मागील काही वर्षपासून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये पदवीधर पात्र उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरी न देता वार्षिक करारावर नोकरी देण्याचे प्रणाम जवळपास प्रत्येक विभागात ३०% एवढे असून कंत्राटी उमेदवारांना मिळणार मासिक वेतन नसून मानधन देत आहेत. आणि हे मानधन अतिशय कमी असून कंत्राटी उमेदवारांचे यावर कोणताही खर्च भागात नाही. असे कंत्राटी उमेदवार १० ,१२ वर्षांपासून शासकीय व निमशासकीय विभागात काम करत असून त्यांना असून सुद्धा कायम तत्वावर घेतले नाही.
संबंधित महाराष्ट्र राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा मागील 15 वर्षापासून प्रलंवबत प्रश्न निकाली काढण्याकरीता तसेच अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणजे कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संदर्भ क्र.5 येथील शासन निर्णायान्वे मा.मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे . सदर समितीने शासनास दिनांक 6.9.2018 रोजी सादर केलेल्या अहवालाच्या अनुर्षंगाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने. मंत्रिमंडळासमोर दिनांक 11.12.2018 रोजीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला असता त्यास मा.मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे, सदर निर्णयानुसार, पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना थेट वनयुक्तीसाठी संदभण क्र.4 अन्वये निश्चित केलेल्या 46 वर्षे हि कमाल वयोमयादा शिथिल करुन ती वय 55 वर्षे करण्यास मान्यता दिली आहे . त्यानुसार शासन वनणणय वनगणवमत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.
पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय ?
- १९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत विविध कार्यालयात पदवीधर युवक-युवतींना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००४ पर्यंत राबविली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. शासकीय कामाचा अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४ हजार आहे.
- अंशकालीन करार हा एक प्रकारचा रोजगार आहे जो पूर्ण-वेळ नोकरीपेक्षा आठवड्यातून कमी तासांचा असतो. यामध्ये असणारे कर्मचारी क्वचित पाळीमध्ये काम करतात. शिफ्ट अनेकदा बदलण्यात येतात. आठवड्यातून ३० तासांपेक्षा कमी काम केल्यास कामगारांना अर्धवेळ अथवा अंशकालीन कामगार/कर्मचारी मानले जाते.ते कामगार अथवा कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास त्यांना अंशकालीन कर्मचारी असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मते, युनायटेड स्टेट्स वगळता, बहुतेक विकसित देशांमध्ये गेल्या २० वर्षांमध्ये अंश-काळातील कामगारांची संख्या एक चतुर्थांशापर्यंत वाढली आहे.अर्धवेळ काम करण्यासाठी अनेक कारणे आहेत, जसे की ते काम करण्याची इच्छा असणे, नियोक्त्याने आपले तास कमी केले आणि पूर्ण-वेळ नोकरी मिळविण्यात अक्षम. इंटरनॅशनल लेबर ऑर्गेनाइझेशन कन्व्हेन्शन १७५ ची अशी आवश्यकता आहे की अर्धवेळ कामगारांना पूर्ण-वेळ कामगारांप्रमाणेच वागणूक देण्यात यावी.
पदवीधर कोणास म्हणावे ?
- पहिली पायरी म्हणजे दोन वर्षांची महाविद्यालयीन पदवी ज्याला असोसिएट्स पदवी म्हणतात ,त्यानंतर, चार वर्षांच्या महाविद्यालयीन पदवीला बॅचलर पदवी म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला बॅचलर नंतर मिळणाऱ्या पदवीधर पदव्या आहेत.एक ते दोन वर्षांचा पदवीचा अभ्यास तुम्हाला पदव्युत्तर पदवी देऊ शकतो. जर ते संशोधनावर आधारित असेल तर त्याला मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणतात.त्यानंतर तीन किंवा अधिक वर्षांनी, अंतिम म्हणजे डॉक्टरेट पदवी किंवा डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी.
- पदवी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रातील पात्रता किंवा स्तर आहे. पदवी ही विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये किती पारंगत आहे व त्याचा त्या विषयासंबंधी चा अभ्यास किती खोलवर आहे हे दर्शवते. पदवी ह्या एखाद्या जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे असतात म्हणजे पुढच्या पायरीवर जाण्यासाठी त्याच्या अगोदर पायरी सर करणे गरजेचे असते.त्याचप्रमाणे पदवीधर, पदव्युत्तर, पीएचडी यासुद्धा चढत्या क्रमाने पूर्ण कराव्या लागतात. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या विषयांमध्ये पीएचडी पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर व पदव्युत्तर पूर्ण करणे गरजेचे असते.
सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही इयत्ता १२ वि नंतर ३ वर्ष , ४ वर्ष किंवा ५ वर्षाचे शिक्षण पूर्ण केले तुम्ही पदवीधर झालात
- Bachelor of Arts: BA
- Bachelor of Business Administration: BBA
- Bachelor of Management Studies: BMS
- Bachelor of Science: BSc
- Bachelor of Science in Information Technology: BSIT
- Bachelor of Commerce: Bcom
- Bachelor of Fine Arts: BFA
- Bachelor of Computer Application: BCA
- Bachelor of Laws: LLB
- Bachelor of Engineering: BE
- Bachelor of Technology: BTech
- Bachelor of Education: BEd (BEd degrees are offered after completion of a 3-year undergraduate coursework.)
- Bachelor of Medicine, Bachelor of Surgery: MBBS
- Bachelor of Veterinary Science: BVSc
- Bachelor of Architecture: BArch
वरील सर्व पदवी शिक्षणाचे उदाहरणे आहेत.
अंशकालीन प्रमाणपत्र कसे काढावे?
तीन वर्षे शासनाच्या कुठल्याही कार्यालयात कामाचा अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले.
- सध्या पदवीधर अंशकालीन उमेदवार याना नोकरीत कायम करून घ्या या विषयाने महाराष्ट्र्रत जोर धरला आहे त्या मागचे कारण म्हणजे माननीय बच्चू कडू साहेब आहेत.
- राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळाची गरज भासल्यास बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंगद्वारे) माध्यमातून उमेदवाराची नेमणूक केली जाते. परंतू, अशी पद्धती अवलंबितांना पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने रिक्त पदांवर कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूक करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडून यांनी आज येथे दिले.
- येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रिक्त पदांच्या अनुषंगाने अंशकालीन पदवीधरांच्या नेमणूका यासंदर्भात राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक प्रफुल्ल शेळके यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सोबत , राज्य शासनाच्या शासकीय तसेच अधिपत्याखालील कार्यालयाच्या आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे एखाद्या संस्था किंवा कंपनीसोबत कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतू, असे करतांना अंशकालीन उमेदवारांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी त्यांना वयाच्या बाबतीत सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूकी दिल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल प्रलंबित प्रश्न निकाली लागेल. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने संकेतस्थळ विकसित केले असून त्यावरुन अंशकालीन उमेदवारांची यादी संबंधित विभागाला प्राप्त करता येईल. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा
हे ही वाचा 📌
- अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय आणि शासनाने त्यांना किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे
- bharat ratna award भारत रत्न इतिहास,मिळणारे लाभ व सुविधा आणि प्राप्तकर्त्यांची यादी …..
- दादासाहेब फाळके पुरस्कार इतिहास व यादी ,Dadasaheb Phalke Award History and List of honour
- बालशिक्षण काळाची गरज
- Mother Name Mandatory in Maharashtra आईचं नाव बंधनकारक आता सगळी कागदपत्र नव्याने काढावे लागणार..