श्रम योगी मानधन योजनेची काही महत्वाची आकडेवारी
- भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे बहुसंख्य अनौपचारिक किंवा असंघटित कामगार . सन 2009-10 मध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (NSSO) संस्थे ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशातील एकूण रोजगार 46.5 कोटी होता ज्यात सुमारे 2.8 कोटी संघटित आणि उर्वरित 43.7 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगार होते. या असंघटित क्षेत्रातील कामगारांपैकी 24.6 कोटी कामगार कृषी क्षेत्रात, सुमारे 4.4 कोटी बांधकाम क्षेत्रात आणि उर्वरित उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजे एकूण रोजगरापैकी असंघटित क्षेत्रात काम करणाचे प्रमाण जवळपास 80 ते 90 टक्के इतके आहे.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या उतार वयातील सर्वक्षण आणि सामाजिक सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेली योजना आहे. तुम्हाला असंघटित क्षेतत्रात काम करणारे कोण कोणते कामगार असतात याची यादी जाणुन घ्यायचा असल्यास तुम्ही ई श्रम कार्ड चे फायदे हा लेख वाचू शकता ज्या मध्ये सविस्तर आणि पुर्ण यादी दिली आहे.
कोण आहेत असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार ?
भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने व्यवसाय, रोजगाराचे स्वरूप, विशेष त्रस्त श्रेणी आणि सेवा श्रेणी यानुसार असंघटित कामगार दलाचे चार गटांत वर्गीकरण केले आहे.
- व्यवसायाच्या अटींनुसार :- लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, वाटा पिकवणारे, मच्छीमार, पशुपालनात गुंतलेले, विडी भट्टीवर काम करणारे कामगार , इमारत आणि बांधकाम क्षेत्रात करणारे कामगार, चामडे कामगार, विणकर, कारागीर, मीठ कामगार, वीटभट्टी आणि दगड खाणीतील कामगार, सॉ मिल्स, ऑइल मिल इत्यादींमधील कामगार या
वर्गवारीत येतात. - रोजगाराच्या स्वरूपाच्या अटींनुसार: संलग्न शेतमजूर, बंधपत्रित मजूर, स्थलांतरित
कामगार, कंत्राटी आणि आकस्मिक मजूर या वर्गवारीत येतात. - विशेष अतिकष्टाचे कामकरणारे कामगार : ताडी टपरी करणारे, सफाई कामगार, डोक्यावर भार वाहणारे, जनावरे चालवणारे, वाहनांचे चालक, लोडर आणि उतरवणारे हे या वर्गात येतात.
- सेवा देणारे कामगार :- सुईणी, घरकामगार, मच्छीमार आणि स्त्रिया, नाई, भाजीपाला आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते इ. या श्रेणीतील आहेत.
प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन (PM-SYM) योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
- ऐच्छिक सहभाग: ही योजना ऐच्छिक आहे आणि 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी खुली आहे. कोणत्याही कामगारावर बंधानकारक नाहीये
- सहयोगी पेन्शन : पात्र सहभागी त्यांच्या कामाच्या वर्षांमध्ये त्यांच्या पेन्शनसाठी मासिक
रक्कम आपल्या अकाऊंट जमा करतील. ह्या योजनेत प्रवेश करण्याच्या वयानुसार रक्कम बदलते.
आणि यामध्ये सरकारचा सुद्धा वाटा असतो.
- शासकीय सह-योगदान : पात्र लाभार्थ्यांच्या पेन्शन निधीमध्ये केंद्र सरकार देखील समान
रक्कम योगदान देते.
- निश्चित मासिक पेन्शन: वयाच्या ६० व्या वर्षी पोहोचल्यावर, लाभार्थ्यांना मासिक पेन्शन मिळू लागते. पेन्शनची रक्कम मासिक योगदानावर आणि योजनेत सामील होताना लाभार्थीचे वय यावर अवलंबून असते.
- जोडीदारासाठी पेन्शन लाभार्थीचा मृत्यू झाल्यास – त्यांच्या जोडीदाराला ५०% पेन्शन कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळण्यास पात्र
आहे, जर जोडीदार जिवंत असेल आणि पुनर्विवाह केला नसेल.
- नॉमिनी बेनिफिट्स : सहभागी लाभार्थी नामनिर्देशित करू शकतात ज्याला 60 वर्षे वय पूर्ण होण्यापूर्वी सहभागीचा मृत्यू झाल्यास संचित पेन्शन कॉर्पस प्राप्त होईल.
- सुलभ नावनोंदणी : योजनेतील नावनोंदणी देशभरात पसरलेल्या कॉमन सर्व्हिसेस सेंटर्स (CSCs) द्वारे सुलभ केली जाते.
योजनेत लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी CSCs नावनोंदणी बिंदू म्हणून काम करतात.
- कमीत कमी दस्तऐवजीकरण : नावनोंदणी प्रक्रियेसाठी किमान दस्तऐवज आवश्यक आहेत, जे असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रवेशयोग्य बनवते ज्यांच्याकडे विस्तृत कागदपत्रे नाहीत.
- ऑनलाइन देखरेख : योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी योजनेची प्रगती आणि लाभार्थ्यांच्या योगदानाचे ऑनलाइन परीक्षण केले जाते.
- या वैशिष्ट्यांचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता प्रदान करणे आहे.
श्रम योगी मानधन योजना पात्रता
- ही योजना फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांनासाठी आहे. त्याला तुम्ही नोदणीकृत कामगार असणे गरजेचे आहे. (इ श्रम कार्ड)
- ज्याचे आजचे वय 18 ते 40 दरम्यान आहे.
- ज्याचे प्रती महिना उत्पन्न 15000 पर्यंत आहे. अश्या सर्वांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
श्रम योगी मानधन योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खातेपुस्तक
- ई श्रम कार्ड असल्यास आधार कार्ड ची गरज नाही.
श्रम योगी मानधन योजना लाभ
- वयवर्ष 60 पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह 3000 रुपये पेन्शन.
- वार्षिक 36000 पेंशन.
- जर नोदणीकृतं लाभार्त्याचा मुत्य झाला तर त्याचा पत्नीला पेंशन मिळेल.
अर्ज कसा करावा
- योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज online आणि offline (ऑफ लाईन) या दोन्ही पद्धतीने करू शकतो.
- online अर्ज करायचा असल्यास Maandhan.in या केंद्र शासनाच्या website वर जाऊन Login ह्या बटन वर दाबून Self Enrollment वर दाबून पुढील सर्व प्रकिया पूर्ण करावी. नोदणी करताना आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर अत्यंत महत्वाचा आहे.
- ऑफलाईन नोदणी करायची असल्यास आपल्या जवळच्या CSC ( सेतू सुविधा केंद्रात जाऊन फोर्म भरावा)
- अर्जकेल्यानंतर आपल्या बँक खात्यामधून प्रतिदिन 2 कपात होऊन ते श्रम योगी मानधन खात्यावर जमा होतील.
या लेखामधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून श्रम योगी मानधन योजना व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.