बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार २५०० ते ६०००० रु स्कॉलरशिप mahabocw scholarship

mahabocw scholarship : राज्यातील नोंदणीकृत कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ maharashtra building and other construction workers welfare borad मार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एका योजनेमधून बाधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार स्कॉलरशिप आहे. दर महिन्याला किती रक्कम मिळेल पात्र लाभार्थी कोण सोबत अर्ज करण्याच्या नमुना PDF खाली दिला आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

बाधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप mahabocw scholarship

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MBOCW) हे महाराष्ट्र सरकारचे एक मंडळ आहे, ज्याची स्थापना राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 1 मे 2011 रोजी करण्यात आली. यामंडळाअंर्तगत बांधकाम कामगारांना विविध योजना आणि सेवा पुरवल्या जातात, ज्यात आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक साहाय्य केले जाते.

याच मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी (फक्त 2 मुळे ) विविध mahabocw scholarship स्कॉलरशिप योजना चालवल्या जातात त्या योजना मधून पात्र लाभार्थ्यांना २५०० रुपयापासून 1 लाख पर्यत आर्थिक मदत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत कामगाराचे मुले इयता 1 ली ते पदव्युतर ( अभियांत्रिकी , मेडिकल ) यासारख्या वर्गात शिक्षण घेत असल्याला पाहिजे खाली पूर्ण माहिती दिली आहे.

लाभ घेण्यसाठी आवश्यक कागदपत्र

कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या योजनेस अगोदर पात्र असणे आवश्यक असते त्यानंतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक असते आणि त्यानंतर अर्ज प्रकिया माहिती असणे आवश्यक असते. mahabocw scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची माहिती खाली दिली आहे सोबत अर्ज करा करावा याची पूर्ण माहिती सुद्धा दिली आहे .

  • अजर्दार बालक/विद्यार्थी याचे आई वडील याचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होणे आवश्यक आहे.
  • नोंदणी जॉब कार्ड ची सत्यपत्र
  • अर्जदार बालक/विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या शाळेतील मागील वर्षाचे गुणपत्रक आणि चालू वर्षाचे बोनफाईड (शाळेत असल्याचा दाखला )
  • अर्जदार विद्यार्थी याचे आधार कार्ड सोबत वडिलांचे आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे . आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
  • आधार कार्ड बँकेसोबत सीडींग असणे आवश्यक आहे नसेल तर आर्थिक लाभ वेळेवर मिळणार नाही . तुमचे आधार सीडिंग बँकेत झालेले आहे का?
  • आवश्यक असल्यास शाळेतील हजेरीपाट ची सत्यपत्र
  • MSCIT ची फीस परत मिळवण्यासाठी पास झाल्याचे गुणपत्रक सोबत फीस भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
योजना क्रनोदणीकृत बांधकाम कामगाराकरिता शैक्षणिक योजनाआवशयक कागदपत्र
E 01दोन पाल्यांना 1 ली ते ७वी साठी प्रतिवर्षी रु. २५००/ किंवा इ.8 वी ते १०वी साठी प्रतिवर्षी रु. ५०००७५ टक्के शाळेत हजेरी
E 02दोन पाल्यांना इयत्ता १० वी व इयता 12 वी मध्ये 50 टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रु १०,०००/-किमान 50 टक्के अधिक गुण असायला पाहिजे
E 03दो पाल्यांना इयता ११ वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रती शेक्षणिक शैक्षणिक वर्षी रु १०,००० /-१० व ११ विची गुणपत्रिका
e 04दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवी च्या प्रथम , द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश ,पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/-मागील शैक्षणिक इयता मधील गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची बोनाफाईड
e 05दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैदकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता रु 1,००,००० व अभियांत्रिकी पदवी साठी ६० हजार रुपयेमागील शैक्षणिक इयता मधील गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची बोनाफाईड
e 06दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकेकरिता प्रतिवर्षी २० हजार व पदव्युतर पदविकेसाठी 25 हजार रुपयेमागील शैक्षणिक इयता मधील गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची बोनाफाईड
e 07दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण mscit साठी शुल्काची प्रतीपूर्तीmscit उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व फीस भरल्याची पावती

अर्ज कसा करावा .

वरील आवश्यक कागदपत्रे सोबत ठवून खाली दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा आणि आपल्या जिह्ल्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यलयात जाऊन सादर करावा.

महत्वाची माहिती

मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी , नूतनीकरण व लाभाचे अर्ज online पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. ६ फेब्रुवारी २०२५ पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.

लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत:

ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.
रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी “Change Claim Appointment Date ” ह्या बटनावर क्लीक करावे. सिस्टिम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल . नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइल वर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.

बाधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप अर्ज PDF येथे क्लीक करा
शासनाची अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
बांधकाम कामगार नोदणी कशी करावी येथे क्लिक करा

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार २५०० ते ६०००० रु स्कॉलरशिप mahabocw scholarship” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top