गोल्डन कार्ड योजनेमधून तब्बल ५ लाखाचा मिळतो लाभ ayushman golden card maharashtra


ayushman golden card maharashtra : केद्र शासनाची अतिशय महत्वाकांशी योजनेपैकी एक योजना म्हणजे आयुष्मान प्रधानमंत्री जन- आरोग्य योजना याच योजनामधून देशभरातील पात्र लोकांना गोल्डन कार्ड चे वाटप करण्याची प्रकिया चालू आहे पण अनेकांना हे गोल्डन कार्ड नेमके काय आहे त्याचा फायदा काय याविषयी माहिती नाही त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे त्याच्या साठी अतिशय उपयुक्त लेख.

ayushman golden card maharashtra
ayushman golden card maharashtra

ayushman golden card maharashtra

आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत देशभरातील ४१ करोड लोकांना गोल्डन कार्ड तयार करून वाटप करण्यात आले आहे. हे गोल्डन कार्ड नेमक काय आहे , गोल्डन कार्ड चे वैशिष्ट्ये काय , गोल्डन कार्ड कुणाला मिळते , गोल्डन कार्ड कसे काढायचे , गोल्डन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे आणि गोल्डन कार्ड चा फायदा काय याविषयी सविस्तर माहिती देणारा ला लेख.

काय आहे गोल्डन कार्ड योजना

गोल्डन कार्ड हो कोणतीही योजना नसून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM -JAY) अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारे एक कार्ड असून एकदा का हे कार्ड कार्ड धारक आणि कुटुंबातील सदस्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM -JAY)  अंतर्गत निवडक रुग्णालयात/ हॉस्पिटल मध्ये ५ लाखापर्यंत मोफत विलाज घेऊ शकतो. 

गोल्डन कार्डची वैशिष्ट्ये

  1. रुग्णालयात/ हॉस्पिटल मध्ये वार्षिक कुटुंबालारुपये ५ लाखाचा विलाज मोफत. 
  2. शासकीय आणि मान्यतापात्र दवाखाण्यात या मोफत उपचाराची सोय उपलब्ध 
  3. गोल्डन कार्ड धारकास कॅशलेस cashless  आणि पेपरलेस सुविधा उपलब्ध 
  4. आजार , शास्त्रकिया , औषधे , निदान चाचण्या , हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च इत्यादी प्रकारचा खर्च या योजनेमध्ये देण्यात येतो. 
  5. गोल्डनकार्ड असल्यास कागदपत्र जमा करण्यात जास्त वेळ जात नाही त्यामुळे रुग्णास तात्काळ आरोग्य उपचार मिळण्यास मदत होते 

गोल्डन कार्ड कुणाला मिळते

  • सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना नुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. 
  • अंतोदय अन्न योजना व राशन धारक कुटूंब हे सर्व गोल्डन कार्ड साठी पात्र असतील. 
  • ग्रामीण व शहरी कुटुंबे 
  • अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST मधील सर्व कुटुंबे 
  • घरकामगार, शिंपी, हस्तकला कामगार, बागकाम, स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले, मोची, सुरक्षा रक्षक, बांधकाम कामगार, गवंडी, मेकॅनिक, भिकारी, वेटर, शिपाई इत्यादी शहरातील कुटुंबे 

गोल्डन कार्ड कसे काढायचे. 

सर्वात अगोदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे कि नाही हे तपासणे महत्वाचे आहे त्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट जाऊन ते तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM -JAY) या अधिकृत वेबसाइट वर जाऊन   “I am Eligible “ या बटनावर क्लिक करून तुम्ही आवश्यक माहिती भरा आणि OTP टाकून आपण पात्र आहोत कि नाही हे चेक करू शकतो. 
  • जर तुम्ही पात्र असाल तर आता तुम्ही तुमचे गोल्डन कार्ड तयार करून घेऊन शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ASHA ताई यांना भेटून तुमचे गोल्डन कार्ड कडून शकता. किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सुद्धा गोल्डन कार्ड चा अर्ज करू शकता. 

गोल्डन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. आधार कार्ड सोबत आधार शी लिंक असलेला मोबाईल नंबर 
  2. रेशन कार्ड 
  3. उत्पनाचे प्रमाणपत्र 
  4. पासपोर्ट साईज फोटो 
  5. संपर्कासाठी संपूर्ण पत्ता 

गोल्डन कार्ड चे फायदे 

  • वार्षिक एका कुटुंबासाठी ५ लाखापर्यंत मोफत उपचार. 
  • आपत्कालीन परिस्थिती सुद्धा तात्काळ उपचार कोणतेही कागदपत्र द्यायची गरज नाही. 
  • मोठ्या आजारासाठी किंवा शस्त्रकिया साठी आर्थिक मदत. 
  • संपूर्ण कुटुंबास कव्हर मिळते. 
  • पूर्वीपासून चालत आलेल्या आजारांचा पण यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 
  • १९०० पेक्षा जास्त प्रकारचे उपचाराचा लाभ गोल्डन कार्ड धारकास मिळतो. 
  • देशभरात सरकारी व काही मान्यता पात्र हॉस्पिटल/ दवाखान्यात मोफत उपचार उपलब्ध

 लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “गोल्डन कार्ड योजनेमधून तब्बल ५ लाखाचा मिळतो लाभ ayushman golden card maharashtra व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top