नमस्कार मित्रानो आज आपण संजय गांधी निराधार योजनेबद्दल माहिती घेणार आहोत सध्या हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यात चालू असून सदरील योजनेअंतर्गत दर महिन्याला 600 ते 1500 रुपये पेन्शन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येते. सदरील योजनेसाठी कोण- कोण पात्र आहे , योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत आणि लाभ घेन्यासाठी तुम्ही अर्ज कसा कराल या विषयी सविस्तर माहिती तुम्हाला या लेखातून मिळणार आहे सोबत वेबसाईटची लिक सुद्धा देणार आहे तर लेख पूर्ण वाचा.
संजय गांधी निराधार योजना माहिती
- संजय गांधी निराधार योजना 1985 मध्ये Rajiv Gandhi हे पंतप्रधान असताना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय निराधार योजना होते पुढील काळात या योजनेचे नाव बदलून महाराष्ट्रसरकारने संजय गांधी निराधार योजना करण्यात आले,महाराष्ट्रात, 1993 मध्ये संजय गांधी निराधार योजना नावाने या योजनेचा स्वीकार करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकांसाठी या योजनेचा विस्तार आणि सुधारणा केली.
- योजनेच्या सुरुवातीला गरिब आणि निराधार लोकांना आर्थिक आधार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा होता. या योजनेमुळे लाखो लोकांना अर्थीक मदत झाली आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना उद्देश:
- संजय गांधी निराधार योजना ही गरजू आणि निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी योजना असून ती महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणारी योजना आहे.
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी
या योजनेंतर्गत लाभार्थी चे मुखातः 7 गटात विभागले आहे ते पुढीलप्रमाणे
- गट 1 – अपंगातील अस्थिव्यंग , अंध मुकबाधिर , कर्णबधिर मतिमंद इत्यादि प्रवर्गातील महिला व पुरुष
- गट 2 – क्षयरोग , पक्षपात , कर्करोग , एडस (HIV संक्रमित ) कुष्टरोगी या सारख्या आजारामुळे स्वतचा चरितार्थ चालवू न शकणारे महिला व पुरुष
- गट 3 – निराधार महिला , निराधार विधवा , घटस्फोटीत महिला किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेत असणाऱ्या व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या उत्पन्न मर्यादेपक्षा कमी असलेल्या महिला अत्याचरीत महिला वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
- गट 4 – शेतमजूर महिला ज्याचे वय 35 पेक्षा जास्त आहे.
- गट 5– आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेतील मर्यादेपेक्षा कमी असलेल्या महिला किंवा कुटुंबातील व्यक्ति
- गट – 6 अनाथ मुले
- गट 7 – ज्या महिलाना सिकलेसेल रुग्ण या आजाराने ग्रासले आहे अश्या 35 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
- वयाचा दाखल :- ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका जन्मनोंद वहितील उताऱ्याची सत्य प्रत , शाळा सोडल्याचा दाखल , रासन कार्ड किंवा निवडणूक मतदार यादीतील नमूद केलेल्या वयाचा उतार किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दिलेला वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखल : – तहसीलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ति किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा संक्षकित उतारा.
- रहिवाशी दाखला :- ग्रामसेवक, तलाठी, मंडल निरीक्षक , नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्याचा दाखला.
अपंगत्वचे प्रमाणपत्र – अस्थिव्यंग , अंध मुकबाधिर , कर्णबधिर मतिमंद यांचे अपंगत्वाबबत अपंग व्यक्ति अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्यचीकित्सक ( सिव्हिल सर्जन ) यांचे प्रमाणपत्र - असमर्थतेचा / रोगाचा दाखल जिल्हा शल्यचीकित्सक ( सिव्हिल सर्जन ) शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला :- कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवासग्रहाचा आंतरवासी असल्याचा दाखला. – तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी देलेला दाखला.
- अनाथ असल्याचा दाखला :- ग्रामसेवक / मुख्याधिकारी /प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी एकात्मिक बलविकस सेवा योजना यांनी साक्षकीत केलेला दाखला.
संजय गांधी निराधार योजना अनुदान
- प्रत्येक लाभार्थीस दरमहा प्रत्येकी 1000 व एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबास दरमहा 1500 रुपये मिळतील. लाभार्थींना त्यांच्या / तिच्या अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत, किंवा तो / ती नोकरी करे पर्यंत , जे आधी होईल लाभ दिला जाईल.
- सदरील लाभ हा संबधित लाभार्थी च्या बँक खात्यामध्ये दरमहा जमा केल्या जातो .
- योजनेचा फंड उपलब्ध नसल्यास कधी कधी दरमहा पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा नाही होत परंतु फंड उपलब्ध थकीत रकमे सोबत तुमचे पैसे जमा केल्या जातात.
- मागील 4 महिन्यापूर्वी ३००० प्रतिमाह लाभार्थ्यांना लाभ मिळाला या साठी प्रस्ताव देण्यात आला आहे जर पुढील काळात तो मंजूर झाला तर 1500 रुपयावरून 3000 लाभ मिळेल
अर्ज कसा करावा
- अर्ज प्रक्रिया सद्यस्थितीत ऑफलाइन चालू आहे.
- अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
- अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी
- आपण आपल्या जिल्ह्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाशी संपर्क साधू शकता.
- अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://sjsa.maharashtra.gov.in/en
F & Q
- प्रश्न – संजय गांधी निराधार योजना फॉर्म Online भरता येतील का ?
- उत्तर : अर्ज प्रक्रिया सद्यस्थितीत ऑफलाइन चालू आहे. अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
- प्रश्न 2 – संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
- उत्तर : वरील लेखात योजनेस लागणारे सर्व कागदपत्राची यादी दिली आहे
- संजय गांधी निराधार योजना ऑफिसियल वेबसाइट
- उत्तर : महाराष्ट्र शासन सामजिक न्यास विभाग वर तुम्ही भेट देऊ शकता . सोबत आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईट सुद्धा भेट द्यावी.
- संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र
- उत्तर :– संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्याची यादी पाहण्यसाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा वेबसाईट किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी. संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे आणि किती मिळणार महिन्याला पैसे व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.