अनेमिया म्हणजे काय इन मराठी ? कारणे, लक्षणे ,दुष्परिणाम आणि उपाययोजना वाचा पूर्ण माहिती

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

अनेमिया म्हणजे काय इन मराठी , अलीकडेच प्रसिद्ध आलेल्या ICMR भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ( Indian council of medical reasearch ,governmet of India ) यांच्या २०२२ च्या संशोधनानुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६७ टक्के मुले (वय ६ -५९ महिने) , ५९टक्के – किशोरवयीन मुली आणि ५२टक्के नवीन गरोदर माता (पहिले गरोदरपण) ह्या अनेमियाने ग्रस्त आहेत. आणि महाराष्ट्राचा विचार केला असता एकूण लोकसंख्येपैकी ५३.७ टक्के मुले (वय ६-५९ महिने) ,४७.३टक्के गर्भवती महिला (वय वर्ष १५- ४९) , ४८टक्के इतर सर्व महिला ( वयवर्षे १५-४९) ४९.७टक्के किशोरवयीन मुले (वयवर्षे १५-१९ वर्ष) आहे.जागतिक आरोग्याचा विचार केला असता वरील नमूद केलेली टक्केवारी खूप आहे, पुरुष्यामधे अनेमियाचे प्रमाण नगण्य असून महिलांमध्ये प्रमाणं मोठे आहे आणि परिणामाचा विचार केला असता अनेमियाग्रस्त व्यक्तीस तर त्रास होतोच पण त्याहीपेक्षा येणाऱ्या पिढीला जास्त त्रास होतो.

अनेमिया म्हणजे काय इन मराठी

  • अनेमिया म्हणजेच आपल्या सामान्य भाषेत रक्तपांढरी रक्तपिती, रक्त्तशय, अक्तकल्पता या ना अनेक नावाने ओळखले जाते पण सामान्यतः सांगायचं आल्यास शरीरातील रक्तामधील लोहाचं प्रमाण कमी होते किंवा रक्त कमी होणे आला अनेमिया मानतात.
  • अनेमियाला समजून घेताना आपल्या शरीरातील रक्ताचे काम समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
  •  रक्त हे अन्नघटकांचे वाहन करणे. 
  • आपण नाकावाटे घेतलेला आणि फुफ्फुसाद्वारे शुद्ध ओक्सजन चा पुरवठा संपूर्ण शरीरात करणे. 
  • शरीराच्या प्रत्येक अवयवाला ऊर्जेचा पुरवठा करणे. 
  • ऊर्जेच्या वापरानंतर निर्माण झालेला कार्बनडाय ऑक्सीइडं फुफ्फुसापुरतं घेऊन येणे.
अनेमिया म्हणजे काय इन मराठी
अनेमिया म्हणजे काय इन मराठी

अनेमिया म्हणजे काय इन मराठी

  • हे चार प्रमुख कार्य रक्त मार्फत होतात. जर शरीरात रक्ताची कमी निर्माण झाली तर हे सर्व कार्य करण्यासाठी रक्ताला अडचणी निर्माण होतात. आणि व्यक्तीस सामान्य जीवन जगण्यास अडचण येऊ शकते व पुढील दुष्परिणाम दिसून येतात. अनेमियाचे प्रकार
    • लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया
    • जीवनसत्व B१२ च्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया
    • फॉलीक ऍसिड च्या कमतरतेमुळे होणारा अनेमिय
    • सिकलसेल अनेमिया ( भारतातील आदिवासी समुदायामध्ये याचे प्रमाण मोठा प्रमाणत आढळून येते )

अनेमिया वर्गवारी

                                                अनेमिया वर्गवारी
वर्गवारीअगोदर मातास्तनदा माता व किशोरवयीन मुली
तीव्र6.9 less than7.9 less then
सौम्य– 7 to 9.98 to 10.9
अतिसौम्य10 to 10.911 to 11.9
सामान्य– 11 more then12 more then
अनेमिया म्हणजे काय इन मराठी

अनेमियाचे लक्षणे

  • काम करताना लवकर थकवा जाणतो. प्रचंड अशक्तपणा जाणवतो
  • सर्मणशक्ती कमी होते.
  • सौम्य (हलकी) डोकेदुखी.
  • अवेळी झोपेची गुंगी आल्यासारखे वाटणे.
  • धाप लागणे काम करताना किंवा चालताना
  • चालताना चक्कर येऊ शकते.
  • भूक कमी होते
  • हात, पाय चेहरा , जीभ , डोळे सफेद (पांढरे) दिसू लागतात.
  • निरुत्साही वाटते.
  • चिडचिडपणा वाढतो.

प्रामुख्याने पुढील कारणामुळे अनेमिया होण्याची शक्यता जास्त असते.

  • आहाराची कमतरता.
  • मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव
  • मानसिक ताण तणाव.
  • जास्तीचे बाळंतपणे.
  • वारंवार आजारी पडणे.
  • प्रदीर्ध ( जास्त काळ / मोठ्या आजरातून ) बाहेर आल्यावर रक्ताची कमी होऊ शकते.
  • पोटामध्ये जंत असणे.
  • मूळव्याध, टाइफाइड सारखे आजार.
अनेमिया मुळे होणारे दुष्परिणाम

सामान्यतः अनेमियाचे ४ प्रकार पडतात तीव्र अनेमिया ,सौम्य अनेमिया ,अतिसौम्य अनेमिया आणि सामान्य प्रकारानुसार परिणामाचे दुष्परिणाम दिसुन येतात. मुखतः सामान्य आणि अतिसौम्य अनेमिक व्यक्तीस जास्त त्रास होत नाही परंतु तीव्र आणि सौम्य अनेमिया मुळे संक्रमित व्यत्ती व त्यावर अवलंबून असलेल्या बालकावर त्याचे परिणाम दिसून येतात.

  • अनेमिया म्हणजे काय इन मराठी समजून घेताना अनेमिया मुळे होणारे दुष्परिणाम समजून घेऊयात
    • उत्पादकता कमी होते.
    • अरोदरपणात अनेमिया झाला असल्यास कमी वजनाचे बालक जन्माला येते.
    • वेळेच्या अगोदर ( ९ महिने पूर्ण होण्याच्या ) बाळंतपण होते.
    • बाळंतपणत जास्त रक्तस्त्राव होते.
    • बाळंतपणामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे माता मुत्यू होतो.
    • बाळंतपणामध्ये बाळ दगावण्याची शक्यता वाढते.
    • किशोरींमध्ये मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होतो.
    • कामात या अभ्यासामध्ये मन लागत नाही.
    • भूक कमी झाल्यामूळेजेवण जात नाही परिणामः वजन कमी होते.
    • फॉलीक ऍसिड च्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेमियामुळे बाळाच्या बोद्धिक विकास होत नाही.
    • रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन दुसरे आजार होण्याचे प्रमाण वाढतात. परिणामतः आजारी व्यक्तीचा मुत्यु सुद्धा होऊ शकतो
प्रतिबंधात्मक उपाय योजना
  • अरोदरपणात जास्त रक्ताची गरज भासते म्हणून योग्य आहारासोबत लोहयुक्त गोलीचे सेवन करावे.
  • लोहयुक्त गोळी मोफत मिळवण्यासाठी आपल्या गावातील किंवा भागातील आशा कार्यक्रत्या किंवा ANM यांच्याशी संपर्क साधावा. त्याच बरोबर आपल्या जवळील स्वास्थ केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन योग्य तपासणी करून गोळी घ्यावी.
  • अनेमिया पासून मुक्त होण्यासाठी योग्य आहाराकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे. तर पुढील आहाराचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा.
  • रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. प्रामुख्याने पालक, मेथी आपल्या गावात , शेतात असलेली भाजी जास्त लाभदायक, शेवग्याच्या सेंगा आणि पाला.
  • कडीपत्ता आणि पुदिना प्रत्येक भाजीमध्ये सुद्धा वापरता येईल आणि चटणी सुद्धा बनयून खाली तरी उपयुक्त ठरेल.
  • गूळ आणि शेंगदाणे
  • डाळी
  • आवळा,कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन लाभदायक आहे.
  • जर मांसाहार खात असाल तर काळीज अतिशय उपयुक्त ठरेल.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातूनअनेमिया म्हणजे काय इन मराठी  आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top