भीमा कोरेगावचा इतिहास नेमका काय आहे! bhima koregaon itihas marathi


भीमा कोरेगाव हे पुणे जिल्यातील भीमा नदीच्या काठी बसलेले एक गाव आहे या गावाचे एवढेच महत्व नसून ऐतिहासिक दृष्ट्या या गावाला अत्यंत महत्व आहे. कारण इतिहासात एक लढाई होऊन गेली , त्यामुळे देशातील सामाजिक समीकरण बदलून गेले एक विशिष्ट समाज जो सामाजिकदृष्या समाजाच्या मूळ प्रवाहाच्या अगदी पलीकडे होता तो प्रवाहात येण्यास सुरुवात झाली या लेखातून भीमा कोरेगावचा इतिहास नेमका काय आहे! bhima koregaon itihas marathi या विषयी माहिती सविस्तर समजून घेऊ. ला लेख विद्यार्थी यांच्या सोबत इतिहास प्रेमी यांच्या साठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे . त्यामुळे लेख पूर्ण वाचा .

bhima koregaon itihas marathi
bhima koregaon itihas marathi

bhima koregaon itihas marathi

आज देशात भीमा-कोरेगांव या गावाची ओळख कुणाला नाही हे गाव नावास्वरूपाला आले तत्यामागे दोन ऐतिहासिक घटना आहेत. एक म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजी झालेली लढाई जी मराठा महासंघाच्या पेशवे सैन्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या सैन्य यांच्या मधील लढाई. आणि दुसरी घटना म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी झालेला हिंसाचार आणि त्यामुळे तयार झालेला वाद-विवाद आणि संपूर्ण राज्यात झालेला गोंधळ . या प्रमुख दोन घटनेमुळे भीमा – कोरेगाव इतिहासदृष्ट्या खूप महत्वाचे आहे.

दुसरी घटना आता काही वर्षा पूर्वी घातली त्यामुळे त्याबद्दल सर्वांना त्याची माहिती आहे . या लेखात पहिला घटनेविषयी माहिती घेऊ आणि या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत .

1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चे सैन्य आणि मराठा पेशवे सैन्य यांच्या मध्ये भीमा कोरेगाव येथे लढाई झाली होती. या लढाईला भीमा – कोरेगाव लढाई म्हणून ओळखले जाते.

लढाईची पार्श्वभूमी

  • इ.स. १८०० दशकात मराठा साम्राज्य अनेक तुकड्यात विभाजलेले गेले.
  • पुण्याचे पेशवे , ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे , इंदूर चे होळकर , बडोद्याचे गायकवाड आणि नागपूर चे भोसले असे तुकड्या – तुकड्यात कमकुवत साम्राज्य होते.
  • 13 जून 1817 रोजी गायकवाड आणि पेशवे घराण्यात महसूलावरून वाद निर्माण झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशाना मध्यस्थी करण्यास बोलवले. ब्रिटिशांनी गायकवाड यांचा बडोदा संथांमधील मोठा भाग पेशव्याना दिला पण त्या भागावर वर्चस्व आता ब्रिटिशांचे होते आणि पेशवे फक्त नामधारी झाले.
  • ब्रिटिशाना नमवण्यासाठी पेशव्यांनी ५ नोव्हेबर 1817 साठी खडकी येथे लढाई केली त्यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला त्यानंतर ब्रिटिशांनी पुण्यावर संपूर्ण ताबा मिळविला.

भीमा कोरेगाव लढाई

➡️२८००० हजार मराठी सैन्य ज्यात २०,००० घोडदळ आणि ८००० हजार पायदळाचा समावेश होता.तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या सैन्य मध्ये महार बटालियन (महार जातीचे) ५०० होते. ज्याचे नेतृत्व रतननाक , जाननाक आणि भाकनाक आणि ब्रिटिश यांच्या कडून लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट आणि इतर २०० घोडदळ असे एकूण ८३४ सैन्य होते.
➡️ 1 जानेवारी 1818 साली दिवसभर मराठा पेशवा आणि ब्रिटिश सन्यात लढाई झाली.
➡️ पेशवा सैन्याचा पराभव झाला.
➡️ हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया या आणि अनेक पुस्तकात महार समाजाच्या शौर्य बद्दल लिहिले गेले.

एवढं महत्व का आहे

📌ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता . हि अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजाने ब्राह्मणांना अनेकदा सांगितले होते. अस्पृश्यता मुळे हा समाज अर्थव्यवस्था, शिक्षण आणि समाजाच्या सर्वच मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेला होता. या कारणामुळे महार समाजाने ईस्ट इंडिया कंपनी मध्ये सैन्य म्हणून सामील झाले
📌हि लढाई मराठा विरुद्ध नसून ब्राह्मण आणि यांच्या विचारशरणी विरुद्ध ची लढाई होती
📌 हि फक्त एक लढाई नसून सामाजिक लढाई होती. या लढाई नंतर सामाजिकदृष्टया पुढील काळात बदल झाल्याचे दिंसून आले .
📌त्याकाळी पेशव्यांकडून महार,मातंग या सारख्या अनेक बहुजन समाजावर अत्याचार होत त्यांना गावापासून दूर ठेवत. या लढाईमुळे सर्वांना महार समाजातील सामर्थ्य समजले.
📌या लढाई नंतर महार बटालियन नावाची बटालियीन उदयास आली आणि मोठ्या प्रमाणात सैन्य भरती झाले त्यामळे महार समाजाचे आर्थिक , शैक्षणिक विकास होण्यास मदत झाली .
📌यामुळे दलित समाज १ जानेवारी ला पराक्रम दिवस साजरा करतो .

भीमा कोरेगाव विजयस्तंभ

या लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या समरणार्थ विजय स्तंभ (Victory Pillar/Obelisk) उभारला. या स्तभवर शाहिद झालेल्या महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत .१ जानेवारीला लाखो लोक अभिवादन करण्यासाठी सम्पूर्ण राज्यातून येतात .


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top