mahila bal kalyan vibhag bharti : महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फ़त , महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य , पुणे – ०१ यांच्या मार्फ़त सरळ सेवा भरती साठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या जाहिरातीचा जाहिरात क्रमांक आहे जनहित याचिका क्रमानं १५२/२०११ असून या नोकर भरती जाहिराती मधून एकूण १७ पदाचा भरणा करण्यात येणार आहे. सदरील भरती प्रकिया सरळ सेवा असून उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

जून १९९३ मध्ये स्थापन झालेला हा विभाग महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्रपणे कार्य करतो. याचे प्रशासकीय मुख्यालय पुणे (आयुक्तालय) येथे आहे. हा विभाग महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘माविम’ आणि ‘मनोधैर्य’ यांसारख्या योजना राबवतो. तसेच, बालकांचे कुपोषण थांबवण्यासाठी आणि आरोग्यासाठी ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ (अंगणवाडी) आणि अनाथ मुलांसाठी ‘बाल संगोपन योजना’ प्रभावीपणे चालवल्या जातात. कौटुंबिक हिंसाचार व अत्याचारापासून महिला व बालकांचे संरक्षण करणे, त्यांना कायदेशीर मदत देणे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी womenchild.maharashtra.gov.in वर भेट द्या.
mahila bal kalyan vibhag bharti
महिला व बाल विकास विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या भारतीमधून संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदांची भरती करण्यात येणार आहे. सदरील पदे विभाग आणि राज्य स्तरावर काम करतात. हि भरती सरळ सेवा भरती असून विभागामार्फ़त घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज भारण्याबाबत सूचना अधिकृत वेबसाइट वर दिली आहेत सोबत PDF जाहिरातीवर सुद्धा माहिती दिली आहे ती वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी .
निवड प्रक्रिया: पारदर्शक आणि सोपी अनेकदा मुलाखतीची भीती उमेदवारांच्या मनात असते. पण या भरतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड या पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही केवळ संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेतील (CBT) गुणांवर अवलंबून असेल. काही विशिष्ट पदांसाठी (उदा. लघुलेखक, स्वयंपाकी) व्यावसायिक चाचणी होईल, पण बाकी पदांसाठी केवळ लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी हाच मुख्य मार्ग आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षे आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. या सवलतीमुळे अनेक अनुभवी उमेदवारांनाही सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.
एक आवाहन: मित्रांनो, ‘संरक्षण अधिकारी’ किंवा ‘काळजी वाहक’ ही पदे केवळ वेतनापुरती मर्यादित नाहीत. एका अनाथ मुलाला आधार देणे किंवा संकटग्रस्त महिलेला न्याय मिळवून देणे, हे काम या पदांच्या माध्यमातून करता येते. म्हणूनच, जर तुम्ही पात्रता निकषांत बसत असाल, तर या संधीचा नक्कीच विचार करा. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२५ (रात्री ११:५५ पर्यंत). आहे.
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | PDF डाऊनलोड करा |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
SBI bank bharti : 996 पदांची भरती : थेट मुलाखत आणि पगार लाखांत! 🔥

