शोभिता धुलिपाला यांचे नागा चैतन्यशी झाला साखरपुडा
ऑगस्ट 2024 मध्ये शोभिताने अभिनेता नागा चैतन्यशी साखरपुडा झाला वाचा शोभिता विषयी पूर्ण माहिती
आंध्र प्रदेशातील तेनाली येथे 31 मे 1992 रोजी जन्मलेली शोभिता धुलिपाला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सोळाव्या वर्षी मुंबईत आली. प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आणि कायद्याची विद्यार्थिनी, तिने सौंदर्य स्पर्धांमधून तिचा प्रवास सुरू केला.
2013 मध्ये, शोभिताने फेमिना मिस इंडिया अर्थ खिताब जिंकला आणि मिस अर्थ 2013 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. किंगफिशर कॅलेंडर 2014 मध्ये देखील तिने प्रसिद्धीच्या झोतात प्रवेश केला.
धुलिपालाने 2016 मध्ये अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 मध्ये अभिनय श्रेतातपदार्पण केले. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिला समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. पुढे अनेक चित्रपटात त्यांना काम मिळाले
तिने मेड इन हेवन (2019-2023) मधील ताराच्या भूमिकेने व्यापक ओळख मिळवली आणि गुडाचारी, पोनियिन सेल्वन, आणि द नाईट मॅनेजर सारख्या चित्रपटांमध्ये अतिशय उत्तम भूमिका
2024 मध्ये, देव पटेल दिग्दर्शित मंकी मॅन सह शोभिताने अमेरिकन सिनेमात प्रवेश केला. या ॲक्शन थ्रिलरमधील तिच्या अभिनयाने तिचे जागतिक आकर्षण अधोरेखित केले.