
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana maharashtra : मागील काही महिन्यात अनेक शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि काहीना कायमच अपंगत्व आहे अश्या लोकांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा फॉर्म भरूनही त्यांना असून लाभ मिळाला नव्हता कारण शासनाकडे निधी उपलब्ध नव्हता आता शासने GR प्रकाशित करून मंजूर निधीविषयी माहिती दिली आहे त्यामुळे अनेक लाभार्थी कुटुंबाचा मार्ग मोकळा झाला आहे. खाली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मोठी घोषणा मंजूर केला कोठयावधीचा निधी नेमका किती केला व सोबत GR ची लिंक दिली
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाविषयी थोडी माहिती
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे.
रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे आणि अर्ज करा अगदी सोप्या पद्धतीने
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कोण ?
महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी शासनाने ‘शेतकरी अपघात सुरक्षा योजना’ सुरू केली आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते. या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळतो, ज्यांच्या नावावर जमिनीची नोंद असून ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. तसेच, शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य, जसे की आई, वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, सून किंवा कायदेशीर वारसदार, योजनेचा लाभ घेऊ शकतो, परंतु दोघांचेही वय 10 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभ
अपघाती मृत्यू झाल्यास रु. 2 लाख, अपघातामुळे दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु. 2 लाख, तसेच अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु. 1 लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम प्रदान केली जाते.
Gopinath munde shetkari apghat vima yojana अंतर्गत अपघाताच्या घटनेच्या स्वरुपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे
अपघाताच्या घटनेच्या स्वरुपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे | ||
अ.क्र | अपघाताचे स्वरुप | आवश्यक कागदपत्रे |
1 | रस्ता / रेल्वे अपघात | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना |
2 | पाण्यामध्ये बुडून मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक |
3 | जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल व्हिसेरा अहवाला |
4 | विजेचा धक्का अपघात | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल |
5 | वीज पडून मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल |
6 | खून | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवालाव्हिसेरा अहवाला, दोषारोप पत्र |
7 | उंचावरून पडून झालेला मृत्यु | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल |
8 | सर्पदंश/विंचू दंश | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टम झाले नसल्यास या अहवालातून सुट मात्र वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिका-याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक |
9 | नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे |
10 | जनावरांच्या हल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू | |
(अ) जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू | औषधोपचाराची कागदपत्रे | |
— | (ब) जखमी होऊन मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल |
— | (क) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे | क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
11 | दंगल | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे |
12 | अन्य कोणतेही अपघात | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल |
13 | अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे | 1) अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र, 2) सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, 3) प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्राधिकृत केलेले सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र |
अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.
a) विमा दाव्याच्या अनुषंगाने पूर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल.प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल.
Gopinath munde shetkari apghat vima yojana form pdf maharashtra | क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
What’s App group- | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
अ) विमा दाव्यानंतर, पूर्व-सूचना अर्ज विमा कंपनीला प्राप्त होईल असे गृहीत धरले जाईल ज्या तारखेला तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल केला जाईल आणि संगणक प्रणालीवर अपलोड केला जाईल.
ब) योजनेअंतर्गत विहित केलेल्या योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव प्राप्त झाला असला तरीही, योजनेच्या शेवटच्या दिवसासाठी योजनेच्या मंजूर कालावधीनंतर ९० दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला प्रस्ताव विमा कंपनी स्वीकारण्यास बांधील असेल. याशिवाय, योजनेच्या मंजुरी कालावधीनंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणालीमध्ये नोंदणीकृत पूर्व-सूचनांअंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला विमा प्रस्ताव ३६५ दिवसांपर्यंत (९ डिसेंबर २०२१) विमा कंपनीला बंधनकारक असेल. तथापि, या कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. तसेच, या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश सरकारवर बंधनकारक राहणार नाहीत.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मोठी घोषणा मंजूर केला कोठयावधीचा निधी gR : Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा