आजच्या डिजिटल युगात शिक्षण क्षेत्रही झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीचे संग्रहन, पडताळणी आणि व्यवस्थापन या गोष्टी अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यासाठी भारत सरकारने एक अत्यंत उपयुक्त अशी नवी संकल्पना आणली आहे – ती म्हणजे “अपार आयडी” (APAAR ID).
“वन नेशन, वन स्टुडंट आयडी” या विचारसरणीवर आधारित ही योजना प्रत्येक विद्यार्थ्याला एक अद्वितीय शैक्षणिक ओळख प्रदान करते. ही आयडी त्यांच्या शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचे रेकॉर्ड एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवते.
या लेखामध्ये आपण अपार आयडी म्हणजे काय, ती कशी मिळते, तिचे फायदे आणि त्यामागील उद्दिष्ट यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अपार आयडी म्हणजे काय?
APAAR ID म्हणजेच Automated Permanent Academic Account Registry, ही भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत सुरू केलेली एक योजना आहे. यामागील उद्देश आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक एकमेव, कायमस्वरूपी शैक्षणिक ओळख (Academic ID) निर्माण करणे. म्हणजेच One Nation, One Student ID. अपार आयडी ही एक १२-अंकी अद्वितीय संख्या (12-digit unique ID) आहे जी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात ओळखण्यासाठी वापरली जाईल. ही ID आधार कार्डसारखीच एक डिजिटल ओळख असेल, पण केवळ शैक्षणिक बाबींमध्ये उपयोगी.
अपार आयडीचे फायदे:
1.सर्व महत्त्वाचे कागदपत्रे एका ठिकाणी सुरक्षित आणि कधीही सुलभपणे उपलब्ध.
2. नकली मार्कशीट्स आणि प्रमाणपत्रांची शक्यता कमी होते कारण सर्व रेकॉर्ड सत्यापित असतात.
3.एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेताना शैक्षणिक माहिती आणि क्रेडिट्स सहज ट्रान्सफर करता येतात.
4.विद्यार्थी त्यांचे शिक्षण त्यांच्या गतीने आणि पद्धतीने करू शकतात आणि मिळवलेले क्रेडिट्स कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत वापरता येतात.
5.खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंसेवा इत्यादीसारख्या उपक्रमांचाही ट्रॅक ठेवला जातो.
6.DigiLocker प्लॅटफॉर्ममुळे सर्व माहिती सुरक्षित राहते.
7. ही प्रणाली अधिक पारदर्शक आहे आणि शैक्षणिक संस्थांना अधिक उत्तरदायी बनवते.
अपार आयडीमध्ये काय समाविष्ट असते?
अपार आयडी ही विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल ओळख असते आणि त्यात त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सर्व महत्त्वाची माहिती समाविष्ट केली जाते. ही माहिती केवळ शैक्षणिक नोंदीपुरती मर्यादित नसून, विद्यार्थी म्हणून त्या व्यक्तीच्या संपूर्ण विकासाचा आढावा घेते. चला तर मग पाहूया, अपार आयडीमध्ये नेमकं काय-काय समाविष्ट असतं:
1. शैक्षणिक माहिती (Academic Records): विद्यार्थ्याने कोणत्या वर्गात, कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं, कोणते अभ्यासक्रम पूर्ण केले, कोणत्या वर्षी कोणत्या परीक्षांमध्ये बसला, यासंबंधीची सर्व माहिती यामध्ये संग्रहित असते.
2. मार्कशीट, प्रमाणपत्रे आणि शिष्यवृत्तीची नोंद: विद्यार्थ्याच्या सर्व मार्कशीट्स, प्रमाणपत्रे (Certificates), शिष्यवृत्त्यांशी संबंधित माहिती (Scholarship details) ही अपार आयडीच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात एकत्र केली जाते. यामुळे गरज पडल्यास ही माहिती कुठेही आणि कधीही सहजपणे उपलब्ध होते.
3. Co-curricular Activities चा समावेश: फक्त अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थी शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात ज्या सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेतो — जसे की खेळ, नाट्य, चित्रकला, निबंध, विज्ञान प्रदर्शन — अशा सर्व बाबींचीही नोंद या आयडीमध्ये ठेवली जाते. हा भाग विद्यार्थ्याच्या समग्र विकासाचा पुरावा म्हणून काम करतो.
4. Academic Bank of Credits (ABC) आणि DigiLocker शी जोडणी: अपार आयडी हे Academic Bank of Credits (abc.gov.in) आणि DigiLocker या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मशी थेट जोडलेले असते.
- ABC Portal: येथे विद्यार्थी आपल्या शिक्षणात मिळवलेले क्रेडिट्स (Credits) साठवू शकतो, जे भविष्यात पुढील अभ्यासक्रमात वापरता येतात.
- DigiLocker: सर्व प्रमाणपत्रे आणि मार्कशीट्स DigiLocker मध्ये सुरक्षित ठेवली जातात, जी अधिकृतरित्या वापरता येतात.
अपार आयडी नोंदणी कशी मिळवावी?
अपार आयडी मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने काही आवश्यक टप्पे पार करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, जर विद्यार्थी अल्पवयीन (18 वर्षांखालील) असेल, तर त्याच्या पालकांची संमती (Consent) घेणे बंधनकारक आहे. बहुतेक शाळा विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना सहमती पत्र (consent form) देते, ज्यावर स्वाक्षरी करून शाळेला परत द्यावी लागते. यानंतर, विद्यार्थ्याजवळ वैध आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, कारण नोंदणी प्रक्रियेत आधार क्रमांक आवश्यक असतो. पुढील टप्पा म्हणजे DigiLocker खाते तयार करणे, जेथे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करून अधिकृत खाते उघडावे लागते.
नोंदणीसाठी विद्यार्थी Academic Bank of Credits (ABC) च्या अधिकृत संकेतस्थळावर https://abc.gov.in लॉगिन करू शकतात किंवा डिजीलॉकर अॅप/वेबसाइटचा वापर करूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नोंदणी करताना विद्यार्थ्याला आपले नाव, जन्मतारीख, लिंग, आधार तपशील, मोबाईल नंबर इत्यादी माहिती अचूक भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर शाळा किंवा कॉलेज संबंधित नोंदणीची पडताळणी करून अपार आयडी तयार करते. एकदा अपार आयडी जनरेट झाल्यानंतर ती विद्यार्थ्याला DigiLocker च्या “Issued Documents” विभागात किंवा ABC पोर्टलवरून सहजपणे डाउनलोड करता येते.
अपार आयडी अनिवार्य आहे का?
अपार आयडी सध्या अनिवार्य नाही. म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्याला ती जबरदस्तीने घ्यावी लागते असा नियम नाही. मात्र, केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारांकडून याचा वापर शिफारसीय आणि प्रोत्साहनात्मक स्वरूपात सुरू आहे. अनेक शाळा आणि संस्थांनी अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भविष्यात हे एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन ठरू शकते.
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील प्रत्येक टप्प्याचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याच्या दृष्टीने ही आयडी फायदेशीर आहे. त्यामुळे जरी ती बंधनकारक नसली, तरी याचा स्वीकार केल्यास भविष्यात प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आणि करिअर संबंधित बाबी अधिक सोप्या आणि पारदर्शक होतील.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र आहे? व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

