विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते व विवाह नोंदणी प्रमाणपत्र pdf

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

विवाह नोंदणी हा केवळ एक प्रमाणपत्र नसून, ते अत्यंत म्हटवाच दस्तएवज आहे ह्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रामुळे जोडप्याच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा असून या प्रमानपत्रामुळे वैवाहिक नात्याला कायदेशीर मान्यता आहे, शासनामार्फत सदरील प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी एक विशेष कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, राज्यात विविध स्थावर विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनप्रणाली काम करते. विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते व विवाह नोंदणी प्रमाणपत्र pdf याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते
विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते

विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते

विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते हे समजून घेण्यागोदर हे समजून घेणे महत्वाचे आहे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र काय आहे ? विवाह नोंदणी प्रमाणपत्र चे महत्व काय आहे ?, ग्रामीण ,शहरी भागातील व्यक्ति हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज कसा करू शकतात व आवश्यक कागदपत्रे काय आहेत ? आणि सर्वात महत्वाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

हाराष्ट्र विवाह मंडळाचे विणीयमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 अधिनियम 15 एप्रिल 1999 रोजी प्रथम प्रकाशित करण्यात आला.
ह्या अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्यात विवाह विणीयमन करून विवाहविषयक गैरव्यवहारांना आणि विवाह नोंदणी सुविधेच्या गैरवापरला प्रतिबंध करण्याकरिता आणि विवाहांची नोंदणी सक्तीची करण्याकरिता आणि तत्सबंधातील किंवा तदनुषंगीक बाबिसाठी एक सर्वसमावेशक क कडक कायद्याची तरतूद करण्याकरिता हा अधिनियम काम करेल.

शासन, विवाह, विवाह मंडळ, द्यापान, पक्षकार, विहित,विवाहाची नोंदवही, विवाह मंडळाची नोंदवही, निबंधक, महानिबंधक , यासारख्या सर्व शब्दाची व्याख्या केले व त्याची मर्यादा, जबाबदऱ्या ठरवून दिल्या. त्याच बरोबर हा अधिनियम 15 एप्रिल 1999 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात व विवाह नोंदणी करण्यास बंधानकरक करण्यात आले.

विवाह नोंदणी का महत्वाची आहे ?

शासन दरबारी काढण्यात आलेल्या प्रत्येक कागदपत्रास अत्यंत महत्व आहे, पण सर्व सामान्य व्यक्तिस ह्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र च्या काय फायदा होतो व त्याचे महत्व काय आहे.

  • कायदेशीर मान्यता : विवाह नोंदणीमुळे विवाह हा कायदेशीरदृष्ट्या मान्य होतो. याचा अर्थ, दोघेही कायद्याने पती-पत्नी म्हणून ओळखले जातात. दुसऱ्या कोणत्याही पुराव्याची गरज नाही. सोबत शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र कायदेशीर मान्यता देते.
  • संपत्तीचे हक्क : पती-पत्नी दोघांनाही एकमेकांच्या संपत्तीवर कायदेशीर हक्क भारतीय संविधान देते. एखाद्या महिलेला तिच्या पतीच्या संपतीमध्ये हक्क मागायचा असेल तर अगोदर तिला कायदेशीर सदरील व्यक्तीची पत्नी असणे आवश्यक आहे आणि विवाह नोंदणी नसल्यास, संपत्तीच्या बाबतीत वाद निर्माण होऊ शकतात. हक्क मागतांना अडचणी येऊ शकतात.
  • योजनेचा लाभ घेणीसाठी आवश्यक : अनेक प्रत्यक्ष लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विवाह नोंदणी आवश्यक असते. उदाहरणार्थ, पतीच्या निधनानंतर पत्नीला मिळणारी विमाची रक्कम, पेंशन इतर अनेक योजनामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र ची आवश्यकता असते.
  • पासपोर्ट आणि वीजा : विदेशात प्रवास करताना पासपोर्ट आणि वीजा आवश्यक असते आणि पासपोर्ट आणि वीजा काढण्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक अत्यंत आवश्यक आहे.
  • घटस्फोट : जर नात्यात काही बिघाड झाला तर घटस्फोट घेण्यासाठी , कोर्टाची लढाई लढण्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर पती- पत्नी असल्याचे सिद्ध करण आवघड जाते. त्यामुळे लग्नंनंतर लगेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे

विवाहित जोडप्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे परंतु बहुतेक लोकांना हेच माहिती नसते की विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे कोणकोणते कागदपत्र लागतात. या विषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाइन , ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयसंबंधित अधिकारी
ग्राम पंचायत ग्राम सेवक
महानगर पालिका क्षेत्रप्रभाग वैदकीय अधिकारी
नगरपालिका/ नगरपंचायत / नगर परिषदमुख्याधिकारी ( जर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे नगर पालिका / नगर परिषद / नगरपंचायत हद्दीत नसेल तर )
ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय क्षेत्रात वैद्यकीय अधीक्षक , ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय ( जर नगर पालिका / नगर परिषद / नगरपंचायत हद्दीत ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय असेल तर )
कटक मंडळेवैद्यकीय अधीक्षक कटक मंडळे किंवा वैदकीय अधीक्षक ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय
  1. विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज कसा करावा.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही अनेक शासकीय वेबसाईट चा उपयोग करू शकता , प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार ह्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता .
हाराष्ट्र विवाह मंडळाचे विणीयमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 अधिनियमclick Here
विवाह नोंदणी format PDFclick here
अश्याच अपडेटसाठी तुम्ही आमच्या whats app ग्रुप ला जॉइन करू शकताशासकीय नोकरी & योजना ग्रुप
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकapply Here

विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनीयम 1998 व यासंदर्भातील नियमानुसार लोकसेवा ( सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर ) कामकाज्याचे 36 दिवस लागतात ( शासकीय सुट्ट्या वगळता पूर्ण कागदपतत्राची पूर्तता करून अर्ज केल्याच्या 36 दिवसानंतर तुम्हाला तुमचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. किंबहुना अर्ज केल्यानंतर जर 36 दिवसानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र नाही मिळाले तर कदाचित कागदपत्राच्या अभावी अर्ज बाद किंवा वापस केल्या जाईल तशी सूचना अर्जदाण्यास संबधित विभागामार्फत देण्यात येईल.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते व विवाह नोंदणी प्रमाणपत्र pdf व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top