राज्यातील शेतकरी बाधवांसाठी मुख्यमंत्री’ सौर कृषीपंप योजना राबविण्यास शासन निर्णय क्र. सौरप-२०१८/प्र.क्र.४०१/उर्जा-7, दि.१५ नोव्हे.२०१८ अन्वये मंजूरी दिली होती. या योजनेअंतर्गत 1 लाख शेतकरी लाभयार्थ्याना लाभ देण्यात येणार आहे या लेखातून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा या विषयी माहिती पाहणार आहोत सोबत शासनाचे GR आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ शेतकऱ्यांना शाश्वत आणि स्वस्त/अगदी माफक दरात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवली जात असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील सिंचनासाठी 3 HP, 5HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप खरेदी करण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत, तर अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना 95 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. स्वतःच्या मालकीची शेतजमीन असलेल्या शेतकरी महाऊर्जाच्या च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपली अर्ज प्रकिया पूर्ण करू शकतो. खाली अर्ज कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
कसे पाहावे आधार कार्ड आणि पैन कार्ड लिंक आहे की नाही Adhar and pan Card Link status
सौर कृषी पंप फायदे
सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे कारण त्यांना आता सिंचन करण्यासाठी पारंपरिक विजेवर अवलंबून राहायची गरज भासणार आणि सोबत अनेक फायदे आहेत.
- दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता :- सौर कृषी पंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे त्यांना शेतीपंपासाठी वीज उपलब्ध होते. दिवसभर चांगले सिंचन होईल. त्यामुळे रात्री शेतीस पाणी देण्यासाठी जागल करायची गरज नाही. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यन्त सोलारपंप चालू राहतो.
- दिवसा विनाव्यत्यय अखंडित वीज पुरवठा :- सौर ऊर्जा असल्याने, दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळतो. जो पर्यन्त सूर्य आहे तो पर्यन्त तुमचे मोटर चालू राहील. भारनियमनाचे टेंशन नाही.
- वीज बिलापासून मुक्तता :- सौर कृषी पंपांमुळे शेतकऱ्यांना वीज बिलापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. एकदा का सौर पंप बसवला की तुम्हाला लाइट वरील पंप वापरण्याची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा खर्च वाचेल. आर्थिक बचत होईल.
- डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च :- ज्या शेतकाऱ्यांकडे लाइट नाही असे शेतकरी शेतीच्या सिंचणसाठी डिझेल पंपचा वापर करतात त्यांना डिझेल चा खर्च पण खूप जास्त असतो. पण आता सौर कृषी पंपांमुळे त्या शेतकाऱ्यांचा मोठा फायदा होईल. फक्त एकदा एकदाच गुंतवणूक केल्यावर देखभाल खर्च जवळजवळ शून्य असतो.
- पर्यावरण पूरक परिचलन :- डिझेल पंपांच्या धुरमुळे खूप प्रदूषण होते,सौर ऊर्जा वापरल्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरण संरक्षण होते.
- शेती सिंचनपंप खरेदी साठी 90 टक्के सबसिडी : सौर कृषी पंप खरेदी करताना एकूण पूर्ण खरेदी रक्कम भरायची गरज नाही महाराष्ट्र शासन च्या कृषि विभागामार्फत 90 ते 95 टक्के सबसिडी देण्यात येते
लाभार्थी निवडीसाठी पात्रता काय आहे
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी. पाणीस्त्रोत उदा. सुरुवातीला विहीर साठी ही योजना होती पण आता शासनाने यामध्ये बदल केला आणि कोणताही पाणीस्त्रोत असल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल
- 5 एकरापर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास 3 hP क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत 5 hP आणि 5 एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 7.5 hP क्षमतेचा सौर कृषीपंप 90 टक्क्यांपर्यंत, तर अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना 95 टक्क्यांपर्यंत अनुदान सोबत देण्यात येणार आहे.
- राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी पात्र आहेत
- विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
- अतिदुर्गम भागात राहणारे शेतकरी वर्ग
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी पात्र आहेत
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र आहेत.
- सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक राहील म्हणजे 90 ते 95 टक्के अनुदान
- अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा. जर घेतला असेल तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा या विषयी माहिती खाली दिली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा
सौर कृषीपंप योजनेचा लाभ दोन प्रकारचे शेतकरी घेऊ शकतात, त्यामधील एक म्हणजे नविन वीज जोडणी अर्जदार आणि दुसरे म्हणजे प्रलंबित अर्जदार हे दोन्ही अर्जदार एकाची ठिकाणी अर्ज करू शकतात. खालील पायऱ्याचे पालन करून शेतकरी त्याची अर्ज प्रकिया पूर्ण करू शकते.
- पायरी 1 – महावितरणाच्या वेब पोर्टल वर (https://www.mahadiscom.in/solar) जावे.
- जुने प्रलंबित अर्जदार :- सध्याच्या जुन्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य माहिती , उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे ती माहिती पूर्ण भरावी.
- नवीन अर्जदार :- (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरलेले नाहीत) सर्व फील्ड/माहिती भरणे अनिवार्य आहे.
- पायरी 2 – A-1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अपलोड करावी लागेल.
- अर्जदाराने A-1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. सही केली नसेल तर अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहेत.
- ऑनलाइन A-1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, विभागामार्फत सर्वेक्षण केल्या जाईल त्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोटिस जारी केले जाईल. जर काही विसंगती/ चूक आढळून आली तर तत्काल त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल. आणि तशी सुधारणा करण्यास करण्यास सांगण्यात येईल.
- डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल (राज्यात एकूण 5 एजन्सी काम करतात त्या त्या एजन्सी आणि त्यांची किंमत समजून घेणे आणि कोणत्या एजन्सी चे सौर कृषी पंप चांगले आहे त्याची पूर्ण माहिती काढूनच त्या एजन्सी चे नाव शासनाकडे सादर करावे (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
- पंतप्रधान पदाची निवड कशी केल्या जाते आणि भारताचे सर्व पंतप्रधानाची यादी कालखंडानुसार
- पायरी 2 :- योजनेचा लाभ घेताना प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती कळवण्यात येईल त्यामुळे तुमच्या तोच मोबाइल नंबर द्या ज्या मोबाइल नंबर ला तुमचा आधार कार्ड लिक्क आहे.
अंशकालीन प्रमाणपत्र नमुना तुम्ही तुमचे प्रमाणपत्र बनवले आहे का ?
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा,gR आणि योजनेविषयी a-z माहिती” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.