या लेखातून मागेल त्याला सिंचन विहीर योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत ह्या लेखामध्ये अर्ज कसा करावा , नेमके लाभार्थी कोण आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे
मागेल त्याला सिंचन विहीर योजना कार्यक्रम
शेतकरी बांधवानो असं कि आपल्याला सर्वांना माहिती आहे . मागील काही वर्षांपासून आपल्या भागात नियमित पाऊस पडत नाही त्याला कित्येक शेतकरी बांधवानी आत्महत्या केली असून यापुढे कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये , अपुऱ्या पाऊसामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्याचे आणि कुटुंबातील महिला वर्ग व लहान मुलाचे हाल होतात. आणि साहजिकच उत्पादनात घट होऊन याचा प्रत्येक्ष परिणाम आपल्या राज्याच्या व देश्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
यावर शाश्वत उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाने २०१५ साली हिवाळी आदिवेशन नागपूर येथे २००० कोटी रुपयाचा निधी देऊन मागेल त्याला सिंचन विहीर योजना कार्यक्रम जाहीर केला. सदरील योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभाग महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाते.
मागेल त्याला सिंचन विहीर योजनेचे उद्दिष्टये
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल शेतकऱ्यास अनुदान स्वरूपात मदत करणे.
- कोरडवाहू शेतकऱ्यांना सिचन विहिरीद्वारे पाण्याची सोय करून त्याची शेती ओलिताखाली आणणे.
- शेती माला द्वारे उत्पादनात वाढ करणे.
- बहुतेक वेळा सिचनासाठी शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो आणि वेळेवर कर्जाची परतफेड नाही झाल्यास शेतकरी आत्महत्या करतो अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये या उद्देश्यने मागेल त्याला सिचन विहीर योजनेची सुरुवात झाली आहे.
मागेल त्याला सिंचन विहीर योजनेचे लाभार्थी
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या व विमुक्त जाती
- इतर मागासर्गीय
- महिला कर्ता कुटुंबातील महिला
- घरकुल योजनेचे लाभाथी
- जॉब कार्ड धारक
- इतर जनरल प्रवर्ग
मागेल त्याला सिंचन विहीर लाभार्थी निवड प्रकिया
- शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीतकमी ०.६० हेक्टर (दीड एकर ,१.५) जमीन असावी
- (जर शेतकऱ्याकडे ०.६० हेक्टर जमीन नसेल तर त्याला सिंचन विहीर मंजूर होणार नाही परंतु जर त्याच्या शेतीच्या बाजूच्या शेतकऱ्याचे सिचन विहीर साठी अर्ज केला आहे आणि त्याच्याकडे सुद्धा ०.६० हेक्टर पेक्षा कमी शेती आहे असे शेतकरी सामुदायिक सिचन विहीर साठी अर्ज करू शकतात.)
- अर्जकर्त्या शेतकऱ्याची शेती विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे गरजेचे आहे. (भूजल विभागाचे इंजिनियर आणि सर्वेक्षण विकास अधिकारी यांनी काही निकष ठरवले आहेत)
- यापूर्वी अर्जदाराने विहीर, शेततळे,सार्वजानिक शेततळे, यासारख्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.
- ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती ने आत्महत्या केली आहे त्याचा वारसदार असल्यास प्रथम प्राधान्य
- दारिद्यरेषेखालील शेतकरी असल्यास प्रथम प्राधान्य
- अनुसूचित जाती /जमाती असल्यास प्रथम प्राधान्य
- इतर लाभार्थी , वरील पैकी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती ने अर्ज केला असेल तर इतर लाभार्थ्याला अटी व शर्तीचा विचार करून योजनेचा लाभ दिला जातो.
मागेल त्याला सिंचन विहीर योजनेमधून मिळणारा लाभ
- सिचन विहीर बांधकाम करण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिलेल.
- शेतकऱ्याला फक्त पैसे देणे हाच उद्देश नसून. कोरडवाहू शेती ओळीत खाली आणणे हा मूळ हेतू आहे.
- सिचन विहिरीद्वारे कायस्वपरुपी पाण्याचा स्रोत निर्माण होईल, पुढील काळात कुणाला पाणी मागणीसाठी गरज पडणार नाही.
- शेती सोबत पाळीव प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय होईल. आणि शेतकऱ्याला एक जोडव्यवसाय मिळेल
- साहजिकच शेतकऱ्याचा आर्थिक विकास व्हायला मदत होईल.
मागेल त्याला सिंचन विहीर योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा.
- सदरील योजना इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नाहीये.
- शेतकऱ्याकडे कमीत कमी ०. ६० हेक्टर म्हणजे दीड एकर शेती असणे गरजेचं आहे. जास्त असेल तरी चालेल.
- यापूर्वी शेतीत विहीर नसावी / अर्जदार शेतकऱ्याच्या ७/१२ वर याअगोदर विहीर खोदल्याची नोंद नसावी.
- अर्जदार व्यक्तीच्या जमिनीमध्ये वाटेदार असतील तर संबधित व्यक्तीचा ना हरकत प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे
- अर्जदार आर्थिकदृष्ट्या मागाल असल्यास प्रथम प्राधान्य
- अर्जदार शेतकऱ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व त्या खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे.
- शेतकरी ज्या जागी विहीर घेण्यास इच्छुक आहे त्या जागेपासून ५०० मीटर अंतरावर दुसरी विहीर नसावी.
शेतकरी अर्जदाराकडे खालील कागदपत्र असायला हवेत
- सातबारा व नमुना ८ अ
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- अर्जदार ज्या जातीतील प्रवर्गातील आहे त्याचे जात प्रमाणपत्र
- अर्जदारच्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख आत्महत्या केलेली असेल तर त्याचे तहसील चा दाखल
- प्रपत्र अ व प्रपत्र ब
- वरील सर्व कागदपत्र जोडून अर्ज करावा. आपण online सुद्धा अर्ज करू शकतो. खालील दिलेल्या वेबसाईट वर जाऊन. – मागेल त्याला सिंचन विहीर
या लेखामधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून मागेल त्याला सिंचन विहीर आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.