hyderabad gazette काय आहे आणि त्याचा मराठा आरक्षणासोबत असलेला संबध 


hyderabad gazette : हे एक अस दस्तऐवज आहे जे निजामशाहीच्या काळात प्रकाशित झाले होते आणि त्यामध्ये मराठा समाजाविषयी सविस्तर माहिती दिली होती. हे  दस्तऐवज मराठा आरक्षणा पार्श्वभूमी वर चर्चेत आले आहे. त्याचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे याविषयी माहिती देणारा लेख त्यामुळे माहिती पूर्ण वाचा. 

hyderabad gazette 
hyderabad gazette 

hyderabad gazette 

हैद्राबाद गॅझेट हा निजामाच्या राज्याचा एक अधिकृत राजपत्रक असून या जॅझेंट मध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी , समाज घटकाचे वर्गीकरण व इतर आवश्य माहिती निजाम सरकार मार्फ़त त्याच्या काळात 1918 जाहीर करण्यात आले होते. hyderabad gazette समजून घेताना हैद्राबाद संस्थानचा इतिहास समजून घेणे गरजेचं आहे. 

हैद्राबाद संस्थान 

  • हैद्राबाद ची स्थापना १५८९ मध्ये कुटुंबशाहि वंशाचे मुहंमद कुळी शाह यांनी केली होती ,  हैद्राबाद मध्ये हैद्राबाद आणि आताच मराठवाडा चा समावेश होता , याच हैद्राबाद संस्थानचे शेवटचे राजा निजाम-उल-मुल्क-आसफ शाह होते. १९४८ साली हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. 
  • हैद्राबाद संस्थान मध्ये मराठवाडा असताना संस्थान कडून काही कर वसुली केली जात असे त्याचबरोबर त्याचे काही निज सुद्धा होते त्याच नियमाचे प्रकाशन  hyderabad gazette हैद्राबाद गॅझेट म्हणून ओळखले जाते. जो अधिकृत दस्ताऐवज आणि आदेश म्हणून ओळखले जायचे. 
  • हैद्राबाद गॅझेट मध्ये  सर्व सामाजिक  बाबीचा समावेश होता जस कि , मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक या भूभागांतील विविध जाती-जमातींची सविस्तर माहिती , 1901 च्या जनगणनेनुसार, मराठा आणि कुणबी समाजाचा एकत्रित उल्लेख “मराठा-कुणबी” नावाने उल्लेख केलेला आहे , याच  काळातील लोकसंख्या, प्रथा, परंपरा, भू-संपत्ती म्हणजे जमीन, गाय-वासरे, पशू-पक्षी यांचा सविस्तर आढावा, निजामशाही काळात मराठा समाजाला “हिंदू मराठा” म्हणून शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याचा आदेश ,समाजातील जाती – जमातींची स्थिती, प्रशासकीय  निर्णय, कायदे आणि शासनाचे आदेश. त्या काळचा सामाजिक व प्रशासनिक आरसा, ज्यातून मराठा समाजाला मागासवर्ग म्हणून मान्यता दिली गेली होती याविषयी सविस्तर माहिती hyderabad gazette हैद्राबाद गॅझेट मध्ये बघायला मिळते. 

मराठा आरक्षणामध्ये हैद्राबाद जॅझेंट चे महत्व 

सध्या मुंबई येथील आजाद मैदान वर मराठा समाज आरक्षण साठी आंदोलन करत आहे या आंदोलन जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असून आमरण उपोषण चालू आहे. याच आंदोलनांसाठी आजचा दिवस म्हणजे २ सेप्टेंबर २०२५ महत्वाचा ठरला आहे कारण महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद आणि सातारा गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी ज्या शासनाच्या अधिकृत राजपत्रात ;असल्यामुले आणि शासनिक कागदपत्रांमध्ये महत्वाची भूमिका बजावते , याच जॅझेंट च्या आधारे मराठा समाजाला कुणबी समाजाला जोडून ओबीसी obc मधून आरक्षण देण्यास मदत होईल. त्यानुषंगाने आज हैद्राबाद जॅझेंट लागू करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. 

याच प्रमुख्य कारणाने hyderabad gazette हैद्राबाद गॅझेट संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशात चर्चेत आले आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “hyderabad gazette काय आहे आणि त्याचा मराठा आरक्षणासोबत असलेला संबध  व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

हे हि वाचा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top