self declaration :- आज बहुतेक व्यक्तिला कोणत्या ना कोणत्या कामासाठी स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक असते मग ते सरकारी नोकरी असो की खाजगी नोकरी, शासकीय योजनाचा लाभ घेणे असो किंवा विद्यार्थी यांना सुद्धा महाविद्यालयात स्वयंघोषणापत्र दाखल करावे लागते परंतु बहुतेक लोकाना माहिती नाही स्वयंघोषणापत्र म्हणजे काय ते तयार कसे करायचे स्वयंघोषणापत्र pdf कसी डाउनलोड करावे व त्याचे फायदे याविषयी सखोल माहिती देणारा हा लेख.

स्वयंघोषणापत्र म्हणजे काय
self declaration meaning in marathi स्वयंघोषणापत्र होय, स्वयंघोषणापत्र म्हणजे काय तर एक लिखित निवेदन असून ज्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या माहितीची सत्यता आणि अचूकता असल्याचे जाहीर करतो. हे तुमच्या अधिकृत कागदपत्रांच्या ऐवजी वापरले जाऊ शकते, जिथे व्यक्तीला काही माहिती देणे किंवा काही तथ्ये घोषित करणे आवश्यक असते. त्या ठिकाणी याची आवश्यकता असते.
स्वयंघोषणापत्र म्हणजे नेमक काय हे आपण काही उदाहरणसह समजून घेऊ
- उदाहरण 1 :- जेव्हा एखादी व्यक्ति खाजगी किंवा सरकारी नोकरी साठी अर्ज करतो तेव्हा त्याला काही वैयक्तिक माहिती व शैक्षणिक माहिती चे कागदपत्रे सादर करणे गरजचे असतात सोबत अनुभव आवश्यक असल्या संबधित कागदपत्रे सुद्धा जोडावे लागतील जास्त की अनुभव प्रमाणपत्र, नोकरीचे ठिकाण तर वरील सर्व माहिती सत्य आणि अचूक असल्याचे लिहून द्यावे लागते त्यामध्ये खालील मुद्दे अशू सकतात. याद्वारे घोषित करा की या सीव्हीमध्ये प्रदान केलेली सर्व माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीसाठी सत्य आणि अचूक आहे.
- मागील काही महिन्यात राज्यातील बहुतेक महिलांनी माझी लाडकी महिण योजनेचा अर्ज भरला असेल, सदरील अर्ज करताना काही कागदपत्रे जसकी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट, उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडले असतील सोबत स्वयंघोषणापत्र सुद्धा जोडावे लागले असेल. स्वयंघोषणापत्र जोडणे म्हणजे अर्ज सादर करताना जमा केलेले कागदपत्रे हे खरे असून जर त्यामध्ये काही त्रुटि किंवा असत्यता आढळून आल्यास त्याला अर्जदार स्वतः जबाबदार राहील.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मोठी घोषणा मंजूर केला कोठयावधीचा निधी gR
स्वयंघोषणापत्राचे उपयोग काय आहेत
- शासकीय योजना आणि सेवांसाठी अर्ज करताना :- बहुतेक योजनेचा अर्ज करताना अर्जदारास स्वयंघोषणापत्र द्यावे लागते स्वयंघोषणापत्रा दिल्याशिवाय अर्ज प्रकिया पूर्ण होत नाही.
- शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश :- शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि विद्यापीठात अश्या विविध ठिकाणी प्रवेश घेताना किंवा स्कॉलरशिप चा अर्ज करताना स्वयंघोषणापत्र द्यावे लागते.
- नोकरीसाठी अर्ज करताना :- सरकारी , खाजगी आणि स्वय-सेवी संस्था मध्ये नोकरी करताना resume सादर करताना त्यामध्ये सर्वात खाली स्वयंघोषणापत्र द्यावे लागते किंवा सरकारी नोकरी चा अर्ज करताना वेगळा फॉर्मट असून शकतो.
- न्यायालयात पुरावा सादर :- न्यायालयात एखादा खटला चालू असेल तर जज समोर पुरावे सादर करताना सुद्धा स्वयंघोषणापत्र दाखल करावे लागते.
- विविध प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी :- सरकार दरबारी काही परवानग्या मिळवण्यासाठी ( जस की घर बाधण्याची परवानगी , नळाची परवानगी इत्यादि सारख्या परवानग्या साठी सुद्धा स्वयंघोषणापत्र दाखल करावे लागते.
कूळ कायदा म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
स्वयंघोषणापत्राचे फायदे काय
- वेळेची बचत : अधिकृत कागदपत्रे मिळवण्याच्या प्रक्रियेपेक्षा स्वयंघोषणापत्र तयार करणे जलद आणि सोपे असते काम खूप लवकर होते.
- पैशांची बचत : अधिकृत कागदपत्रे मिळवण्यासाठी काही वेळा पैसे मोजावे लागतात, तर स्वयंघोषणापत्र मोफत आणि कमी वेळात तयार होते. त्यामुळे पैसाची आणि वेळेची बचत होते.
- सुविधा : स्वयंघोषणापत्र कोठेही आणि कधीही तयार करता येते. त्याला कोणत्याही format ची आवश्यकता असते. तुम्ही कोऱ्या कागदावर वर सुद्धा स्वयंघोषणापत्र लिहून देऊ शकता त्याला ही तेवढेच महत्व आहे.
self declaration form pdf | click Here |
स्वयं घोषणा पत्र मराठी pdf | ClickHere |
self declaration form for income certificate | Click Here |
How can I write a self-declaration in English? | I hereby declare that the information given above and in the enclosed documents is true to the best of my knowledge and belief and nothing has been concealed therein. I understand that if the information I give is proven false/not true, I will have to face the punishment as per the law. |
स्वयंघोषणापत्र मराठी मध्ये कसे लिहावे ? /Swayam ghoshna patra marathi | मी नामे .. राहणार .. लिहून स्वयघोषणापत्र देतो की वरील सर्व माहिती खरी आहे त्यामध्ये काही असत्यता आढळून आल्यास मी कायदेशीर कार्यवाही व शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “स्वयंघोषणापत्र म्हणजे काय आणि त्याचे महत्व एवढे का आहे ? ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे ही वाचा