कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने EPFO १ सप्टेंबर २०२५ पासून ५ महत्वपुर्ण बदल केले आहेत. ज्याचा परिणाम आपल्या देशातील आणि राज्यातील कोट्यवधी पगारदार कर्मचारी वर्गावरती होणार आहे. परिणाम नकारात्मक नसून सकारात्मक असून त्याचा फायदा होणार आहे. भविष्य निर्वाह निधी PF प्रकिया सुलभ करणे , पारदर्शकता सुधारणे आणि डिजिटल सेवा अधिक सुलभ करणे हे या सुधारणे मागचे उद्दिष्ये आहे. भारत देशात सुमारे सात कोटी पेक्षा जास्त epfo वर नोंदणीकृत पगारदार ग्राहक असून या सुधारणांमुळे त्या ग्राहकाची बचत , पैसे काढणे , पेन्शन आणि इतर आवश्यक सेवेमध्ये सुधारणा होऊन ग्राहकास त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.

पीएफ खात्यांमध्ये रिअल टाइम व्याज जमा करणे.
बहुचर्चित सुधारणेपैकी हि एक अत्यंत महत्वाची सुधारणा मानली जात आहे कारण या सुधारणे नंतर PF खात्यामधील जमा असलेल्या रकमेवर मिळणारे व्याज रिअल टाइम मिळेल पूर्वी आर्थिक वर्ष संपल्यानंतरही काही महिने वाट बघावी लागत होती. वेळेवर जमा न झाल्यामुळे पासबॉक मध्ये नोंदणी मध्ये सुद्धा वेळ लागत असे त्यामुळे ग्राहकास हिशोब लावायला सुद्धा संभम निर्माण होंत असल्याचे आढळून आहे, त्यामुळे ग्राहकास जास्त त्रास होत होता परंतु आता तस होणार नाही.
१ सप्टेंबर २०२५ पासून झालेल्या बदलामुळे आता तात्काळ ग्राहकांच्या PF खात्यामध्ये व्याज जमा केले जाईल आणि त्याची नोंद तात्काळ पासबॉक मध्ये उपडेट होईल त्यामुळे ग्राहकास कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही आणि EPFO वरती विश्वास वाढण्यास मदत होतील.
पैसे काढण्याचे सोपे नियम.
वैद्यकीय अडचण , उच्च शिक्षण, गृहकर्जाची परतफेड आणि विवाह यासारख्या विशिष्ट कारणांसाठी ईपीएफ खात्यातून पैसे काढणायची मुभा होती , अर्ज केल्यानंतर तात्काळ पैसे काढता येत नव्हते त्यासाठी १५ दिवसापेक्षा अधिकच वेळ लागत असे आणि अधिकरी जेव्ही रक्कम मंजूर केले तेवढेच पैसे बँक खात्यामध्ये जमा होत होते. त्यामळे ग्राहकास खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते ,
आता या प्रकियेमध्ये मोठा बदल केला आहे. कागपत्रामध्ये लक्षणीय घट केली असून मंजुरीची प्रकिया डिजिटल आणि जलद केली आहे. त्यामुळे अतिशय कमी वेळात ग्राहकास त्यांनी क्लेम केलेली पैसे त्याच्या बँक खात्यात जमा होतील याचा मोठा फायदा वैद्यकीय अडचणी मध्ये होईल.
नोकऱ्यांमध्ये युनिव्हर्सल UAN-आधारित स्थलांतर प्रणाली
Universal Account Number ज्याला आपण सध्या भाषेत UAN असे म्हणतो , जो UAN हा प्रत्येक ग्राहकांसाठी एकच अद्वितीय आहे, पूर्वी जेव्हा एखादा ग्राहक नोकरी बदलत असे तेव्हा त्याचे PF अकाउंट पहिल्या कंपनी मधून दुसऱ्या कंपनी मध्ये स्थलांतर करण्याची प्रकिया होती जी वेळेवर होणे गरजेचे होते पण तसे होत असल्याचे अधिक वेळा दिसून आले त्याचा त्रास ग्राहकास होत होता.
आता या नवीन प्रकिया मध्ये हि व्यवस्था अतिशय सुलभ आणि जलद केली आहे जेव्हा ग्राहकाची नवीन कंपनी त्यांच्या डिजिटल ठिकाणी ग्राहकाचा UAN टाकते तेव्हा लगेच त्याचे खाते स्थलांतर होते, त्यामुळे ग्राहकास त्याचे PF पैसे त्याच्या pf खात्यावर तात्काळ जमा होते.
विस्तारित पेन्शन योजनेचा लाभ.
या १ सप्टेंबर २०२५ झालेल्या बदलामध्ये हा एक मोठा बदल आहे आता ग्राहकास त्याच्या EPFO खात्यामध्ये पेन्शन मध्ये समाविष्ट होण्याचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर ग्राहकाची इच्छा असेल तर तो या पेन्शन योजमध्ये समाविष्ट होऊन त्याचा फायदा निवृत्ती नंतर घेऊ शकतो.
पूर्णपणे डिजिटल तक्रार निवारण प्रणाली.
पूर्वीपासून चालत आलेल्या प्रकियामध्ये तक्रार निवारण प्रकिया अतिशय जटिल, गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होत होती यामध्ये ग्राहकाचा अधिक वेळ निघून जात होता, KYC यामध्ये सुद्धा ग्राहकास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता नवीन प्रक्रियेमध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत तक्रार निवारण प्रणाली मध्ये सुधारणा केल्या आहेत त्यामळे तक्रार निवारण अतिशय जलद गतीने होतील. ग्राहकाने तक्रार केल्या नंतर ती ट्रॅक करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला आहे ,ठराविक मुदतीमध्ये त्याला प्रतिसाद मिलेल याची तरतूद विभागाने केली आहे. हे सर्व डिजिटल EPFO च्या अधिकृत वेबसाइट वर होईल त्यामुळे ग्राहकास प्रत्यक्ष epfo च्या कार्यालयात भेट द्यायची गरज भासणार नाही त्यामुळे ग्राहकाचा वेळ आणि पैसाची बचत होईल.
निकर्ष
पीएफ खात्यांमध्ये रिअल टाइम व्याज जमा करणे. , पैसे काढण्याचे सोपे नियम , नोकऱ्यांमध्ये युनिव्हर्सल UAN-आधारित स्थलांतर प्रणाली , विस्तारित पेन्शन योजनेचा लाभ, पूर्णपणे डिजिटल तक्रार निवारण प्रणाली या ५ प्रामुख्य आणि मोठ्या बदलामुळे १ सप्टेंबर २०२५ पासून पुढे EPFO चे पगारदार ग्राहकास याचा मोठा फायदा होणार आहे, जसजसे याबद्दल जनजागृती होईल तसतसे लोकांचे याचे महत्व समजले असे EPFO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मत व्यक्त केले आहे.
लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “EPFO १ सप्टेंबर पासून ह्या ५ मोठ्या सुधारणा लागू करणार : पगारदार कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे हि वाचा.
- कमवा आणि शिका योजना कोणी सुरू केली ?
- आज शहरात 20 पैकी एका आणि खेड्यात 30 पैकी एक महिलेला होत आहे कॅन्सर
- महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी !
- शबरी आदिवासी घरकुल योजना:आता मिळणार सर्वाना आपल्या स्वप्नातील घर !