. 44,500/- पासून पगार देण्यात येईल, त्यात विविध भत्त्यांचा समावेश असेल. पोस्टिंग संपूर्ण भारतात होऊ शकते. प्रॉबेशन कालावधी दोन वर्षांचा राहील.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात 290 जागांची भरती

हा लेख NABARD Bharti 2025 संदर्भातील अधिकृत जाहिरात आणि विविध संकेतस्थळांवरून गोळा केलेल्या माहितीनुसार तयार केला आहे.

PDF जाहिरातयेथे click करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने Nabard bharti 2025 नाबार्ड मध्ये नोकरीची संधी manager पदाच्या जागांची भरती   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top