या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा हफ्ता: महाराष्ट्र विद्यमान सरकारची महत्वकांक्षी योजना जी मध्य प्रदेश या राज्यातील अंमलबजावणी नंतर महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली होती त्या योजनेमध्ये मागील काही दिवसापासून अनेक बदल झाली आहेत आणि अनेक महिलांची लाडकी बहिण योजनेचा 1500 महिना बंद झाला आहे. आता पुन्हा ऑगस्ट २०२५ मध्ये शासनाने अर्जाची छाननी करण्यास सुरुवात केली आहे आणि खाली दिलेल्या महिलांना पुढील हफ्त्यासाठी बाद केले आहे त्यांना या नंतर लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही. नेमक्या त्या कोणत्या महिला आहेत वाचा त्याविषयी सविस्तर माहिती.

लाडकी बहिण योजनेचा इतिहास
8 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री लाडली बहना योजना या नावाने मध्य प्रदेश सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली होती त्यांचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ,च्या आरोग्य आणि पोषणाच्या पातळीत सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हा होता. त्याने योजने सुरु केली तेव्हा राज्यातील महिलांना 1000 मासिक हफ्ता कळू केला कालांतराने १२५० हफ्ता दिला जात होता 8 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री लाडली बहना योजना या नावाने मध्य प्रदेश सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली होती त्यांचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ,च्या आरोग्य आणि पोषणाच्या पातळीत सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हा होता. त्याने योजने सुरु केली तेव्हा राज्यातील महिलांना 1000 मासिक हफ्ता कळू केला कालांतराने १२५० हफ्ता दिला जात होता सद्य स्थितीमध्ये मध्य प्रदेश मध्ये योजना चालू आहे
त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शिवसेता आणि भाजप सरकार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुन २०२४ हि लाडकी बहिण योजना चालू करण्यात आली आणि संपूर्ण राज्यातील महिलांना प्रतिमहिना 1500 महिना आर्थिक लाभ प्रत्यक्ष त्यांचा बँक खात्यामध्ये देण्यात येत आहे. योजना चालू होईल १ ४ महिने झाले असून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक लाभ मिळत आहे परंतु मागील काही महिण्यापासून शासनाने अर्ज पडताळणी वर जास्त जोर दिला आहे आणि राज्यातील अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वगळण्यात आले आहे .
हे हि वाचा
१. ई-श्रम कार्ड लाभ तुम्हाला माहिती आहेत का ? उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई श्रम कार्ड
२. बायोगॅस योजना मधून मिळत आहे १६००० हजाराचे अनुदान आजच करा अर्ज
३. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही येथे पहा
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा हफ्ता
- ज्या अर्जदार महिलांचे वय 1 जुलै २०२४ रोजी नुसार २१ पूर्ण असणे आवश्यक आहे.
- १ ऑगस्ट २०२५ रोजी नुसार ज्या अर्जदार महिलांना ६५ वर्ष पूर्ण झाले आहेत त्या महिलाला अपोआप लाडकी बहिण योजनेमधून वगळण्यात येईल. त्यांना ऑगस्ट २०२५ पासून पुढे लाडकी बहिण योजनेमधून 1500 महिना मिळणार नाही.
- एकाच घरातील २ किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही, जर एका कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये असलेल्या २ किंवा त्यापेक्षा जास्त महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असतील तर आता फक एकाच महिलेला लाडकी बहिण योजनेचा फक्त चालू राहणार नाही उर्वरित महिलांचे 1500 महिना आपोपाप बंद होईल.
- नवीन रेशनकार्डसाठी अर्ज कसा करायचा ? new ration card maharashtra
- आता जर तुम्ही तुमचे रेशन वेगळे करून घेतले तर त्याचा काही फायदा होणार नाही लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना जे जुने रेशन कार्ड तुम्ही जोडले होते त्याच रेशन कार्ड ला ग्राह्य धरून लाभार्थी महिलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. (उदा. सासू आणि सून , किंवा दोन जावा आणि सासू , एकाच रेशन कार्ड वरअसतील तर त्यापैकी एकाच महिलेस लाभ मिळेल.
- दुसऱ्या राज्याच्या राह्वाशी असलेल्या महिलांना आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्थलांतरीत लाभार्थी महिलांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल जेणेंकरून आणि अपात्र महिलांना बाद करण्यात येईल.
- एका कुटुंबातील दोन बहिणींना आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यापैकी एका बहिणीस अपात्र करण्यात येईल.