पिक विमा योजनेचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पिक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पहा शासकीय GR आणि माहिती

केद्र शासन पुरस्कृत असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजेनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अजून तुम्ही अर्ज प्रकिया पूर्ण केली नसेल तर काळजी करू नका. मागील काही दिवसापासून या पोर्टल मध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या म्हणून राज्यातील बरेच शेतकरी आपला पीक विमा भरू शकले नाहीत याचाच विचार करून शासनाने ४ ऑगस्ट २०२५ रोजी GR प्रकाशित करून विमा भरण्यासाठी तारीख वाढवली आहे. त्यामुळे राज्यातील कोणतेही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. आजच GR वाचून घ्या आणि आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

पिक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ
पिक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ

काय आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना एक अशी योजना आहे ज्या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ति , कीटक आणि रोगराई यामुळे पिकांची नुकसान झाल्यास शेतकरी विमा योजने अंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि त्यांना आर्थिक लाभ दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई होते.

विक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सुधारित पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२५ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात लागू करण्यास २४ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ होती. परंतु, शेतकऱ्यांना येत असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, योजनेत सहभागासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

त्यामुळे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ साठी ऑनलाइन विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.

ही मुदतवाढ देताना, योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यात नैतिक धोके आणि चुकीच्या लाभार्थ्यांची निवड टाळण्यासाठी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. या वाढीव वेळेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी संबंधित विमा कंपन्यांनी प्रसिद्धी आणि प्रचार मोहीम राबवावी.

हे हि वाचा

हे शासनपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ज्याचा संकेतांक क्रमांक २०२५ आहे.

शासकीय वेबसाईट ची लिंक येथे क्लिक करा
विक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ GRयेथे क्लिक करा

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “पिक विमा योजनेचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी विक विमा दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पहा शासकीय GR आणि माहिती” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version