मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2026 मध्ये काय काय झालेत बदल ladki bahin yojana

Spread the love

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana : महाराष्ट्र राज्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या सत्तेच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात करण्यात आली होती या योजनेनंतर्गत राज्यातील सर्व महिलाना ( सुरुवातीला ) 1500 रुपये महिला आर्थिक लाभ प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार होता. आणि तो सुरुवातीला काही महीने मिळाला सुद्धा पण मागील काही महिन्यात राज्य सरकार मार्फत अनेक बदल करण्यात आले आहोत आणि त्या बदलामुळे राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना या योजेनच्या लाभापासून वगळण्यात आले आहे. नेमके काय काय नियम आणि निकष लाऊन महिलाना वगळले आणि त्याच बरोबर योजनेमद्धे इतर कोणते महत्वाचे बदल झाले आहेत. याविषयी सखोल माहिती देणार हा लेख.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana

जून 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ladki bahin yojna ची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील महिलांचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरांच्या महिलांना सपोर्ट करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा होता . योजेनचा लाभ महिला व बाल कल्याण विभागामार्फत देण्यात येणार होता , महिला आपल्या घरी बसून अंगणवाडी सेविका मार्फत किंवा स्वतः आपल्या मोबाइल च्या माध्यमातून अगदी सहज अर्ज करू शकत होती. काही काळातच योजना एवढी प्रसिद्ध करण्यात आली की राज्यातील .. लाख महिलानी यांची अर्ज प्रकिया एका महिन्यात पूर्ण केली. सर्व महिलांना लाभ मिळाला का ? हा मोठा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये झालेले बदल

e-KYC अनिवार्य & नवी तपासणी

योजना झाली तसे काही महिन्यात शासनाने महत्वाचा बदल केला त्या मध्ये प्रामुख्याने मोठा बदल म्हणजे आधार कार्ड e-kyc करणे अनिवार्य केले त्यामुळे जे चुकीचे लाभ घेत होते त्यांना ओळखता आले. सोबत सर्व अर्जाचा पुनः तपासणी करण्यात आली.

पुढील काळात म्हणजे जून 2025 मध्ये आणि दर वर्ष जून ते ऑगस्ट महिन्यात प्रत्येक लाभार्थी महिलेस आपली आधार e-kyc करणे आवश्यक आहे.

लाभार्थींची पुनर्तपासणी

  • आधार e-kyc करून ज्या agebar झाल्या आहेत म्हणजे ज्या महिलेचे वय 60 पेक्षा जास्त झाले आहे अश्या महिलांना योजनेच्या लाभापासून वगळण्यात आले.
  • सोबत एका कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत याची पुनः तपासणी करण्यात आली आणि एका कुटुंबातील एकाच महिलास पुढील काळात लाभ मिळेल आणि बाकी महिलाना वगळण्यात येईल.
  • ज्या महिलेने duplicate अर्ज केला होता त्यांना ओळखून एक अर्ज बाद बरणे.
  • ज्या महिला इतर प्रत्यक्ष लाभच्या योजनाचा लाभ घेतात अश्या महिलांना वगळणे.
  • ज्या महिला आयकर भरतात त्या महिलाना वगळण्यात आले.

अर्जासाठी कागदपत्रे आणि अर्हता सुलभ

महाराष्ट्र राज्यातील महिलांनी अगदी सहज अर्ज करून लाभ घ्यावा , या साठी योजना अधिक लवचिक बनवली आणि अर्हता सुलभ करण्यात आली.

रक्कम कमी अधिक बद्दल अफवा / स्पष्टता

राज्यात 2025 मध्ये विविध अफवा पसरल्या होत्या जस की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana मधून मिळणारा लाभामध्ये बदल झाला 1500 रुपये रक्कम वाढून 2000 रुपये होणार आहे , किंवा 500 कमी होणार आहे , योजना बंद होणार आहे , अश्या अनेक अफवा परसल्या होत्या परंतु महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केली की योजना बंद होणार नाही आणि योजेनमध्ये कोणताही बदल होणार नाही.

विशेष प्रसंगी अतिरिक्त/बोनस रक्कम

महाराष्ट्र सरकार मार्फत राज्यातील महिलांना विशेष प्रसंगा मध्ये जस की दिवाळी की बोनस रक्कम देण्यात येईल.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2026 मध्ये काय काय झालेत बदल ladki bahin yojana व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top