महाराष्ट्रात कोणत्या मोफत वैद्यकीय योजना आहेत?

Spread the love

महाराष्ट्र राज्यात राज्य आणि केद्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत ज्या योजनामधून प्रत्यक्ष लाभ मिळतो तर काही योजना अप्रत्यक्ष लाभाच्या आहेत. या योजनांमध्ये आरोग्य , शिक्षण , शेती, व्यवसाय अश्या विविध विभागाच्या योजना आहेत ज्या मधून राज्यातील प्रत्येक वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ मिळतो आज या लेखातून महाराष्ट्रात कोणत्या मोफत वैद्यकीय योजना आहेत? या विषयी खाली सखोल माहिती दिली आहे . त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

महाराष्ट्रात कोणत्या मोफत वैद्यकीय योजना आहेत
महाराष्ट्रात कोणत्या मोफत वैद्यकीय योजना आहेत

देशातील आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या सर्व प्रकारच्या योग्य आरोग्याच्या सेवा मिळाव्यात म्हणून केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी काही योजनामधून लाभार्थ्याला DBT मार्फत आर्थिक लाभ मिळतो तर काही योजनाच्या माध्यमातून मोफत आरोग्य विलाज मिळतो. काही योजनाच्या माधमातून आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोफत प्रवास सुविधा मिळतात. तर काही अश्या योजना आहेत ज्याच्या माधमातून मोफत डॉक्टर सल्ला मिळतो. त्या नेमक्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजनेच्या माधमातून नेमका काय लाभ मिळतो त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्रात कोणत्या मोफत वैद्यकीय योजना आहेत?

  • महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
  • प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
    • प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत १३०० पेक्षा जास्त आजारावर 5 लाखापर्यंत मोफत विलाज मिळतो . हा मोफत विलाज शासकीय दवाखाने व काही निवडक खाजगी दवाखान्यात सेवा पुरवल्या जातात. राज्यातील एखाद्या व्यक्ती कोणत्याही आजारावर विलाज घेतो तेव्हा अगोदर महात्मा जोतीबा फुले आरोग्य योजनेंतर्गत २.५ लाभ मिळतो आणि विलाजाचा खर्च त्यापेक्षा जास्त असल्यास तो व्यक्ती प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मधील ५ लाखाचा लाभ मिळतो असा ऐकून 7.5 लाखाचा मोफत विलाज मिळतो. त्या साठी रुग्णाकडे गोल्डन कार्ड काढणे आवश्यक आहे. जनआरोग्य योजना
  • जननी सुरक्षा योजना
    • ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे दवाखान्यात सुरक्षित प्रसूती व्हावी ह्या उद्देशाने हि योजना राबवली जाते. जर गर्भवती महिलेचे प्रसूती कोणत्याही दवाखान्यात झाली तर त्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत 500 आणि 1000 रुपये दिले जातात. (नॉर्मल प्रसूती 500 आणि सिजेरीयन प्रसूती 1000)
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना
    • भारतातील दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी करावी लागते, ज्यामुळे त्या व त्यांच्या कमी वजनाच्या, कुपोषित नवजात बालकांचे आरोग्य बिघडते, परिणामी माता व बालमृत्यूदर वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे व नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे, माता व बालमृत्यूदर कमी करणे, लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येला आळा घालणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, संस्थात्मक प्रसूती आणि जन्मनोंदणीचे प्रमाण वाढवणे हे आहे. योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५,००० रुपये दोन हप्त्यांत आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास ६,००० रुपये एकरकमी आधार संलग्न खात्यात जमा केले जातात. लाभ मिळवण्यासाठी गर्भधारणेची नोंदणी, प्रसूतीपूर्व तपासणी, बाळाची जन्मनोंदणी आणि लसीकरणाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. १ एप्रिल २०२२ नंतर दुसऱ्या मुलीच्या जन्मासाठीही लाभ मिळतो, परंतु विहित मुदतीत अर्ज करणे गरजेचे आहे.
  • मातृत्व सुरक्षा अभियान
    • या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, तर शहरी भागातील अर्बन डिस्पेन्सरीज, हेल्थपोस्ट, मॅटर्निटी होम्स यांसारख्या सरकारी आरोग्य संस्थांमध्ये प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला ( जर ९ तारीख रविवार किंवा सुट्टी असेल, तर त्यापुढील कार्यालयीन दिवशी ) कॅम्प आयोजित केला जातो. या कॅम्प अंतर्गत उच्च जोखमीच्या गर्भवती (high risk pregnancy ) महिलांना मोफत विलाज केला जातो.
  • मोफत रुग्णवाहिका योजना
    • या योजनेंतर्गत राज्यातील रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका पुरवली जाते. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन घटनेसाठी 108 हा नंबर वर फोन करून देशातील प्रत्येक व्यक्ती रुग्णवाहिका वाहिका बोलवू शकते.
  • मोफत लसीकरण योजना
    • बालमृत्यू व बालकांमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी व बालकांचे योग्य वयात संपूर्ण लसीकरण करणे ही अत्यंत सोपी, कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी उपाययोजना असून या कार्यक्रमांतर्गत बालकांमधील क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिमोफीलस इन्फ्लुएन्झा टाईप बी, पोलिओ, गोवर व रुबेला या आजारांमुळे होणारे आजारपण व मृत्यू कमी करणे हे नियमित लसीकरण कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे . वरील सर्व लसीकरण जन्मापासून बाळ 5 वर्षाचे होई पर्यन्त दिली जाते व हे देशातील आणि राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अतिशय मोफत आहे.
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम RBSK
    • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा मुलांच्या सर्वांगीण आरोग्यविकासासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील जन्मजात व्यंग, आजार, जीवनसत्त्व कमतरतेमुळे होणारे विकार आणि अपंगत्व यांचे वेळीच निदान करून त्यावर मोफत उपचार दिले जात आहेत . महाराष्ट्रात सुमारे २ कोटी मुलांना या कार्यक्रमाचा लाभ मिळत असून, अंगणवाडी स्तरावर ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून दोनदा तपासणी आणि शासकीय तसेच निमशासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आरोग्य तपासणी हा याचा मुख्य आधार आहे. प्रत्येक तालुक्यात नियुक्त केलेल्या पथकांद्वारे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांच्या सहाय्याने, मुलांमध्ये आढळलेल्या आरोग्य समस्यांसाठी संदर्भ सेवा आणि वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपचार मोफत पुरवले जातात.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने 2026 मधील नवीन सरकारी योजना|New Government Schemes in 2026|व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top