केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजनेपैकी एक योजना ज्या मधून पात्र शेतकरी लाभार्थ्याला वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ प्रत्यक्ष बँक खात्यात जमा केला जातो. याच योजनेचा २ ० वा हफ्ता कधी पात्र शेतकरी लाभार्थी याना मिळणार या विषयी माहिती pm kisan 20th installment date या लेखातून मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हि केंद्र शासनाची एक अत्यंत महत्वाच्या योजनेपैकी एक योजना असून या योजनेमधून देशातील पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला २ हजार आर्थिक मदत प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा केले जातात. देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाढी ६ हजाराचे आर्थिक साहाय्य मिळते. या योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शेतीशी निगडित साधन-सामग्री , बी – बियाणे , खाते , कीटकनाशके आणि इतर वस्तू विकत घेण्यात मदत होईल. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी साठी सावकारांकडून कर्ज काढायची आवश्यकता भासू नये आणि देशातील छोट्यातला छोटा शेतकरी स्वावलंबी व्हावा , त्याचे शेतीतून उत्पन्न वाढावे. या विचाराने केंद्र शासनाचे २०१९ साली हि योजना चालू केली. या योजनेअंतर्गत जुन २०२५ पर्यंत १९ हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आता शेतकरी २० व्या हफ्त्याची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे pm kisan 20th installment date तारीख जाहीर केली आहे. पण तुम्हला माहिती आहे का कि देशातील अनेक लाभार्थी या योजनेमधून वगळले आहे. सध्या योजनेची पात्रता काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे .
pm किसान योजना पात्रता
मागील काही वर्षात केंद्र शासनाने काही शेतकरी या योजनेच्या लाभातून कमी केले आहे त्याचे कारण शासनाने पात्रता आणि अपात्रता च्या निकषात केला आहे. खाली अपात्र शेतकऱ्याची माहिती दिली आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता कि तुम्ही पात्र आहेत कि नाही .
- संस्थात्मक जमीनधारक म्हणजे ज्या संस्थेच्या नावावर आहेत त्या शेतजमिनीच्या मालकांना या योजेनचा लाभ घेता येणार नाही .
- माजी आणि विद्यमान घटनात्मक पदावरील व्यक्ती (जसे की मंत्री, खासदार, आमदार, महापौर या सारख्या पदावर विराजमान असलेले शेतकरी सोबत जे माजी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सरकारी कर्मचारी (पण जे चतुर्थ श्रेणी गटात नोकरी करतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल . )
- ₹10,000 किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन मिळवणारे सेवानिवृत्त कर्मचारी (काही गट वगळता).
- ज्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न चांगले आहे व त्यांनी मागील वर्षात INCOME TAX भरला असेल असे शेतकरी वर्गाला या योजेनचा लाभ घेता येणार नाही.
- व ज्या शेतकऱ्यांचा शेतीबरोबर इतर व्यवसाय आहे जस कि डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांसारखे व्यावसायिक या या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
pm kisan 20th installment date
जून २०२५ मध्ये pm किसान योजनेचा हफ्ता येणार असल्याची शक्यता होती असे विविध मीडिया रिपोर्टरनुसार हा हफ्ता कधी जमा होणार आहे याची सरकारकडून कोणतीही तारीख अजून तरी जाहीर केली नाही . पण दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हफ्ता लवकरच मिळेल अशी अशा आहे . लाभ मिळताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना आपली kyc पूर्ण करून घ्यावी.
हफ्त्याची स्थिती कशी तपासावी ?
तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती आणि लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे अगदी सोप्या पद्धतीने व तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईल फोन वर तपासू शकता खाली दिलेला पायर्यांच्या आधारे अगदी काही वेळात तुम्हाला तुमच्या हफ्त्याची स्थिती चेक करता येईल .
- PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइटवर जा : pmkisan.gov.in हि लिंक आहे.
- ‘Farmers Corner’ विभागात जाऊन ‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary Status’ या दोन्ही पैकी कोणत्याही एका टॅब वर दाबा.
- नवीन उघडलेल्या पानावर /page वर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर
- इतर आवश्यक माहिती भरा आणि ‘Get Data’ वर क्लिक करा. तुमच्या समोर आवश्यक सर्व माहिती येईल .
अत्यंत महत्वाचे
– तुम्हला तुमच्या हफ्त्याची स्थिती चेक करण्यासाठी तुमची आधार KYC आणि तुमचे बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे . त्याशिवाय तुम्हाला तुमच्या हफ्त्याची स्थिती चेक नाही करता येणार .
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “PM किसान योजनेचा 20 वा हफ्ता लवकरच बँकमध्ये जमा होणार pm kisan 20th installment date” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
शेतकरी आयडी farmer id काढून तुम्ही 20 योजनांचा लाभ अगदी सहज घेऊ सकता