Reshan card name remove form pdf :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा व सार्वजनिक वितरण विभाग मार्फत देशातील पात्र लाभार्त्याना शिधापत्रिका वाटप करण्यात येतात त्या शिधापत्रिकांना सामान्य भाषेत रेशन कार्ड सुद्धा म्हणतात. ह्या रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज कसा करावा.
रेशनकार्डवर नाव वाढविण्याची आणि कमी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जन्म, विवाह होऊन स्थंलातरीत होणे, स्वतंत्र घटस्फोट होणे, स्वतंत्र वास्तव्य, नोकरीनिमित्त स्थलांतरीत होणे, मृत्यू होणे इत्यादी कारणांमुळे रेशनकार्डातील नावे कमी करणे किंवा वाढविणे यासाठी विहित नमुन्यात अर्ज करता येतो. अर्जाच्या माहितीची तपासणी करून माहितीची खात्री पटल्यास रेशनकार्डातील नाव कमी किंवा वाढविले जाते. राज्यातील लाभार्थी यांना राशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागत असे, अर्ज करताना आपल्याला कोणाचा नाव वाढवायचं आहे किंवा कमी करायचा आहे. ते सांगावं लागत असे.
आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक वितरण विभाग महाराष्ट्र सरकार मार्फत यामध्ये रेशन कार्ड नाव वाढवणे व कमी करण्यात मोठे बदल केले आहेत. आज या लेखातून रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज व संबंधित माहिती खालील लेखातून बघुयात .
कौटुंबिक शिधापत्रिकेत नाव कमी करणे किंवा रद्द करणे
रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज कसा करताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे .
नावाबाबतचे पुरावे
कमी करण्यासाठी काय करावे : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला असणे आवश्यक आहे. तर नोकरीनिमित्त स्थंलातरीत झाल्यास बदलीच्या आदेशाची झेरॉक्स प्रत व नव्या ठिकाणच्या वास्तव्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. तर नाव कमी करायचे संबंधित व्यक्तीचे संमत्री पत्र असणे गरजेचे आहे.
नाव वाढविण्यासाठी काय करावे : जन्मणाऱ्या मुलापासून ते १६ वर्षांच्या आतील मुलांचे/ मुलींचे नाव वाढविण्यासाठी त्याचा जन्म दाखला किंवा शाळेतील बोनाफाइड सर्टिफिकेट दाखला असणे आवश्यक आहे. तर १६ वर्षांवरील मुलांची नावे वाढविण्यासाठी प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे.
तपशील | संबंधित माहिती |
आवश्यक कागदपत्रे | 1.विहीत नमुण्यातील अर्ज किंवा सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्रांसह नाव कमी करुन मिळणेबाबत अथवा कार्ड रद्द करुन मिळणेबाबत अर्ज सादर करणे. सोबत खालील आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत . 2. मुळ शिधापत्रिका 3. कुटुंब प्रमुखाचे घोषणापत्र 4. सर्व सदस्याचे आधारकार्ड ५ . एक पासपोस्ट फोटो |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | |
ऑनलाईन सुविधा आहे का – | सद्यस्थितीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. भविष्यात शासनामार्फत एक देश एक रेशन अँप मार्फत तुम्ही तुमच्या मोबाईल अगदी सहज तुमच्या कुटुंबातील सदस्य जोडू किंवा काढू शकता . |
आवश्यक शुल्क | कोणतेही शुल्क आकारले जात नाही |
निर्णय घेणारे अधिकारी – | अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | १ ५ दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज फॉरमॅट PDF | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाइट लिंक | येथे क्लिक करा |
What’s App group | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “रेशन कार्ड नाव कमी करणे अर्ज कसा करावा.” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- ” एक देश एक रेशन कार्ड योजना ” काय आहे ? आणि कसा घ्यावा या योजनेचा लाभ!
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या नागरिकांचे रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल reshan card E-KYC
- रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे आणि अर्ज करा अगदी सोप्या पद्धतीने
- पिवळे रेशन कार्ड काढा ऑनलाईन, नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज | Online Ration Card Maharashtra 2024 I