LADKI BAHIN E-KYC : महाराष्ट्र राज्य शासन यांच्या मार्फत चालवल्या जाणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या मधून महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलाना प्रती महिला 1500 रुपये प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये dbt च्या माध्यमातून जमा केल्या जातात. या ekyc अनिवार्य करण्यामगचा उद्देश हा पारदर्शकता आणणे आणि बनावट किंवा अपात्र लाभयार्थ्याना वगळणे हा आहे. त्यामुळे पात्र लाभयार्थ्यानी खाली दिलेल्या तारखेच्या अगोदर आपली ekyc प्रकिया पूर्ण करावी. खाली LADKI BAHIN E-KYC कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे. सोबत शासनाच्या अधिकृत वेबसाइट ची लिंक सुद्धा दिली आहे जिचा वापर करून तुम्ही तुमची ekyc पूर्ण करू शकता त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.ladki bahin yojana ekyc process

राज्यातील गरजू व पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ घेता यावा , जे शासनाची दिलेल्या कारणाने अपात्र ठरतील व ज्यांनी बनावट कागदपत्र देऊन या योजनांचा लाभ घेत आणि त्यांना वगळता यावं या हेतू ने शासनाने LADKI BAHIN E-KYC अनिवार्य करण्याचे ठरले आहे त्यामुळे महिला वर्गास जास्त टेन्शन घायची गरज नाही तुमचे लाडकी बहीण योजेनचा हफ्ता बंद होणार नाही जर तुम्ही योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करत असाल तर तात्काळ तुमची LADKI BAHIN E-KYC पूर्ण करून घ्या मध्ये पुढील कामात सुद्धा तुमचे लाडकी बहीण योजनेचे हफ्ते थांबणार नाहीत. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही LADKI BAHIN E-KYC पूर्ण करून शकता त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.
ladki bahin yojana ekyc process
- मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
- जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
- जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा.
- संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे.
- OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग ( SC, ST, OBC , OPEN, GENERAL ) निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
| ladki bahin yojana ekyc process लिंक | येथे क्लिक करा |
| अश्याच उपडते साठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा | येथे क्लिक करा |
e-kyc कधी करावी ?
महाराष्ट्र शासन यांच्या काढून अधिकृत पणे सांगण्यात आले आहे की येत्या 18 नोव्हेंबर 2025 च्या अगोदर आपली ladki bahin ेe kyc करणे अनिवार्य राहील आणि त्यानंतर दरवर्षी जून महिन्यापासून पुढील 2 महिन्याच्या आत म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आपली ekyc करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला वेळेवर तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1500 महिना तुमच्या बँक खात्यावर येतील. जर तुम्ही ekyc केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडकी बहिण kyc मध्ये येणाऱ्या अडचणी
लाडकी बहिण योजना kyc करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे , खूप पर्यंत करूनही त्यांना आधार OTP येत नसल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे अनेक जण खूप निराश झाले आहेत. राज्यातील लाखो लोक एकाच वेळ LADKI BAHIN E-KYC करत असल्यामुळे ही अडचण येत आहे. त्यामुळे काळजी करू नका तुही रात्री १२ नंतर पर्यंत केला तर नक्की तुमची kyc पूर्ण होईल त्यासाठी अर्जदार महिलेचे आधार कार्ड व आधार लिंक मोबाइल नंबर व आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड व मोबाईल नंबर सोबत ठेवणे गरजेचा आहे OTP आला कि तात्काळ तुम्हाला टाकून kyc पूर्ण करता येईल .
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “ladki bahin yojana ekyc process लाडकी बहीण योजना मधून लाभ घेण्यासाठी ekyc बंधनकारक , आजच करा आपली kyc पूर्ण खालील माहितीच्या आधारे.” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनाअंतर्गत मिळणार 20000 ते 30000 हजाराचे वार्षिक भत्ता….
- तुमचे आधार सीडिंग बँकेत झालेले आहे का?
- नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी! taking care of a newborn baby!

