कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना काय आहे ? Chief Minister Agriculture and Food Processing Scheme


Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : महाराष्ट्र आणि देशातील शेतकरी वर्गासाठी शासनामार्फत योजना राबवल्या जात आहे या योजनेचे नाव आहे कृषी आणि अन्न परकीय योजना जय मधून लाभ्यार्थ्याना प्रत्यक्ष लाभ होणार आहे, आपल्या देशातील शेतकरी वर्ग हा रोजदार देणारा असावा , कृषी उत्पादकता वाढावी त्याची गुणवत्ता वाढवणे , चांगल्या गुणवत्तेचे माल निर्यात करावे व हे उद्द्योग करणारे मनुष्यबळ आपल्या राज्यात निर्माण व्हावे या उद्देश्यने या योजनेची सुरुवात झाली.

कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना काय
कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना काय

या योजनेची सुरुवात २०१७-१८ यावर्षी सुरू झाली असून झाली २०२६-२७ पर्यंत आणि ती १७ मी २०२२ रोजी पुढील पाच वर्षेसाठी ,म्हणजे २०२६-२७ पर्यंत वाढण्यात आली. या योजनेचा लाभ कसा घ्यावा. नेमका काय लाभ मिळणार आहे , कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतील , आणि पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख खास शेतकरी वर्गासाठी त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme

कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना हि एक अशी योजना आहे ज्या योजनेच्या आधारे अर्जदार शेतकरी किंवा शेतकऱ्याचा ग्रुप एक कंपनी चालू करू शकतात , या कंपनी मध्ये शेतामधील कच्च्या मालावर प्रकिया करून चांगल्या गुणवत्तेच्या मालाची / उत्पादनाची निर्मिनी करून देशाबाहेर किंवा राज्याबाहेर मालाची योग्य दारात निर्यात करणे जेणेंकरून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, कैशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती होईल.

उद्दिष्टये काय आहे योजनेचे

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रकल्पाची उभारणे करून त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून शेती मधील उत्पादनाच्या बाजारभावाला प्रोत्साहन देणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादित अन्नाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी प्रकल्पाची उभारणे करणे. हे प्रकल्प आधुनिक असल्यामुळे ऊर्जाची पण बचत करेल.
  • उत्पादित अन्न मालावर प्रकिया करून त्यापासून असे उत्पादन तयार करायचे ज्याला बाजारपेठेत / मार्केट मध्ये चांगला भाजारभाव असेल.
  • रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी प्रक्रिया I Online Ration Card Maharashtra 2024
  • योग्य बाजारपेठ तयार उभारणे.
  • शेतीच्या मालापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन तयार करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे.
  • ग्रामीण भागातील शेतकरी वर्गास या योजेनचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.

शेळीपालन शेड बांधकाम योजनेतून शेळीपालकांना मिळणार आता 25% ते 50% पर्यंत सबसिडी!

या योजनेमधून आर्थिक लाभ काय होईल.

कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना मधून व्यवसायाची उभारणी करण्यासाठि आर्थिक साहाय्य पुढील प्रमाणे दिल्या जाते.

  • प्रक्रिया युनिटच्या कारखाने आणि यंत्रांच्या बांधकामासाठी ३०% अनुदान (गृहनिर्माण प्रक्रिया युनिटसाठी सिव्हिल वर्क) आणि कमाल मर्यादा रु. ५०.०० लाख.
  • दोन समान हप्त्यांमध्ये “क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड सबसिडी” च्या आधारावर अनुदान दिले जाईल, अ) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि ब) पूर्ण व्यावसायिक उत्पादनानंतर.
  • कर्जाची रक्कम अनुदानापेक्षा दीड पट जास्त असावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे.

  • अर्जदार शेतकरी हा १८ वर्षापेक्षा जास्त वयाचा असणे आवश्यक आहे , कमीतकमी १८ वर्ष वय पूर्ण पाहिजे
  • अर्जदार लाभार्थी कडे स्वतःचे आधार आणि पण कार्ड असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांचा त्याच्या बँक मध्ये चांगले आर्थिक व्यवहार असायला पाहिजे म्हणजे त्याचा सिबिल स्कोअर चांगला राहील.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे , त्या शेतीचे ७/१२ आणि नमुना न. ८- अ किंवा भाडेपट्टा असे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • बँक कडून कर्ज मंजुरीचे मूळ पत्र
  • बॅंकचे मुल्याकंन रिपोर्ट मूळ
  • ७/१२ , नमुना न. ८अ किंवा करारनामा प्रमाणपत्र
  • अजर्दार व्यक्ती/ व्यवसायाचे पॅन आणि आधार कार्ड
  • उपक्रम नोंदणी प्रमाणपत्र ( उदद्दम नोंदणी )
  • अजर्दार चालू करू इच्छिणाऱ्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR details project report)
  • प्रकल्पाच्या प्रकियेचा आऊटपुट फ्लो चार्ट
  • प्रकल्पाच्या उभारणीसाठी नोटरी करार लागेल
  • बांधकामाचा नकाशा सुद्धा लागेल ज्याला ब्लू प्रिंट म्हणतात.
  • प्रकल्पाचे जे महत्वाचे यंत्र विकत घेणार आहेत त्याचे कोटेशन जे बँक अधिकाऱ्याने मान्यता दिलेले असावे.
  • बांधकामाचे एकूण बजेट बँक अधिकाऱ्याने मंजूर केलेले असावे
  • जिल्हास्तरीय प्रकल्प अमलबजावणी समितीचे शिफारस पत्र

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme या लिंक मध्ये महारष्ट्र शासनामार्फत प्रकाशीत केलेल्या अधिकृत gr दिलेला आहे. वाचूनच आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना काय आहे ? Chief Minister Agriculture and Food Processing Scheme व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

अंशकालीन प्रमाणपत्र नमुना तुम्ही तुमचे प्रमाणपत्र बनवले आहे का ?


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top