मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ आणि कसा करावा अर्ज संपूर्ण माहिती

मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान

केद्र सरकार मार्फत चालू असलेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत महराष्ट्र राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन च्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवणे तसेच शाश्वत पाण्याची सुविधा निर्माण करण्याच्या उद्देश्याने मा. मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे हि योजना जाहीर केली. पुढील लेखात योजनेची पूर्ण माहिती सोबत एकूण किती अनुदान मिळेल व त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि संपूर्ण प्रकिया समजून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.  
 
 
मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे

मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट

  • शेततळ्याच्या माध्यमातून कोरडवाहू शेती साठी पाण्याची व्यवस्था करणे. 
  • मागील पाच वर्षात कमीत कमी एक वर्ष तरी ज्या गावाने पाणी टंचाई चा सामना केला आहे अस्या गांवाना प्रथम प्राधान्य देऊन पहिला देणे. 
  • प्रथम प्राधान्य दिलेल्या गावात एकूण ५१,५०० शेततळी स मान्यता देण्यात येईल. 
  • जर एखाद्या टंचाईग्रस्त भागातून जास्त शेततळ्याची मागणी झाल्यास त्याचा विचार करून त्याभागासाठी जास्त शेततळी देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. 
  •  शेततळ्याच्या आकारमान योग्य असायला पाहिजे , त्यासाठी खालील तक्ता वाचून घ्यावा.
  • ३०*३०*३ आकारमानाची ७५००० रुपयांची तरतूद आहे ह्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास तो खर्च शेतकऱ्याला स्वतःला करावा लागेल.

मागेल त्याला शेततळे पात्रता

  • मागेल त्याला शेततळे शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर (1.5 एकर)जमीन असावी. ह्या पेक्षा जास्त कितीही असेल तर काहीच अडचण नाही. तुम्ही अर्ज करू शकतो. 
  • अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेतततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी. ( कोरडवाहू)
  • यापूर्वी अर्जदारांनी शेततळे,सामुदायिक शेततळे शासकीय योजनाचा लाभ घेतलेला नसावा. 

मागेल त्याला शेततळे योजनेमधून लाभयार्थ्याची निवड

  • दारिद्य रेषेखालील ( राशनकार्ड धारक ) शेतकरी  किंवा  ज्या  कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्याच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल.
  • इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकरी अर्जदार ची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजनेंतर्गत  निवड करण्यात येईल.  

मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार लाभ

मागेल त्याला शेततळे या योजनेमधून 75,000 हजार एवढी रक्कम शासनामार्फत मिळेल त्यापेक्षा जास्त खर्च शेततळे तयार करण्यासाठी झाल्यास त्याचा खर्च स्वतःहा लाभार्त्याने करावा. 

मागेल त्याला शेततळे , शेततळ्याचा आकार 

अनु. क्र शेततळ्याचे आकारमान पृष्ठभागावरील श्रेत्रफ़ळ (चौ . मी ) होणारे खोदकाम (घ. मी )
इनलेट आउटलेटसह शेततळे
115*15*3 मीटर 225441
220*15*3 मीटर 300621
320*20*3 मीटर 400876
425*20*3 मीटर 5001131
525*25*3 मीटर 6251461
630*25*3 मीटर 7501791
730*30*3 मीटर 9002196
इनलेट आउटलेटसह विरहित शेततळे
1 20*15*3 मीटर 300 621
220*20*3 मीटर 400 876
325*20*3 मीटर 500 1131
425*25*3 मीटर625 1461
530*25*3 मीटर750 1791
630*30*3 मीटर 900 2196
ह्या आकारात बदल असू शकतो त्यासाठी शासकीय वेबसाइट भेट द्या – मागेल त्याला शेततळे

मागेल त्याला शेततळे मधून शेततळे बाधण्यासाठी अटी

  • 75,000 व्यतिरिक्त कोणतीही आगाव रक्कम मिळणार नाही. 
  • शासनाकडून आदेश आल्यानंतर तीन महिन्याच्या आत शेततळे पूर्ण करणे गरजेचे आहे. 
  • कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या जागेवर शेतकरी लाभर्थ्याला शेततळे बांधणे बंधनकारक असेल. 
  • शेततळ्याची निगा/ काळजी आणि दुरुस्तीची करण्याची  सर्व जबाबदारी शेतकरी लाभार्थ्याची असेल. 
  • पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून जाणार नाही / साचणार नाही यासाठी ची व्यवस्था शेतकऱ्याने करावी.
  • लाभार्थ्याने सातबारा या उतारावर शेततळ्याची नोद करणे बधानकारक राहील. 
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणतेही हानी झाल्यास त्याची नुकसानभरपाई शासन देणार नाही , शेतकऱ्याने स्वतःहा करणे अपेक्षित आहे.
  • शासन मंजूर आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक राहील. 
  • शेततळे खोदण्यासाठी मशीनचा वापर करता येईल पण त्यासाठी वेगळे पैसे अनुदान स्वरूपाने मिळणार नाहीत.
  • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात काम होईल. बँक खात्यास आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे

  • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • जमितीचा ७/१२ उतारा 
  • ८-अ प्रमाणपत्र 
  • दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला. 
  • शासनामार्फत विहित केलेला अर्ज 

अर्ज कसा करावा 

तालुका कृषी अधिकारी ह्याच्या कडे तुम्ही offline अर्ज करू शकता.  महाराष्ट्र शासनाने ह्यासाठी जिल्हापातळीवर आणि तालुका पातळीवर समितीचे गठन केले असून मा.  पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आठवा व समन्वय समिती  या योजनेवर देखरेख करेल त्या त्या जिल्ह्याचे  मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्ष्यतेखाली समिती असेल. तालुका पातळीवरील समिती शेततळ्याचे वाटपाचे निर्णय घेतील.
online अर्ज :- करण्यसाठी मागेल त्याला शेततळे ह्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाइन  अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही योजनेबद्दल अजून माहिती जाणून घेऊ शकता. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून आपल्या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याकडे जमा करावी

या लेखामधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

0 thoughts on “मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ आणि कसा करावा अर्ज संपूर्ण माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version