Maratha Kunbi certificate : महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाच्या मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मुंबई येथे आंदोलन केले आणि त्यांना यश सुद्धा मिळेल महाराष्ट्र शासनाने घोषणा केली कि हेंद्राबाद गॅझेट लागू करू, त्यातील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे , पण हे प्रमाणपत्र कसे आणि कुठे काढायचे , त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे , त्याला कोणती कागदपत्रे लागणार याची सविस्तर माहिती वाचा खालील लेखात.

Maratha Kunbi certificate
मराठा समाजातील जनतेला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाइट आपले सरकार सेवा या वेबसाइटवर जाऊन आपला आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी लागेल. हा भरलेला अर्ज संबंधित तहसील कार्यलयास मधील संबंधित अधिकारी यांच्याकडे जाईल , अर्जदार यांनी योग्य कागदपत्रे जोडली असतील तर तो अर्ज पुढील अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच्या कडे जाऊन त्यांच्या वर अंतिम निर्णय होईल आणि अर्जदारास कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हि संपूर्ण प्रकिया अंदाजे २१ ते ४५ दिवसात पूर्ण होऊ शकते पण काही त्रुटी व तांत्रिक अडचणी आल्यास अधिक वेळ लागू शकतो.
अर्जदाराने कोणते कागदपत्र जोडणे आवश्यक आहेत
- अर्जदार व अर्जदारांच्या रक्तसंबंधात नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखल किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र ( जन्मतारीख व जन्मथान चा उल्लेख असणे आवश्यक आहे. )
- ओळखीचा पुरावा : अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड , मतदान कार्ड ,पॅन कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स ( यापैकी कोणतेही एक )
- पत्त्याचा पुरावा : अर्जदाराचे रेशन कार्ड , लाईट बिल , मिळकत कर पावती , ७/१२ किंवा ८ अ उतारा , फोल बिल , पाणीपट्टी किंवा घरपट्टी साक्षांकित प्रत आवश्यक आहे. ( यापैकी कोणतेही एक )
- जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १० रुप्याचे कोर्ट फी टॅम्प / तिकीट आणि अर्जदार यांचा फोटो
- अर्जदार यांनी १०० रुप्याच्या टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि स्वतःच्या रक्तसंबधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी असल्याचा पुरावा सादर केला आहे तो पुरावा आणि नातेसंबंधाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी इतर काही पर्याय
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ग्रामीण भागामध्ये एक कोतवाल बुक असायचे ज्या बुक मध्ये गावातील नमुना न १४ मध्ये गावातील प्रत्येकाच्या जन्म- मुत्यूच्या नोंदी त्यांच्या जातीसोबत ठेवल्या जात होत्या. व ह्या सर्व नोंदी दर महिन्याला तहसील कार्यालयात जमा केल्या जात होत्या. पण १ डिसेंबर १९९३ पासून यामध्ये बदल करण्यात आल्या आणि कोतवाल हे पद तहसील कार्यालयात वर्ग करण्यात आले व ह्या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायत यांच्या कडे देण्यात आल्या तेव्हापासून ह्या नोंदी ग्रामपंचायत करत आहे.
- अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मुत्यू ज्या गावात झाला असेल ते गाव कोणत्या तहसील च्या कार्यक्षेत्रात येते याची माहिती काढावी.
- संबंधित तहसील कार्यलयात अर्ज करून आपल्या रक्तनातेवाईक यांचे नाव असणाऱ्या गाव नमुना न १४ किंवा कोतवाल बुकची नक्कल मागणी करावी. नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे कि नाही ते तपासून घ्यावे.
- आपल्या कुळातील जुन्या महसुली कागद्पत्रांपैकी वारस नोंदी (६ड नोंदी ), जमीन वाटप नोंदी , ७/१२ उतारे , ८ अ उतारे , फेरफार , खरेदीखत , भाडेपट्टा ,७/१२ अमलात येण्यासाठी असणारे क,ड,ई पत्र , सोडपत्र , खासरपत्र , हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रामध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे कि नाही ते शोधावे,
रक्तसंबधातील नातवाईक म्हणजे काय ?
Maratha Kunbi certificate कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी रक्तसंबधातील नातवाईक म्हणजे काय ? हे खूप महत्वाचे आहे.
वडील / चुलते / आत्या / आजोबा / पणजोबा / खापर पणजोबा / वडिलाचे चुलते किंवा आत्या / आजोबाचे चुलते किंवा आत्या / पणजोबांचे चुलते किंवा आत्या / खापर पणजोबांचे चुलते किंवा आत्या/ किंवा वडिलाच्या नात्यामधील व्यक्ती.

