MPSC च्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; परीक्षेसाठीच्या वयेमर्यादा अटीत बदल MPSC Student Age Limit

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

 दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यातील तरुण उमेदवार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. विविध विषय, त्या विषयांची तयारी आणि अखेरीस दिली जाणारी परीक्षा या संपूर्ण चक्रामध्ये या इच्छुकांना काही अटी लागू असतात.त्यामध्ये वयाची अट सर्वात महत्वाची आहे. एमपीएससीसाठीची अशीच एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे वयोमर्यादेची. पण, आता मात्र या अटीतही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आत्ता परीक्षेसाठीच्या वयेमर्यादा अटीत बदल झाला असून तो बदल नेमका काय आहे MPSC Student Age Limit त्यासाठी खालील लेख वाचा.

MPSC Student Age Limit
MPSC Student Age Limit

mpsc student age limit संदर्भात महाराष्ट्र शासनाचा gR आणि महाराष्ट्र शासनाचे पत्र खाली दिलेले आहे.

MPSC Student Age Limit

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत येण्यासाठी mpsc मार्फत विविध पदांच्या भरती प्रक्रिया केली जाते . उमेदवार यांची अर्ज करण्यासाठी जात प्रवर्गनुसार नुसार काही अटी आणि शर्ती आहेत ह्या अटी शर्ती मध्ये सर्वात महत्वाची अट वी वयाची आहे. कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळं महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांयाचा थेट फायदा मिळणार असून त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. (MPSC Student Age Limit)

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती देणारी x पोस्ट करत ही बातमी जाहीर केली. ज्यामुळं वयोमर्यादा ओलांडल्या कारणाने नोकरीपासून वंचित लाखो उमेदवार आणि इच्छुकांना दिलासा मिळाला आहे

महाराष्ट्र शासनाचा GR

प्रस्तावनेतील नमूद कारणाचा साधकबाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत दिनांक १ जानेवारी २०२५ ते या शासन निर्णयाच्या दिनांकपर्यंत पदभरती करिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि

त्या जाहिरातीच्या निंवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. (१) मधील सामान्य विभागाच्या दिनांक २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या वयोमार्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे.

ज्या पदासाठी संबधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भात दिनांक २५ एप्रिल २०१६ मध्ये मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमार्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमार्यादा विहित केली आहे. अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमार्यादेतील देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील.

यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातीकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत. त्यांना सादर करण्यासाठी महाराष्ट्र लेकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने  MPSC च्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; परीक्षेसाठीच्या वयेमर्यादा अटीत बदल MPSC Student Age Limit व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप– ( लिंकवर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top